सकाळी उठले तीच एका मंजुळ आवाजाने. तसा नेहमी येत असे, पण आज जरा जास्तच जवळून
अन खणखणीत. वृटिव्हSS, वृटिव्हSS, वृटिव्हSS
अन बाहेर हॉलमध्ये आले तर चक्क
टेरेसच्या बांधावर दोन बुलबुल साद घालत बसले होते. आधी टेरेसवरच्या बागेत सगळ्या
झाडांची पाहणी त्यांनी केली.