January 2019

ये तो बस ट्रेलर है! (आगामी चित्रपटांबद्दल चर्चा)

चित्रपटांचे ट्रेलर्स पाहून चर्चा करणे हे काम अगदी शाळेत असल्यापासून आपण ईमाने इतबारे करत आलो आहोत, मग इथेही करू! काय म्हणता? :ड
ये तो बस झांकी है, पिक्चर तो अभी बाकी है!

हिमाचल प्रदेश भटकंती

मार्च किंवा एप्रिल मध्ये मनालीला जायचा प्लॅन आहे. थोडी माहीती हवी आहे

१. मनालीला दिल्लीहून जावे का चंडीगडवरुन?
२. sightseeing साठी काही Suggestions
३. हॉटेलांची नाव
४. अजुन काही सांगण्यासख असेल तर

Keywords: 

चाकवत गरगटं

माझ्या आईची चाकवत गरगट्याची रेसिपी अशी:
चांगला ताजा बघून चाकवत आणणे. जाड, मोठ्या पानांचा आणलेला तिला आवडत नाही. मध्यम, मध्ये दाबली तर कटकन मोडणारी पाने असलेला असला तर मस्त.
निवडून घेतलेला चाकवत, अख्खे शेंगदाणे, थोडीशीच डाळ(हे पुलंच्या भाषेत वाचायचं झालं तर कोंबडीत मसाला कसा हवा, शराबी डोळ्यात सुरमा असावा तसा. म्हणजे भाजी चाकवताचीच वाटायला हवी, डाळीची किंवा शेंगदाण्याची नको) :)
आणि चवीला मीठ असं सगळं ती सरळ कुकरला लावून घेते. चाकवत लगेच शिजतो, जास्त शिट्ट्याची गरज नाही. मग रवीने ताक करतो तसा घोटून बारीक करायचा तो.

पाककृती प्रकार: 

मॅग्नोलिया (वॉटरकलर)

मी गेले २ वर्षे ब्रशपण हातात घेतला नव्हता. इथे गेले २ आठवडे बरीच थंडी होती म्हणुन पॉटरी पण केली नाही. हाताला काहितरी चाळा लागतो नाहितर वेळ सगळा फोनवर काहितरी बघत वाया जातो म्हणुन हे करुन पाहिले.

MK-Magnolia-WaterColor.jpeg

Keywords: 

कलाकृती: 

तुझमे तेरा क्या है - ३

अगं लक्ष कुठाय तुझं?, चल ना” निनादच्या आवाजाने मी पुढे बघितलं, तो प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहत दार उघडून उभा होता. मी झटकन पुढे झाले.
कोण असेल तो?
सिनीअर असेल कोणीतरी. त्याची ती थेट नजर आठवली.

लेख: 

फेरोंच्या देशात (ईजिप्त) भाग १ (पूर्वतयारी)

अगदी लहानपणी जेव्हा मला पुस्तकांचा भस्म्या रोग झाला होता तेव्हा हातात विजय देवधरांचे अनुवादित "स्फिंक्स" हे पुस्तक पडले होते. पुढे त्याचे ओरिजिनल रॉबिन कुक चे पण वाचले. पण त्या पुस्तकाच्या मुखपृष्टावरचा तो तुतनखामेनचा मुखवटा विसरले नाही. त्यापुस्तकाने आणि त्यातल्या इजिप्तच्या वर्णणाने मी पूर्ण भारावून गेले होते. कुठेतरी तेव्हाच हे सगळे एकदा तरी बघायचे आहे अशी बहुतेक खूणगाठ बांधली होती. कारण जेव्हा जेव्हा कुठे फिरायला जायचा विचार यायचा तेव्हा इजिप्त एकदा तरी उल्लेखले जायचेच. एकदा २००० मधे, एकदा २००६ मधे इजिप्तने हुलकावणी दिली होती. पण अखेर २०१८ मधे का होईना योग जुळून आलाच.

Keywords: 

मुलांना घेवुन करायची स्पेशल भटकंती

१० वर्षे वयाच्या मुलाला, घेवुन जरा लांबच्या प्रवासाला जायचा प्लान आहे.
बीच, अभ्यारण्ये असे चालेल.
देश/ देशा बाहेरची ठिकाणे सुचवावीत.

जाणे येणे, व्यवस्था, खर्च, कोणाचे अनुभव, अशी सगळी चर्चा इथे करुया.

Keywords: 

काळाकभिन्न अंधार ...

काळाकभिन्न अंधार...

काळाकभिन्न अंधार होतो का कधी कुठे?

अंधारात उजेड आणि उजेडात अंधार उधळतो, सगळीकडे.
रात्रीच्या अवकाशात, चांदण्यांसारखेच
उंच इमारतीत तरंगणारे दिवे;
त्या दिव्यामागची माणसं,
दिसणार नसतात रस्त्यावरच्या कुणालाच.
काळ्या रस्त्यावरून पुढे पुढे सरकणारी,
वाहनं आणि फ्लोरोसेंट परीधानांचे ठिपके वगळता
मनोर्यातल्या माणसांना दिसणार नसतात रस्त्यावरची माणसं.
पण एकमेकांना न बघता, न ओळखता,
जाणीव असतेच की विरुद्ध किनार्यांची.
वर-खाली, उंच- ठेंगणा, खोल सपाट
एकाच्या विरून जाण्याने दुसर्याचा कणा उध्वस्त,
एकाच्या ध्यासातून दुसरा होत नाही मुक्त.
आपआपल्या बेटावर,

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle