मागच्या आठवड्यात गुरुवारी दुपारी जेवत असताना अचानक माझ्या whatsapp वर मला एक मेसेज आला "Dakshina .. from ? मी एक क्षण बावचळले पण नोटिफिकेशन बार खाली ओढून वाचलं ते इतकंच होतं. मी जेवत होते त्यामुळे उत्तर देण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. पुन्हा काही सेकंदांनी दुसरा मेसेज ... माझं नाव...XXX मी अवाक.. कारण माझ्याकडे तो नंबर एका पुरुषाच्या नावाने सेव्हड होता आणि मला जो मेसेज आला होता तो एका स्त्रीचा होता.. कारण त्यात तिने तिचे नाव लिहिले होते. मग माझ्या डोक्यात नाना प्रकारचे विचार यायला लागले. की ही स्त्री नक्की त्याची बायको असणार आणि हिला काहीतरी संशय वगैरे आला असेल का?
दिवाळीसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी म्हणून मी इंस्टाग्राम वर आलेली एक लिंक चेक केली. 'वाणी कुर्तीज माय शॉपीफाय डॉट कॉम' अशी ती लिंक होती. त्यावर 'टू गुड टू बी ट्रू' अशा ऑफर्स होत्या. अडीचशे रुपयाला मस्त कुर्ता मिळत होता. शिवाय दोन वर एक फ्री... 1434 रुपयांची खरेदी डोकं गहाण ठेवून मी केली. ही गोष्ट आहे तीस ऑक्टोबरची, कालची तारीख 7 नोव्हेंबर.. अजूनही पार्सल आलेलं नाही; दिवाळी तर जवळ आली आहे म्हणून मी तो मेल चेक केला, ऑर्डर कुठे पोचली म्हणून ट्रॅक करावं म्हणलं तर त्यामध्ये ट्रॅकिंगची कुठलीही लिंक नव्हती; फक्त पैसे मिळाल्याची रिसीट मला ईमेलने आलेली होती.
10th November 2023
मी हल्ली सकाळी फिरून आलो की अजिबात पोर्चमध्ये थांबायला तयार नसतो. दरवाजा जोरजोरात वाजवून उघडायला लावतो. मग पळत जाऊन बेडवर शेपटीत नाक घुसवून बसतो. प्राची म्हणत होती की जिंजरने विंटर डिक्लेअर केला आहे. आता जिंजरची औषधं आणून ठेवली पाहिजेत. तिच्या मते मी शंतनुसारखाच नाजूक तब्येतीचा आहे. लवंगाने उष्णता आणि वेलदोड्याने थंडी... असं काही तरी म्हणत होती.
काल फिरून आल्यावर मला खूप खोकला आला. शेकोटीच्या धुरामुळे तसे झाले असावे असे प्राची म्हणाली. 'दिल्लीचा असूनही असा कसा काय रे तू' म्हणाली.
मला एरवी खोकला झाला की ती मला मध पाणी देते.
21st March 2023
या प्राचीच्या कानांचं काही तरी करायला हवं. माझ्या सोबत राहून राहून एकदम तिखट झाले आहेत तिचे कान. एरवी गच्चीवर गेल्यावर मी उंच उडणाऱ्या विमानावर उड्या मारत मारत भुंकतो, तेव्हा आकाशाकडे बघत म्हणते,"तुला कसं कळतं रे विमान उडत असलेलं? एवढासा ठिपका दिसतोय अगदी लक्ष देऊन बघितलं तर. आवाज पण ऐकायला येत नाहीये मला. तुला कसं कळतं?"
21st October 2022
आज दुपारी एक मजाच झाली. प्राची लॅपटॉप वर काम करत होती आणि मी नेहमीप्रमाणे दरवाज्यात लोळत पडलो होतो. तर एकदम गेटमधून कोणीतरी आत यायला लागलं. मी मान वर करून पाहिलं तर मिहिका....
मी उड्याच मारायला लागलो. जोरात भुंकून हाका मारल्या प्राचीला. मग ती बाहेर आली आणि नेहमीप्रमाणे तिनं नो एक्के नो नो दुणे नो सुरू केलं. पण मला काही सुचतच नव्हतं. मी घरभर धावत सुटलो. जोरजोरात गाणी म्हणू लागलो. ती गाणी ऐकून मिहिकाबरोबर तिचे दोन फ्रेंड्स आले होते ते 'आंटी बाद में आते है ' म्हणत पळूनच गेले.
मी चकली एक्सपर्ट नाही. वर्षातून एकदाच - दिवाळीच्या वेळी भाजणी विकत आणून चकल्या करते. गेली सलग ४-५ वर्ष माझ्या चकल्या चांगल्या झाल्या म्हणून टिपा लिहिण्याचं धाडस करते आहे. त्यात बाकीच्या अनुभवी सुगरण मैत्रिणींनी भर घालावी.
१. १ मेजरिंग कप भाजणी - चमच्याने दाबून भरून शीग लावून घेतली असेल तर १ मेजरिंग कप पाणी, १ टीस्पून तेल असं आमचं माप ठरलेलं आहे.
मोहनाचं तेल जास्त झालं तर चकल्या हसतील, तळताना तुटतील विरघळतील. तेल कमी झालं तर दाततोड्या चकल्या होतील.
उंधियो म्हणजे एकदम आवडता प्रकार. मला अश्या मिक्स भाज्या आवडतात. ऋषीची भाजी, पोपटी, भोगीची लेकुरवाळी भाजी तसाच उंधियो पण आवडीचा. ज्युनिअरशिप मध्ये एक गुजराती सिनियर मॅडम कडून रेसिपी डिटेल वार लिहून घेऊन केलेला पहिल्यांदा आणि नंतर दरवर्षी घडतच जातोय तेव्हापासून. कितीही कमी कमी भाज्या आणून केला तरी वेगवेगळ्या बऱ्याच भाज्या असल्याने जास्तच होतो. सगळ्यांना बोलावून नाहीतर डब्बे पोचवून मग खाल्ला की खरी चव लागते उंधियोला. दुसऱ्या दिवशी जास्त टेस्टी लागतो कारण भाज्यांमध्ये मसाले मस्त मुरतात.