सृजनाच्या वाटा

'आनंदा'ची गाणी

या महिन्याचा विषय आहे आनंद!

तर त्या निमित्तानं आपण ज्या ज्या गाण्यांत 'आनंद' हा शब्द आला आहे ती गाणी, कविता इथे आठवूयात का?

मराठी, हिंदी दोन्ही चालतील. धृवपदात आनंद शब्द आला असेल तरी चालेल. ते धृवपद आणि ते गाणं/कविता दोन्ही लिहा मात्र.

Keywords: 

आनंदी चेहरे

आनंद व्यक्त करायचं सर्वात सहज आणि सुरेख साधन म्हणजे हसरा चेहरा... आपल्या आजूबाजूला किती वेगवेगळ्या प्रकारची स्माईल्स, हास्य आपण रोज बघत असतो.. ती फोटोन्मधून साठवून ठेवायला हा धागा!

"मला स्माईल्स कलेक्ट करायचा छंद आहे" असा काहीसा एक डायलॉग अनुशा दांडेकर तिच्या इंग्रजी मराठीत एका फिल्ममध्ये म्हणते. ( हे आपलं उगाच, पहिलं वाक्य लिहिताना आठवलं म्हणून...)
चला , आपणही हसरे चेहरे कलेक्ट करूयात :)

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

सृजनाच्या वाटा - नवा विषय सुचवा

सृजनाच्या वाटा हा एक कायमस्वरुपी उपक्रम आहे ज्यात दर महिन्याला नवनविन विषयांतर्गत तुम्हाला तुमची कला सर्वांपुढे सादर करता येईल. मार्च-एप्रिल २०१५ साठी विषय होता/आहे - वसंत ऋतु.

मात्र यापुढे आपल्या या उपक्रमासाठी विषय आपण सगळ्यांनी मिळून शोधूयात. हा धागा त्यासाठीच आहे. तुम्हाला सुचतील ते विषय इथे सुचवा. विषयाला काहीही बंधन नाही. सुचवलेल्या विषयांतून जास्त अनुमोदन मिळालेला विषय दर महिन्याला निवडता येईल.

Keywords: 

रंगांची उधळण (पाककॄती)

वसंत ॠतूत सर्वत्र रंगांची मुक्त उधळण दिसून येते. विविध रंगांची फुले पाहून मन प्रसन्न होते. अशीच रंगांची उधळण किचनमध्ये करता येईल का? असा विचार मनात आला. पण निसर्गातील हा रंगांचा खेळ जसा आपसुक जुळून येतो, तसं काहीसं अपेक्षित होतं. मग ठरवलं नैसर्गिकरित्या म्हणजे कोणताही कॄत्रिम रंग न वापरता काही रंगीत पा. कृ. करावी.

मायबोलीवर पारंपारीक रोडग्यांची पा. कॄ. मीच पोस्ट केली होती. इथे लिंक देते.

www.maayboli.com/node/49056

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

मोबाईल फोन केस - गार्डन थीम - लारा (वय वर्षे १२)

सृजनाच्या वाटा या उपक्रमासाठी लारानं बनवलेली एक खास गार्डन थीमची मोबाईल फोन केस. मोबाईल फोन केस - थीम डेकोरेशन या धाग्यावर तिने नटवलेल्या इतर फोन केसेसची प्रचि आहेत.

स्प्रिंग गार्डन

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

सृजनाच्या वाटा

सृजन म्हणजे जणू आपल्या अंतर्यामीचा उन्मेष!

या उन्मेषाचे विविध आविष्कार एका व्यासपीठावर आणण्याचा एक अभिनव उपक्रम आम्ही 'मैत्रीण.कॉम' वरील सर्व मैत्रिणींसाठी घोषित करत आहोत - सृजनाच्या वाटा.

या उपक्रमांतर्गत दर महिन्यासाठी एक विषय (थीम) निवडण्यात येईल. त्या एक महिन्याच्या कालखंडात या विषयाच्या अनुषंगाने सदस्य मैत्रिणींनी आपापल्या कलाकृती इथे सादर करायच्या आहेत. या कलाकृती कोणत्याही स्वरुपातील आणि / किंवा माध्यमातील स्वनिर्मित कलाकृती असू शकतील.

Keywords: 

उपक्रम: 

पाने

Subscribe to सृजनाच्या वाटा
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle