January 2019

प्रत्येक श्वास अनुभवावा - अर्थात माझे scuba diving अंतिम भाग

प्रत्येक श्वास अनुभवावा - अर्थात माझे scuba diving अंतिम भाग

———————————————————

सकाळी उठले तेंव्हा पाऊस नव्हता पण ढग होते. परत मनावर मळभ दाटायला लागलं... सगळं नीट होईल ना? तिथे काही झालं तर काय करायचं... तिथे म्हणजे पाण्याखाली... मला जर नीट श्वास घ्यायला जमलंच
नाही तर? कारण swimming टॅंक आणि समुद्र या दोन्हीत जमीन अस्मानाचं अंतर होतं.

Keywords: 

काळ्या तिळाच्या गूळ पोळ्या

काळ्या तिळाची गूळ पोळी:IMG_20160113_125917_647.JPG संक्रांत जवळ आलीय, म्हणून पोळ्यांची कृती आधीच देतेय. बघा या संक्रांतीला या पध्द्तीने पोळ्या करून! माझ्या माहेरी गूळ पोळ्यांसाठी काळे तीळ वापरायची पध्दत आहे या पोळ्या जास्त खमंग लागतात. काळे तीळ म्हणजे लांबडे कारळे तीळ नव्हे, पांढय्रा तिळांसारखे दिसतात ते.

पाककृती प्रकार: 

हिरव्या टोमॅटोची चटणी

ही माझ्या आजीची रेसीपी आहे. या आजीला मी दुर्दैवाने पाहू शकले नाही, माझ्या जन्माच्या आधीच ती गेली. पण तिच्या अशा अनेक रेसिपीज आई अजूनही आजीच्या म्हणून तशाच्या तशा करते. त्यातलीच ही एक.

साहित्य

२ मध्यम आकाराचे हिरवे टोमॅटो बारीक चिरून
२-३ हिरव्या मिरच्या
थोडासा कढिलिंब
फोडणीचे सामान (हिंग,मोहोरी,हळद, तेल)
तीळ २ टीस्पून
भाजलेले शेंगदाणे १/२ टेबलस्पून
चवीप्रमाणे मीठ आणि थोडा गूळ किंवा साखर

कृती

एका पॅनमधे फोडणी करून हिंग,मोहोरी,अगदी थोडीशी हळद आणि कढीलिंब यांची फोडणी करून घ्यायची.
त्यात भाजलेले दाणे घालून फोडणीत जरा खरपूस परतून घ्यायचे.

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

फेरोंच्या देशात (ईजिप्त) भाग २ पहिला दिवसः गिझाचे पिरॅमिडस

अशाप्रकारे फायनली आम्ही इजिप्त ना निघालो होतो. फ्लाईट रात्रीची (रादर पहाटेची) होती. इजिप्त एअरच्या सर्व्हिस बद्दल फार काही चांगले ऐकले नसल्याने आम्ही लवकर एअरपोर्ट ला पोचून चेकइन करून टाकले आणि मस्त लाऊंज मधेच जेवण उरकून घेतले. फ्लाईट ला गर्दी होती बरीच त्यामुळे अपग्रेड मिळाला आणि आम्ही मस्त झोपून टाकले. सकाळी ६ वाजता कैरोला पोचलो. फ्लाईट मधून उतरलो तर लगेचच आमच्या ट्रॅव्हल एजन्सीचा माणूस आमच्या नावाचा बोर्ड घेऊन उभा दिसला. नॉर्मली बाहेर पडल्यावर हे लोक भेटतात, पण इथे काहीतरी वेगळाच प्रकार होता.

बाजरीचे लाडू

मी दिलेलं नाव - काळे लाडू .. रंग तसाच असतो ना :P
फार सोप्पा अतिशय चविष्ट! पण उष्ण असल्याने वर्षातून एकदाच भरपूर तुप घालून खाता येतं.. :straightface:

कृती - बाजरीची भाकरी करायची .. मग थंड झाल्यावर भाकरीचा चुरा करायचा / मिक्सरमधून फिरवून घ्यायचं

पाककृती प्रकार: 

पुन्हा एकदा 'रात्रीस खेळ चाले'

तर सांगायचा मुद्दा असा की पुन्हा एकदा म्हणजे ह्या १४ तारखेपासुन रात्री १०.३० वाजता 'रात्रीस खेळ चाले' हि मालिका आपल्या झी वाहिनीवर सुरु झाली. इकडच्या किति मुली पाहत आहेत हि मालिका?

ह्या नविन सिरिजमध्ये फ्लॅशबॅकमध्ये काय घडलयं? नाईकांनी किती पापं केलित ते सगळं दाखवत आहेत. सुरुवात तर चांगली झालिय. बघु आता शेवटपर्यंत हि उत्कंठ तशीच राहते का? की गेल्या वेळेसारखच ट्यॅ ट्यॅ फिस्स होतय... :haahaa2:

चला तर मग येऊ देत तुमचेही दोन पैसे....

सूट - भाग 7

तिलु आपल्याच विचारात मग्न होती. चुकार दिवस आज खूपच रेंगाळला होता. खिडकीतून दिसणारा आकाशाचा तुकडा डोळ्यात साठवत ती विनूची वाट पाहत होती. नुकतेच अपग्रेड मिळून ते आता वरच्या मजल्यावरील सूटमध्ये शिफ्ट झाले होते. हा सरंजाम खरंतर विनूला कंपनीने आधीच करून दिला होता. पण ते आले तेव्हा काही कारणाने कोणताच सूट उपलब्ध नव्हता.

Keywords: 

लेख: 

सुरती ऊंधीयूं

अवलने उंधीयूंची रेसेपी लिहीली आहे. थोडी तिची कृती, थोडे इंटरनेट पाहून केलेले आणि थोडे मनाचे बदल असं मिळून ही पाककृती तयार झाली. डॉक्यूमेंटेशन होईल म्हणून इथे लिहीली. मी एका इव्हेंटसाठी केली होती. त्यामुळे भरपूर प्रमाणात केली, तेच प्रमाण इथे लिहीते म्हणजे कुणाला मोठ्या प्रमाणात हवी असल्यास उपयोग होईल.

साहित्य -

भाज्या -
१. बटाटे- ७ ते ८ मध्यम
२. रताळू (Purple yam) - ४ मोठे
३. भारतीय रताळी - ५ ते ६ मध्यम आकाराचे
४. इथे जे स्वीट पोटॅटो मिळतात ते २ मोठे
५. सुरती पापडी - दीपची फ्रोजन २ पाकिटं (ताजी मिळाली नाहीत म्हणून)

पाककृती प्रकार: 

तुझमे तेरा क्या है - ४

आता तो माझा बॉस असणार होता. अनिरुद्ध.
थोड्याच वेळात दुसरा मेल आला. ती meeting request होती. त्याने टाकलेली. one on one. संध्याकाळी ४ ला meeting होती. निनाद आणि मी कॉफी घ्यायला लवकरच गेलो.
“काय मग खुश ना? तुला हवी ती प्रॅक्टिस मिळाली.” मी निनादला विचारलं.
“हम्म” निनाद कसल्यातरी विचारात होता.
“काय झालं निनाद? लक्ष कुठाय तुझं?”
“काही नाही गं.”अजूनही त्याचं लक्ष नव्हतं.
“मला माहित आहे काय झालंय ते. तू तुझ्या आवडत्या प्रॅक्टिसमध्ये पण तुझा जीव मात्र दुसऱ्या प्रॅक्टिसमध्ये अडकलाय. मग कसा असणार तू खुश!” मी त्याला उगाच डिवचलं.

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle