एखादा सतत उत्साहाने खळाळता झरा पाहिला की मन कसं प्रसन्न होऊन जातं... अशी माणसं जेव्हा आपली जिवलग असतील तेव्हा राजहंसाच्या डौलदार चालीकडे पहात रहावंसं वाटतं.. खूप काही शिकत!
आमच्याकडे सहसा रताळे कशी संपवायची असा प्रश्न पडत नाही. पण यावेळी या ना त्या कारणाने रताळ्याचा वापर फारच कमी झाला. उरलेली रताळी संपवायची होती आणि थंडी-पावसात तोंडात टाकायला काहीतरी कुर्कुरीतही हवे होते तेव्हा मावेत रताळ्याच्या चिप्स केल्या. कृती अगदी सोप्पी आहे.
ह्या रविवारी नाश्त्याला तिखट आप्पे केले होते. म्हटलं बर्याच दिवसात कोणतीही नविन पाककृती केली/पोष्टली नाहिये. म्हनुन मग अनायासे आप्पे बनवलेच होते त्याची कृती लिहावी. (अर्थात इकडे सगळ्यांना महितीच असेल ह्याची कृती तरीही माझी पद्ध्त सांगते.)
शनिवारी सकाळी ऑफिसला निघता निघता १ वाटी उडीद डाळ, २वाट्या तांदुळ, आणी पाव्/अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुऊन भिजत घातली.
रात्री झोपताना हे भिजवलेले जिन्नस एकत्र मिक्सिमधुन वाटुन घेतले. डोस्याच्या पिठाएवढी कंसिस्टन्सी ठेवायची.
मी अमेरिकेत रहायला आले तेव्हा पानगळीचा ऋतू होता. भगवी, पिवळी, लाल, हिरवी पानं; सोनेरी, केशरी, पिवळट, धुळकट रंगाचे पायाशी पडलेले पानांचे गालिचे आणि रस्त्या रस्त्याच्या कडेला उभे असलेले उंच झाडांचे, मनाला आणि डोळ्याला दिपवून टाकणारे जिवंत कॅनवास; पानगळ होत असली तर हवेत नव निर्मितीची चाहूल होती असं मला वाटलं होतं. नवीन देशात ह्यापेक्षा दुसरं अनोखं स्वागत अजून काय असू शकतं? असं सगळं poetic वगैरे मला पहिले सात दिवस वाटलं असेल, मग साडे चार ला होणारा अंधार खटकायला लागला, थंडी बोचायला लागली.
हॉस्पिटल कॅफेटेरियामध्ये पाय ठेवताच कॉफीच्या वासाने, मेघनला चापटी बसल्यासारखी जाग आली; आणि तिला पोटात पडलेल्या खड्ड्याची जाणीव झाली. खड्डा जितका येऊ घातलेल्या testsच्या काळजीमुळे होता तितकाच भेकेमुळेही होता. ती रांगेत उभी राहिली. इतर लोकांच्या रेग्युलर कॉफ्फी, मोका, लाटे,शॉटस,बेगल,एग sandwich, मफ्फीनच्या ऑर्डर्स ऐकून तिला अनेक युगानपूर्वीचा तिचा एस्प्रेसो शॉटने दिवस सुरु होण्याचा काळ आठवला, जिभेला मात्र आता त्याची चव आठवत नव्हती.
“Mam would you like to place your order now?” काऊंटर पलीकडून प्रश्न आल्यावर मेघन परत भानावर आली.