ही खरं तर पृथ्वीचीच गोष्ट, त्यामुळे तितकीच इंटरेस्टिंगसुद्धा. मला आवडलीये, तुम्हाला आवडतेय का ते पाहू या...
सर्वसाधारण रूपरेषा :
पृथ्वीची निर्मिती आणि इतिहास,
पृथ्वीवरची प्रारूपं,
सजीव जीवन,
अंतर्गत रचना,
तदनुषंगाने चुंबकीय आणि गुरुत्वाकर्षण क्षेत्र,
प्लेट टेक्टोनिक्स,
भूकंपशास्त्र.
अगदी लहानपणीची एक आठवण आहे. माझी एक नेहमी सोबत असणारी, अगदी घट्ट मैत्रीण. काही तरी खेळताना झालं भांडण. मला खूप राग आला, खूपरडू आलं की मी डोकं भिंतीकडे करून झोपून जायची. तशीच त्याही दिवशी भींतीकडे तोंड करून झोपले. पण डोळे टक्क उघडे होते. मला खूप खूप राग आलेला. का बरं ही अशी वागली? अशी कशी ग तू?
अन मग मला ती दारातून धाडदिशी बाहेर गेली ते आठवलं. मला खूप खूप रडू आलेलं.
मग थोडी मोठी झाले. माझी सगळ्यात आवडती बहिण. तीने एकदा एक गणित शिकवताना, बावळट आहेस का, असं काय करतेयस म्हटलं. झालं. पुन्हा भींत, धुमसणं, बहिणीचा वैतागलेला चेहरा आणि शेवटी माझं रडणं....अन मनात प्रश्न, अशी कशी ग तू?
आपण बहुतेक सगळे ठरावीक प्रकारचं, ठरावीक पठडीच आयुष्य जगतो. कुटुंबाची प्रेमळ आणि भक्कम चौकट, थोडा धाक- थोडे लाड असं लहानपण. शिक्षण - अर्थार्जन -लग्न. मग वंशवृद्धी. त्या आणि बाकी संसाराच्या जबाबदाऱ्या. किराणे - भाज्या- बँका - रुपये पैसे - कामवाल्या - तब्येती - आजारपणं, एक आणि दोन. पुढचं सगळं सारखंच. आपली मुलबाळ मोठी होतात आणि आपण म्हातारे. मग फक्त भूमिकेत बदल होतात. बाकी सगळा त्याच तिकिटावर तोच खेळ. पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्षे चालूच.
तर एक जपानी चित्रपट आहे. राशोमान नावाचा. बघितलायत? अतिशय अप्रतिम चित्रपट. नसेल बघितलात तर आवर्जून बघा. https://youtu.be/xCZ9TguVOIA हा चित्रपट अकुतागावा यांच्या इन ग्रोव्ह या गोष्टी वरून प्रसिद्ध दिग्दर्शक आकिरा कुरोसावा यांनी दिग्दर्शीत केला.
वेगवेगळ्या मैत्रिणींशी बोलताना अनेकदा इतिहासावर बोललं गेलं. अनेकदा इतिहासावर चर्चा झाली. तर ती चर्चा, बोलणं लिहून ठेवावं असं वाटलं. त्यासाठी हे लेख. जसे जमतील तसे लिहित जाईन. कधी माहिती, कधी माझी टिपण्णी, कधी एखाद्या समाजसुधारकाचे व्यक्तीचित्रण, कधी एखाद्या तत्ववेत्याचे विचार, कधी एखादी विचारप्रणाली,कधी एखादे युद्ध,...
८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात, सर्वांना माहित असेलच... लवकरच हा दिवस येत आहे... आमच्या परिवारातील आम्ही सगळ्या महिला या दिवशी एकत्र बाहेर जेवायला जातो आणि विशेष म्हणजे आम्ही सर्वजणी सारखे ड्रेसेस घालतो... खूप मज्जा करतो... हा उपक्रम गेले काही वर्षे चालू आहे... त्यात सगळी नाती एकत्र येतात आई - मुलगी, बहीण, सासू- सून, आत्या, मावशी, जावा- जावा.... जवळ जवळ तीन पिढ्या एकत्र येतात. सर्व काही छान वाटते.
आपलाचि संवादु आपणासि असंच हे सगळं लिखाण. कधी आयुष्याकडे वळून बघेन,,कधी मनात डोकावेन, कधी विचारांना तपासून बघेन, जसं जमेल तसं स्वत: लाच शोधत जाईन. आता हे इथे का लिहिणार? तर कधी कधी काही पोस्ट वाचताना जाणवतं, की इथूनच मी जात होते, गेले होते, धडपडले होते, तेव्हा कोणी हात दिला, नाही दिला, कधी माझी मीच शोधत, सापडवत, तयार करत गेले होते. ते सगळं वाचताना एखादीला जरी एक वाक्य उपयोगी पडलं तरी? पडेलच उपयोगी असही नाही, पण वाचायला आवडलं तर, म्हणून इथे लिहितेय.
महाराष्ट्र म्हटले कि मराठी माणूस... आणि मराठी माणूस म्हटले कि छत्रपती शिवाजी महाराज...... त्यांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी ३५० वर्षांपूर्वी केलेले कर्तृत्व आपल्या सर्वांनाच माहितीच आहे.... अगदी लहान असल्यापासून आपण इतिहासात वाचत आलो आहोत... ते अगदी जीव जोखिमेत घालून हिंदवी स्वराज्य स्थापनेपर्यंत.... मला काही फारसे इतिहास सांगायचं नाही आता, महाराजांनी जिंकलेले, घडवलेले किल्ले, गड़ सिंधुदुर्ग, रायगड, प्रतापगड, जंजिरा आणि खूप काही, आता आपल्यासाठी पिकनिक स्पॉट झाले आहेत....
चला चला राणीच्या राज्यातल्या मैत्रिणींनो आत्ता आपण भेटलेच पाहिजे अशी माधुरीची हाक आली आम्हांला,मग काय विचारता.. थंडी, वारा, पाऊस या सगळ्याचा विचार करत करत आम्ही समस्त युकेवासी मैत्रिणी "हो हो भेटायचेच" असा निश्चय करून तयारीला लागलो. :hhh: भावनाने लगेच ४ फेब्रुवारीचा मुहूर्त ठरवून टाकला. मग आमची चर्चा कोण कोण येणार, कोण काय खाणार, कोण नक्की किती लेअर्स घालणार अशा अनेक वळणांचा प्रवास करू लागली. दिवस ठरला, सगळ्या तयार झाल्या आणि मग चर्चेने एकदम मध्ये अल्पविराम, स्वल्पविराम मोड ऑन केला.