कठोर परिश्रम, चिकाटी आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर दीडशे पेक्षा अधिक वर्षांपूर्वी लंडनमध्ये सुरु झालेली जगातली पहिली भुयारी रेल्वे, जिला लोक भाषेत ट्युब म्हणतात, ते एक मानव निर्मीत आठवं आश्चर्यच वाटत मला. आणि म्हणूनच मी जेव्हा या टुयबने पहिल्यांदा प्रवास केला तेव्हा गाडी जरी जमीनीखालुन जात होती तरी मी मात्र अक्षरशः हवेत होते.
काही वेळा कितीही छान प्लॅनिंग केलेलं असलं तरी आपल्या हातात नसलेल्या घटकांमुळे ट्रिपमधला एखादा दिवस गंडतो. भीमबेटकाचं तसंच झालं!
मला आणि लेकीला बरं नसल्यानं त्या दिवशी हॉटेलमधून निघायलाच उशीर झाला. त्यातून अचानक आदल्या रात्रीपासून पाऊस सुरू झालेला. हवा चांगलीच गारठलेली आणि पावसाची पिरपिर सुरूच होती. आणि त्यादिवशी आमच्या अजेंड्यावर दोन ठिकाणं होती - सांची आणि भीमबेटका. भोपाळ पासून दोन्ही ठिकाणं दोन वेगवेगळ्या दिशेला.
कुटा बीचवरुन निघाल्यावर आम्ही दुपारनंतर तनाह लॉटला जायचे ठरवले. आता सगळे वातावरणच भारतासारखे म्हणल्यावर आम्हाला वाटले इथे शेअर्ड टॅक्सी किंवा प्रायवेट बसेस असतील तर तसे काहीच नाही दिसले. मग प्रायवेट गाडीच्या शोधात दिसलो. वाटले होते कि लगेच मिळेल पण कोणी यायला तयारच होइना. कारण संध्याकाळची वेळ होत आलेली होती आणि कुटामधे खुपच गर्दी होती. कुटा तसे नाईटलाईफ साठी फेमस आहे. जो गाडीवाला यायला तयार होत होता तो खुपच पैसे मागत होता. शेवटी चालुन चालुन वैतागलो त्यात डोक्यावर भयंकर उन. शेवटी एक गाडिवाला तयार झाला.
बॅंकेत काम होतं म्हणून भर पावसात चाकंतोड करत दीपक टॉकीजजवळच्या बॅंकेत गेले होते. नेहमीप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी मारायचे म्हणून त्या त्या एरीयातली दोन्-चार कामं असतातच बरोबर. म्हणून कालच आणलेल्या चिनी बनावटीच्या टेबललँपच्या प्लगला अॅटॅचमेंट, बॅटरीवर चालणार्या मेणबत्त्यांकरता छोट्या बॅटर्या असे इलेक्ट्रीकच्या दुकानाशी संबधित कामं होती. बँकेशेजारीच एक इलेक्ट्रीक आणि हार्डवेअरचे दुकान दिसले. हे कॉम्बिनेशनमध्ये दुकान का बरं चालवत असतील? हा मला नेहमीच पडणारा सनातन प्रश्न आहे. तो पुन्हा डोक्यात पिंगा घालायला लागला.
बालीला आम्ही रात्री बारा वाजता पोहोचलो होतो. रात्री बारा वाजता सुद्धा विमानतळावर उकडत होते. विझाबद्दल चौकशी केली होती त्याप्रमाणे भारतीय पासपोर्टधारकांना विझा लागणार नव्हता. तसेच झाले आणि प्रत्येकी US$35 वाचल्याचा आनंद झाला. बाहेर येउन आमच्याकडचे चलन बदलुन घेतले. तर तिथेही 'टॅक्सी टॅक्सी' ओरडणारे होतेच. आमचे हॉटेल ५ किमीवरच होते त्यासाठी आम्हाला १००k लागले (k = हजार). आजुबाजुचे रस्ते, वाहतुक बघुन आपण भारतातल्याच कोणत्यातरी भागात आलोय असे वाटले. हॉटेल मात्र छान होते. पण वातावरणाशी जुळवुन घ्यायला थोडा वेळ लागला.
सिडनीची ट्रिप करुन वर्ष होत आले होते म्हणुन यावेळेस आम्ही बालीला जायचे ठरवले. बर्याच दिवसांपासुन जायचे मनात होते पण सुट्ट्या, कॉलेज आणि बालीतल्या ज्वालामुखीचा उद्रेक अशा अनेक कारणांमुळे जायला जमत नव्हते. अनायसे डिसेंबरमधे सुट्ट्या होत्याच पण टिकिट्स खुप महाग होती. त्यातल्या त्यात स्वस्त म्हणुन मग एअर एशियाचे हॉलेडे पॅकेज बुक केले.