इथे आल्यापासून ते अगदी मागच्या चार वर्षांपर्यंत, मला इथल्या आवडणाऱ्या गोष्टींमध्ये अग्रस्थानी होत्या इथे मिळणाऱ्या सुट्ट्या. अर्थात आपल्यासारख्याच बाकीच्याही लोकांना भरपूर सुट्ट्या असतात आणि त्यामुळे कामं अडू शकतात असंही बरेचदा झालं आणि तेव्हा वैताग सुद्धा झाला. मग पालक म्हणून सुट्ट्यांची उपलब्धता बघता आवडीचं पारडं अजून जड झालं आणि मग आता किंडर गार्टन, शाळा या सुट्ट्या बघितल्यानंतर, ते अनुभवत असताना ते पारडं पुन्हा कुठे बसवायचं असा प्रश्नही अधून मधून पडला. जर्मनीतल्या सुट्ट्या - फायदे आणि तोटे हा अगदी सपट परिवार महाचर्चेचा विषय होऊ शकतो असे अनेक अनुभव जमा होत गेले.
जेव्हा वयाची पंच्याहत्तरी येते —२
**************************
चक्क काहीतरी लिहावे वाटतय
म्हणजे मी म्हातारा झालोय?
अवघे पंच्चाहत्तरावेच तर सरतेय
किती ही कलकल?मीच गप्प बसतोय....
सूनेने उशीर झाला समजून दिला चहा
मुलाने हातातले वर्तमानपत्र ठेवलं समोर
सौ ने माझ्या कपाळाला लावला हात
तोंडाने बडबड,वैताग,जीवाला घोर....
रात्रीच्या जेवणात दोन तीन पोळ्या शिल्लक राहिल्या तर दुसऱ्या दिवशी आमचा हमखास हा नाश्ता असतो! मी काही साटप सुगरण वगैरे नाही त्यामुळे रेसिपी हेतेढकल आहेच
चार पोळ्या तयार असताना साहित्य:
४ अंडी
२ मध्यम आकाराचे कांदे
२ लहान काकड्या
१ मोठा टोमॅटो
४ चहाचे चमचे तयार हिरवी चटणी/ठेचा (मी हिरवी मिरची, आलं लसूण, कोथींबीर असं वाटून एका हवाबंद डब्यात फ्रिझरमध्ये ठेवते.)
४ चमचे टोमॅटो सॉस
आवडत असेल तर चाट मसाला
एक लिंबू
गेल्या शुक्रवारी, म्हणजे साधारण दहा दिवसांपूर्वी मी हा सिनेमा पाहिला. पुस्तकाविषयी, कथेविषयी अगदी काहीच माहित नव्हतं. चित्रपट त्या दिवशी प्राइमवर रिलीज झाला होता. सहज बघायचं ठरवलं आणि पाहिला. आणि आता +१ च्या मते मला झपाटलं आहे या गोष्टीनं. मी एकदम सुपरफॅन झाले आहे. एकतर ताबडतोब शनिवारी (दोन्ही कुटुंबीय मंडळी क्रिकेट खेळायला गेल्यावर, नीटपणे, एकटीनं, सलग) परत सिनेमा पाहिला. मग रविवारी किंडलवर पुस्तक घेतलं आणि रविवारचा दिवसभर, सोमवारची रात्र, मंगळवारची रात्र घालवून ते भराभर वाचलं.
उपासाचे गुलगुले:
नमस्कार मंडळी:
सध्या विणकाम तोरणं, रुमाल बाप्पाच्या स्वागतासाठी रोजच चालू आहे! त्यामुळे कामात बदल हवाच ना..माझ्या डोक्यात एक तर क्रोशाचं डिझाईन येतं किंवा पाककृती!त्यापैकी जे जास्त भुंगा लावील ते करायचं!
मला लोणची विशेष आवडत नाहीत फक्त लिंबाचं गोड लोणचं आणि ही मिरची सोडून. भाजीवाल्याकडे ह्या पोपटी, लांबोडक्या, जाड मिरच्या खूप ताज्या दिसत होत्या म्हणून उत्साहात घेतल्या पण त्याचं काय करतात ते माहीत नव्हतं. (तो भावनगरी म्हणाला पण ह्या मिडीयम तिखट आहेत. काय माहित कुठली जात ते!) रेसिपी शोधल्या तर एक मिरच्यांची भाजी दिसत होती पण आमच्याकडे कुणाचाच तेवढ्या मिरच्या खाण्याचा स्टॅमिना नाही म्हणून शेवटी लोणचंच करायचं ठरवलं. बऱ्याच रेसिपी बघून, मिक्स करून शेवटी अशी मिरची झाली!