December 2018

Opportunity

2012 सालापासून बर्क्लीमध्ये वर्षातला एक रविवार Sunday streets of Berkeley म्हणून साजरा केला जातो. Downtown मधले रस्ते सकाळपासून संध्याकाळी ६ पर्यंत रहदारीसाठी बंद केले जातात. सगळे स्थानिक व्यवसाय, रेस्ताराँट्स, बेकरीज, संगीत शाळा, लोकल बँडस, ब्रुअरीज, विनयार्डस, चित्रकार, शिल्पकार, रस्त्यावर छोटे टेबल्स, स्टाॅल लावतात;लोकं सायकलस आणि पायी फिरत शहर वेगळ्या पद्धतीने अनुभवतात. लहान मुलांना कुणीही न दटावता रस्त्यांवर बागडायला जणू मोठंच्या मोठं आंगण मिळतं. बेर्कली ह्या शहरात अनुभवण्यासारखं बरच काही आहे, पण Sunday Streets ला शहरात एक वेगळच फेस्टीव वातावरण असतं,धम्माल येते.

चटपटीत खमंग पौष्टीक मिरच्या

पोपटी कमी तिखट मिरच्या ८/१० - सधारण अर्धा सेमी इतके तुकडे करुन
लसुण ८/१० अगदी बारिक चिरुन

मोहोरी,
कलिंगडाच्या बिया मोठा चमचाभर
भोपळ्याच्या बिया थोड्या
तिळ साधारण दोन छोटे चमचे
कडीपत्ता २/३ पाने
आमचुर पावडर , मीठ - चवीप्रमाणे
थोडे तेल. ( सगळा ऐवज तेलात निट परतला गेला पाहीजे पण खुप अतिरिक्त तेल नको)

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

सफरचंदाची पोळी

सफरचंदाची पोळी:IMG_20181224_190538minalms.jpg
बऱ्याच वेळा पेशन्ट ला बघायला जाताना लोकं फळं घेऊन जातात. खूप सारी फळं आली की एखादा प्रयोगशील पेशन्ट असं काहीतरी करतो!
साहित्य: सफरचंदाचा किस एक वाटी, साखर पाऊण वाटी, दूध अर्धी वाटी, दूध पावडर 40 ग्रॅम( 10 रु ची दोन पाकिटं), वेलची पावडर, तूप एक चमचा
पारीसाठी: एक वाटी कणिक, एक चमचा बेसन, दीड चमचा तांदूळ पिठी, मीठ, दीड चमचा तेल

पाककृती प्रकार: 

क्रिस्मस बिस्मस

क्रिसमस-बीस्मस

“ जिंगल बेल जिंगल बेल ...” म्हणणारा लाल पोशाखातला बाबा, अमेरिकेतल्या आमच्या घरी आत्तापर्यंत डोकावला नव्हता. पण आता इराला कळायला लागलय... चांगलंच... आणि त्यामुळे पहिल्यांदाच आमच्याकडे पण मध्यरात्री सॅन्टा गिफ्ट्स देऊन जाणार आहे.

लेख: 

तुझमे तेरा क्या है - १

सकाळचे शार्प ८:००. मी ऑफिसच्या गेटवर उभी आहे. कसं असेल ऑफिस आता? बदलले असेल? की तसंच जसं मी सोडून गेले होते ४ वर्षांपूर्वी?
मी नक्की कशाचा विचार करतेय? ऑफिसचा की त्याचा? तो.. आज भेटणार इतक्या दिवसांनी. एकमेकांसमोर उभे राहणार आम्ही. काय बोलणार माहीत नाही.
ही माझी गोष्ट.
मी मीरा.
गोष्टीची सुरुवात होते पुण्यात.
पुण्यातली नावाजलेली आयटी कंपनी.
स्थळः एच आर ऑफिस.

लेख: 

तुझमे तेरा क्या है - २

"डू यू वाँट लिफ्ट?" निनाद विचारत होता.
"थँक्स. पण माझी बस येईल इतक्यात." मला खरंतर त्याने लिफ्ट हवी का असं विचारणं आवडलं नव्हतं. एका दिवसाच्या ओळखीत त्याच्या बाईकवर लिफ्ट घेणं मला पटणारं नव्हतं.
तो हसला माझ्याकडे पाहून, काहीतरी समजल्यासारखा, आणि आला त्या वेगात निघूनही गेला. मी मात्र तो का हसला असेल यावर घरी पोहोचेपर्यंत विचार करत राहिले.

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle