March 2022

अमेरीकेतील हायस्कूल प्रवास -५

अमेरीकेत कॉलेज प्रवेश प्रक्रिया १२वीच्या सुरुवातीलाच सुरु होते. त्याही आधी सुरु होतो तो योग्य कॉलेजचा शोध. शाळेत काउंसिलर ९वी पासून दरवर्षी मुलांशी बोलून, अ‍ॅप्टीट्युड टेस्ट्सचा वापर करुन मुलांना पुढे काय करायचे ते ठरवायला मदत करत असतात. त्याच्या जोडीला पार्ट टाइम्/समर जॉब, मित्र-मैत्रीणींचे, नातेवाईकांचे अनुभव, वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक, जॉब शॅडोइंग सारखे उपक्रम या सगळ्याच गोष्टींचा कमी अधिक प्रभाव मुलांवर पडत असतो. पालकांनीही वेळोवेळी मुलांशी बोलून मुलांचा कल, त्यांचे साधारण करीयर प्लॅन्स काय आहेत ते समजून घ्यावे. हे प्लॅन्स दर वेळी बदलत असले तरी काळजी करु नये. It's part of growing up.

Keywords: 

द पॉवर ऑफ द डॉग (२०२१ - नेटफ्लिक्स )

आतापर्यंत ज्या काही वेस्टर्न मुव्हीज पाहिल्या आहेत त्यांच्यावरून वेस्टर्न मुव्हीजचा विचार करताना एक टिपिकल पॅटर्न डोक्यात येतो,ज्यात सतत घोडदौड करणारे,बूट्स आणि हॅट घातलेले काऊबॉईज,मैलोनमैल पसरलेली माळरानं,काही कारणामुळे दोन ग्रुप्स मध्ये असणारी स्पर्धा,अगदी रक्तरंजित हाणामारी वगैरे.

असाच वेस्टर्न बॅकग्राउंड असलेला पण चित्रपटाची कथा,त्यातली पात्रं यामुळे अगदी वेगळाच वाटेल असा एक चित्रपट नुकताच पहिला तो म्हणजे 'द पॉवर ऑफ द डॉग'.ट्रेलर बघताना काही कल्पना येत नाही, किंबहुना चित्रपटाची सुरुवात होतानाही पण पुढे काय घडेल याचाही अंदाज येत नाही.

Keywords: 

कारपूल अर्थात गाडीतून एकत्र प्रवास!

गाडी चालवत लांबच लांब अंतर जाताना बरोबर सोबत असेल तर मजा येते. बस, ट्रेन व इतर कुठल्या सार्वजनिक वाहनांनी जाण्यापेक्षा कुणा ओळखीच्याच्या गाडीतून प्रवास करायला मिळाला तर प्रवासाचा शीण कमी होतो.
एकूणात कदाचित इंधन कमी जळते, कदाचित दोन्ही लोकांचा थोडाथोडा खर्च वाचतो वगैरे.. हे सर्व कारपूलचे फायदे सर्वांना माहितीच आहेत.

आपल्या मैत्रिणी बऱ्याचदा प्रवास करत असतात. तर हा धागा सर्व प्रवासी मैत्रिणींच्या कारपूल साठी.

र्ंग़ खेळ

सूर्याकडे कधी डोळे बंद करून पाहिलंय. डोळे उघडे ठेवून बघता येतच नाही. पण डोळे बंद करून पहिला ना की आपण एका वेगळ्या विश्वात जातो. मस्त लाल केशरी रंग. डोळे बंद केले कि आपण तसही आपल्या जगात जातो आणि सूर्यासमोर ते जग इतक्या सुंदर आणि तेजाळलेल्या रंगाने भरलेलं असतं. गम्मत म्हणून कधीतरी करून बघा आणि तसेच डोळे बंद करून सूर्याकडे पाठ करा. जग निळाईनं भरून जातं. कृष्णाचा निळा रंग, आकाशाचा निळा रंग किती छान वाटतं. शांत समृद्ध अथांग.

लेख: 

कुंडल

"हॅलो सारिका"
"आदित्य, कधीपासून फोन करतेय. रूमलाही कुलूप होतं. ट्रेकवरून परवाच येणार होतास ना?"
"हो, माझा मोबाईल बंद पडला होता. अगं आम्ही तिकडे वाट चुकलो."
"बापरे!"
"एवढं काही नाही गं, रात्री रानात झोपलो. सकाळी एकजण भेटला, त्याने वाट दाखवली आणि आलो मुंबईला. परवाऐवजी काल रात्री पोचलो, एवढंच"
"छान!! मग आज ऑफिसला येतोयस?"
"येतोय ना.भेटूच"

Keywords: 

लेख: 

स्टेट, नॅशनल पार्क्स - १. ये क्या हुआ, कब हुआ, क्यु हुआ!

कोलोरॅडोत रहायला आल्याला आता बरीच वर्षे झाली. रॉकी माउंटन पर्वतरांगांनी घेरलेले, नजर जाईल तेथे स्वच्छ रंगीत आकाश दाखवणारे असे हे सुंदर राज्य. हाय अल्टिट्युड्मुळे (Altitude)सुर्य भारी प्रखर जाणवतो. दुरवरच्या पर्वतरांगांवर कायम बर्फ दिसतोच. मला स्नो पाहिला की चक्करल्यासारखे होते पण आता इतकी वर्षे राहुन सवय होतेयही.

चाला वाही देस

गेले काही दिवस मी एक समांतर आयुष्य जगतेय असं वाटतंय. हा माझा एकटीचा प्रवास आहे. अर्थात त्यात काही समानधर्मींशी अधूनमधून टचबेस करतेय पण मी यात एकटीच आहे. लतादीदींच्या जाण्याने माझ्या मनात जी काही उलथापालथ झाली ती झालीच. त्यांची मी खूप मोठी फॅन होते का तर लौकिकार्थाने कदाचित नाही . पण माझं त्यांच्याशी एक नातं आहे हे निश्चित - रूहानियत का रिश्ता. त्यांच्या गाण्यांनी माझ्या आत्म्याला तृप्ती मिळते. आणि या नात्याने लतादीदींशी बांधले गेलेले करोडो लोक आहेत. मुझसे बेहतर सुननेवाले हैं|

Keywords: 

ImageUpload: 

स्टेट, नॅशनल पार्क्स - २. विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर

lake.jpg

'विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर' ही म्हण बॅककंट्री कँपिंगला अगदीच लागु पडते.

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle