(हा लेख मायबोलीवर जेरेमीच्या मृत्यूदिनी प्रकाशित केला होता.यात आता काही डिटेल्स अजून टाकले आहेत.या माणसाबद्दल जितकी माहिती मिळवतेय तितका तो मला जास्त आवडतोय.)
१२ सप्टेंबर.उंचपुऱ्या देखण्या जेरेमी ब्रेट ला जगातून गेल्याला २१ वर्षं होतील.अजूनही जुने बी.आर.चोप्रा महाभारत पाहिलेल्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचं नाव काढलं की फक्त नितीश भारद्वाज येतो तसं शेरलॉक होम्स म्हटलं की जगातल्या बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त जेरेमी ब्रेट येतो.
शाळेत भारताचा इतिहास शिकलो पण उत्तर पूर्व राज्यांचा इतिहास, तिथले राजे ह्याबद्दल शिकल्याचं काही आठवत नाही. आसामच्या इतिहासाबद्दलची माहिती साधारण इ.स. चवथ्या शतकानंतरची उपलब्ध आहे. आसाममध्येही भारतातील इतर राज्याप्रमाणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राज्यकर्त्या व योध्या अनेक स्त्रिया होऊन गेल्या पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती आढळत नाही. अश्याच एका अपघाताने, बदलेच्या भावनेने बनलेल्या लढवैय्या स्त्रीची कहाणी.
केंद्र वर्गात मिनु बायदेव आसामीत एक गाणं गाऊ लागली अन अंगावर सरकन काटा आला .... आसामी भाषेतलं मला ओ की ठो कळत नाही, पण ज्या आर्ततेने ती म्हणत होती ......ते थेट मनाला भिडलं होतं.... गाणं संपल्यावर मोडक्या तोडक्या हिंदीत तिने गाण्याचा भावार्थ सांगितला..... त्यातला मला किती कळला? पण एवढचं लक्षात आलं की प्रत्येक अखमीया स्त्रीच्या मनात जिच्याविषयी हे गाणं आहे तिच्याबद्दल - 'जयमती'बद्दल, अपार माया व श्रध्दा आहे. तेव्हापासून माझ्याही मनात कुठेतरी 'जयमती' रुतुन बसली व ती स्वस्थ बसू देईना. धेमाजीतली पुस्तक-दुकाने, वाचनालय शोधले, पण कुठे काही साहित्य मिळेना. मग गुवाहाटीला गेले असताना श्री.
वयच काय होतं तिचं! खेळण्या-बागडण्याचे दिवस होते तिचे! पण थोरामोठ्यांनी तोंडात बोट घालावं, असं तिने अभूतपूर्व साहस अजाणत्या वयात करुन दाखवलंय, व आज ती कित्येकांची प्रेरणास्थान बनली आहे. तिच्या धाडसाचं वर्णन भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलंय.
हा आधी माबो अन मिपा वर लिहिलाय. अगदी मनापासून वाईट वाटल होतं तेव्हा जाता न आल्याच! पण यंदा जाणारे! सध्या हा वाचा मी परत आल्यावर यंदाच्या गणपतीची दैनंदिनी लिहिते! :)
काल गप्पांच्या पानावर सहज कोकणातल्या गणेशोत्सवाचा विषय निघाला , आणि मी एक सैर करून आले मनातल्या मनातच. ह्या वेळी घरच्या गणपतीला कोकणात हजेरी लावता येणार नाहीये ह्याचा सल होताच मनात , तो ह्या सफरीनी जरा हलका झाला.
कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............
मुंबईच्या मध्यवर्ती भागातील एक सरकारमान्य खाजगी शाळा. रविवार असल्यामुळे वर्दळ अशी नाहीच. एकच वर्ग तेव्हढा उघडा आणि बर्यापैकी भरलेला, तोही लहान मुलांनी नाही तर मोठ्या माणसांनी. 'पॉझिटिव्ह थिंकिंग' या विषयावर कसलीशी कार्यशाळा आयोजित केली होती या वर्गात. मीसुद्धा तिथेच, त्या वर्गातच हजर होते, निपचित पडून जे कानावर पडतंय ते ऐकत होते. तसंही टेबलावर धुळ खात पडलेल्या माझ्याकडे इतर कुणाचं लक्ष जाणार नव्हतंच. व्याख्याता बोलत होता, सकारात्मक रहायाला कसं शिकायचं?
हुश्श, आज पार दमलो बुवा, त्या तिथे मेजवानीसाठी किती ते पदार्थ, भारीच दमछाक झाली काम करुन, :tired: अंमळ टेकावे इथेच जरा... आई, आई गं....ऑ.. काय म्हणता? हो, हो माहिती आहे बायांनो, ही जागा आमच्यासाठी नाही, हे संकेतस्थळ केवळ स्त्रियांसाठीच आहे. इथे बाप्या लोकांना मज्जाव आहे ते. पण मी इथे रितसर परवानगी घेऊन आलोय बरं का. खरं नाही वाटत तर विचारा तुमच्या अॅडमिनताईंना. मला इथे येऊ द्यावं का नाही यासंदर्भात आतमध्ये एक मीटींगही झाली म्हणे आणि माझ्यासाठी एका ताईंनी वशिलाही लावलाय बरं, पण मी त्या ताईंचं नाव नाही घेणार, अगदी या कानाचं त्या कानाला नाही कळू देणार.