लेख

ममी सांगा कुणाची?

हॉलिवुडानं आपल्याला दिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी माझ्यामते दोनच! (दोनच का? तर लहानपणापासून दूरदर्शन खूप पाहिल्याने 'एक किंवा दोन बस्स!' हे घोषवाक्य मनात ठसलं आहे.) तर दुसरी गोष्ट म्हणजे अर्नोल्ड श्वार्झनेगर.. माहेरचा टर्मिनेटर, थांब कमांडो कुंकू लावते या महासुपरहिट कौटुंबिक अ‍ॅक्शनपटांचा महानायक! आणि पहिली म्हणजे ममीचे सिनेमे. 'द ममी' आणि '(तीच) ममी रिटर्न्स'.. अर्नोल्डविषयी बोलण्यासारखं खूप आहे. माझा पत्रमित्रसुद्धा अर्नोल्ड नावाचा स्पॅनिश मुलगा आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेम्यातल्या 'ला टोमाटिना'च्या नाचात माझ्या ताईनेसुद्धा भाग घेतला होता.

लेख: 

संजीवन आठवण

एक संजीवन आठवण.... मनी साठवण

२३ डिसेंबर२०१७ .........

बरोबर ४:३० वाजता सर्व मैत्रिणी - १२ जणी जय्यत तयारीनिशी सौ. किरण गोखले, हिचे घरी पोहचलो. तशी तिची तब्येत ठीक नसते म्हणून अर्धा तास आधी एकीने जाऊन आम्ही येत असल्याची पूर्व सूचना दिली होती. एक आगळा-वेगळा आनंद ओसंडून वाहत होता. किरणही छानशी तयार झालीच झेपत नव्हते पण.....
IMG-20171223-WA0092.jpg

आज आमच्या या सखीचा ८० पूर्तीचा वाढदिवस होता.

लेख: 

कोलंबस वारी - ४

नॅशव्हिल 

हे एक कोलंबस जवळचं छोटंस टुमदार गाव. खरं तर खूप फिरणं अपेक्षित नव्हतं या ट्रिपमधे. पण लेकाची नवीन गाडी अन त्यातून आसपास थोडं फिरणं तर झालच. मग तो संध्याकाळी घरी आला की एक लॉंग ड्राईव्ह व्हायचा. अशाच एका लॉंग ड्राईव्हला लेकाने हे नॅशव्हिल दाखवलं. माझी चित्रकला अन एकंदर कलाप्रेम त्याला चांगलच माहितीय, मग ह्या गावाला भेट देणं त्याने ठरवून ठेवलेलं :)

लेख: 

कोलंबस वारी -२

कोलंबस आणि भेटीगाठी 


इंजियानातलं कोलंबस एक छोटंसं गाव. मुळात हे खूप जुनं गाव. 1821 च्या सुमारास याला कोलंबस हे नाव दिलं गेलं. कोलंबस नावारुपाला आलं के तिथल्या कोलंबस- मॅडिसन रेल्व लाईनमुळे. अनेक उत्पादक संस्था तिथे उभ्या राहिल्या.  नोबलिट्ट स्पार्कस इंडस्ट्री ( Noblitt-Sparks Industries) , अॅरव्हिन इंडस्ट्री Arvin Industries - आताची मेरिटॉर (Meritor) , कमिन्स (Cummins, Inc)अशा अनेक इंडस्ट्रिज तिथे निर्माण झाल्या.

लेख: 

कोलंबस वारी - १

पूर्वतयारी 
मैत्रीण वरच्या अनेक मैत्रिणींनी कित्ती मदत केली, माहिती पुरवली. आणि जुलै मधे नाही पण ऑक्टोबर मधे अखेर मी लेकाकडे पोहोचले. अगदी व्हिसा काढण्यापासून विमानात बसण्यापर्यंत  बस्के, मृदुला, धारा, स्वाती २, सायो, रायगड, गौरी, मिनोती,  मोनाली,  लोला, मी अनु, आशुडी, चना, विनी, कविता, सन्मि, अकु,... सगळ्यांनी माझं येणं इतकं म्हणून सुकर केलं. तुम्हा सगळ्यांना थांकु थांकु थांकु Bighug

लेख: 

फुरुसातो नोझेई अर्थात आनंदी कर!

मिळकत कर अर्थात इन्कमटॅक्स भरणे, त्यासंबंधीचे वाचन, तो कसा कमी करता येईल यासाठीच्या कायदेशीर बाबी या गोष्टी आवडणार्‍या व्यक्ती विरळाच असतील. पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करणारे सीए वगैरे मंडळी आणि काही हाताच्या बोटावर मोजता येतील असे लोक (ज्यात माझा नवरा मोडतो) सोडले तर हा सगळा अत्यंत कंटाळवाणा, रूक्ष प्रकार आहे हे बहुतेक सगळे जण मान्य करतील. पण जपान सरकारने या वार्षिक करभरणीला एक वेगळेच परिमाण दिले आहे. आता कर वाचवण्यासाठीची तरतूद ही अत्यंत नीरसपणे एक काम उरकून टाकल्यासारखी करावी लागत नाही तर बरेच जपानी अगदी वेळ ठरवून सगळ्या कुटुंबाबरोबर बसून हसत खेळत हा कार्यक्रम पार पाडतात.

लेख: 

फुलपाखरू

मनीमोहोर यांचा रिटायरमेंट प्लॅनिंग वरचा लेख वाचुन मी माझ्या आईच्या रिटायर्ड लाइफ बद्दल लिहिलेला हा लेख आठवला, तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावा वाटला म्हणुन इथे देतीये,

********************************************************************************************

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

Keywords: 

लेख: 

पाने

Subscribe to लेख