ऐल पैल

ऐल पैल 14 - सेफ्टी पिन

दहा मिनिटे होत आली होती. त्रिशा कॅफेसमोर रस्त्यावरच्या रहदारीचं निरीक्षण करत उभी असताना असताना समोरून नकुल परत येताना दिसला. कुठल्याशा पांढरट की तसाच नक्की शेड सांगता येणार नाही अशा अगदी साध्या, डल राउंड नेक टी शर्टमध्ये आणि ग्रे जीन्समध्ये तो प्रचंड हॅन्डसम दिसत होता. त्याच्या क्रू कटमुळे तर हा एखादा फुटबॉल प्लेअर वगैरे म्हणून नक्कीच शोभला असता, त्रिशाला वाटलं. या मुलाच्या आयुष्यात पूर्वी किती मुली येऊन गेल्या असतील, कमीत कमी प्रपोजल्स तरी, याला माहीत नाही अशा मुलींचा क्रश तर जरूर असेल हा! आज अचानक पायल येऊन गेल्यानंतर हा आपल्याला जास्त हँडसम वाटायला लागलाय, असं त्रिशाला वाटलं.

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 13 - फिल्टर कॉफी

"किचन इमर्जन्सी.." त्रिशाने दार उघडल्या उघडल्या नकुल म्हणाला.
"काय झालं?"
"बटाटेवडे, काहीतरी फसलंय...चल तू आधी, दाखवतो"
नकुलच्या मागोमाग त्रिशा त्यांच्या स्वयंपाकघरात गेली.
"बघ"
त्रिशाने पाहीलं तर कढईतल्या तेलात बटाटेवडे उकलून आतली भाजी तेलात पसरली होती. कढईच्या तळाशी जळालेल्या भाजीचे काळे कण साठले होते. एका डिशमध्ये काळपट, तेल पिऊन मंद झालेले दोन-तीन बटाटेवडे अर्धवट तळून बाहेर काढलेले दिसत होते.
"काय करून ठेवलंएस हे नकुल"? त्रिशा तो सगळा पसारा बघत म्हणाली.
"माहीत नाही, रेसिपीनुसारच तर केलं सगळं, पण समहाऊ हे नीट तळले जात नाहीयेत"

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 12 - फ्रॉम 305 विथ....

सकाळी पावणे सात वाजता त्रिशाची अंघोळ उरकली. ऑफिससाठी कपाटातुन कुर्ता बाहेर काढत असताना तिला खालच्या कप्प्यात ठेवलेली कापडी पिशवी दिसली. सुमंत काकूंनी गिफ्ट दिलेलं पर्पल क्रोशे जॅकेट! आज याचं उदघाटन करावंच असं ठरवून तिने तिचा प्लेन ब्लॅक कॉटन कुर्ता बाहेर काढला. जॅकेट पिशवीतून काढून हातात घेऊन दोन्ही हात लांब करत उलटं सुलटं बघून घेतलं. ग्रेट जॉब काकू, मशीन ने विणल्यासारखं फाईन विणलंय हे! गळ्यापासून पोटापर्यंत आलेले लोकरीचे दोन धागे आणि त्यांना लावलेले पॉम पॉम तिला विशेष आवडले होते. ऑफिसातल्या मुली पाहून वेड्याच होतील आणि याची रिप्लिका दुकानात कुठेच मिळणार नाही म्हणुन अजून वेड्या होतील!

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 11 - तटबंदी

"आणि त्याने किस केलं!" दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिस मधून आल्यानंतर चहा घेत त्रिशाने मीनाक्षीला पार्टीनंतरचा आणि नंतर सकाळचा वृत्तांत दिला.
"त्रिशा? एवढं सगळं दोन दिवसांतच? आणि तुमच्यात?
"झालं खरं!"
"माझ्याकडे आता सध्या खूप प्रश्न आहेत पण आधी त्यातल्या एकाचं मला मनापासून उत्तर दे"
"शूट"
"त्या किसबद्दल तुला काय वाटतं?"

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 10 - नकुल

आज सकाळी उठल्यावर बऱ्याच दिवसांनी त्रिशाला संपूर्ण मोकळं वाटत होतं. उठल्यानंतर पंधरा वीस मिनिटे तिने बेडवर बसून कालच्या सगळ्या गोष्टींची उजळणी करण्यात घालवले, विशेषतः रात्री तिच्यात आणि नकुल मध्ये जे काही घडलं होतं त्याची. पहिल्या दिवसापासून त्यांच्यात चाललेलं शीतयुद्ध काल रात्री कोणी काहीच न बोलता संपलं होतं यावर तिचा विश्वास ठेवूच शकत नव्हती. रविवार चा दिवस यापेक्षा अजून चांगला काय असू शकतो? मीनाक्षीचा आज दिवसभर ओम बरोबर वेळ घालवण्याचा प्लॅन होता त्यामुळे चक्क सुटीच्या दिवशी रडत का होईना ती उठून आवरायला लागली होती.

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 9 - वुडन क्लिप

आशिषने सांगितल्याप्रमाणे त्रिशा आणि मीनाक्षी त्यांच्या घरातून आशिषचं रॅप केलेलं गिफ्ट घेऊन बाहेर पडल्या. त्रिशाने वाइड, फ्रिल्ड नेक असलेला आणि कोपरापर्यंत स्लीवज्ला नेकसारखंच फ्रिल असलेला पिस्ता कलर्ड टॉप आणि नेव्ही ब्लु कप्रि जीन्स घातली होती. हलकासा मेकप आणि तिच्याकडे असलेली एकुलती एक मॅट कँडी पिंक लिपस्टिक तिने हो-नाही करत अखेर लावून टाकली होती. केसांचं मिडल पार्टिशन करून दोन्हीकडून एकेक बट ट्विस्ट करून मागे छोटीशी आडवी वुडन क्लिप लावली होती. मीनाक्षीच्या आवडत्या ब्लड रेड लिपस्टिकमुळे तिच्या फ्लोरल ग्रे ड्रेसकडे चुकूनच लक्ष जात होतं.

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 6- अनरियल टूर्नमेंट

त्रिशाने त्या दिवशीचं किल्ली प्रकरण अजूनही डोक्यात ठेवलंय असं नकुल ला वाटलं. हु केअर्स, एवढ्या बारीक सारीक गोष्टी एवढे दिवस ती लावून धरत असेल तर तो प्रॉब्लेम तिचा आहे. नकुलने आज त्याच्या पद्धतीने तिच्याबरोबर शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता पण तिचा ललिता पवार मोड ऑफ तर होतच नव्हता उलट सुमंत कुटुंबांच्या जागेवर त्यांनी राहिलेलं तिला आवडत नाहीये हे ही तिने स्पष्टपणे सुचवलं होतं. हा सगळा विचार करत जिने चढत तो वर आला. घरात आल्यावर कशाचाच आवाज येईना म्हणून तो आशिष च्या रूममध्ये डोकावला.
आशिष बेडवर पाय पसरून, मांडीवर लॅपटॉप घेऊन नेटफ्लिक्स सर्फ करत होता.
"हेय"
" हम्म"

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 4 - नवा शेजारी

सवयीप्रमाणे जिना चढत त्रिशा तिसऱ्या मजल्यावर आली. समोरच्या फ्लॅटचं दार उघडं होतं. शिफ्टिंग चालू असल्याच्या खुणा दिसत होत्या. दोन दिवस सुमंतांच्या बंद घराची तिने सवय करून घेतली होती, पण ते दार आज उघडं दिसलं आणि ती एकदम नॉस्टॅल्जिक झाली. त्यांनी आणि त्रिशा मीनाक्षीने एकत्र साजरे केलेले सण, वाढदिवस, सुटीच्या दिवशी पाहिलेले मुव्हीज, अंगतपंगत, न्यू इअर च्या रात्री उशिरापर्यंत पाहिलेले कार्यक्रम हे सगळं तिच्या डोळ्यासमोरून गेलं. त्या घराकडे तोंड करून शून्यात बघत ती उभी राहीली. अखेर पुन्हा वर्तमानात येत एकेक पाय वर घेत तिने सँडल चे बंद काढले, चपलांच्या कपाटात सरकवले.

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 3 - त्रिशा

त्रिशाला नोकरी लागली त्याच महिन्यात तिचे बाबा गेले. तोपर्यंत स्टॅटिस्टिक्स मध्ये पीजी ते कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये निवड ह्या गोष्टी झटपट आणि स्वप्नवत झाल्या होत्या. पहिल्या पगारात आई बाबांसाठी काहीतरी करायचं यावर रोज रात्री गादीवर पडलं की ती विचार करत असे. त्यातली आईबाबांसाठी नॉर्थ ईस्ट इंडिया टूर च्या पॅकेज ची कल्पना तिला मनापासून आवडली. बाबा अजून रिटायर्ड नव्हते त्यामुळे त्यांच्या हातात थेट तिकीटं देऊन उपयोग नव्हता. तसेच 'कशाला यात पैसे घालवलेस ते तुम्हा दोघींना सोडून आम्हाला एकट्याने जावं वाटणार नाही' यासाठी एक दिवस द्यावा लागणार होता.

Keywords: 

लेख: 

पाने

Subscribe to ऐल पैल
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle