ह्या गोट्याच तयार पीठही मिळत म्हणे. पण मागच्या वर्षी अहमदाबादला गेलो होतो तेव्हा काकुने हे गोटे केले होते घरी तयार पीठ न वापरता. घरी आल्यावर दोन तीनदा केले पण पाककृती लिहायची राहूनच गेली. काल एका गटग करता केले त्यांनाही खूप आवडले. त्यांनीही कृती विचारल्यावर इथे टाकायची आठवण झाली. सध्या बाजारात भरपूर मेथी आहे. काकुने सांगितलेली व मी कृतीत आणलेलीच कृती देतेय.
साहित्य : दोन वाट्या रवाळ कणिक, दोन चमचे बेसन, दोन वाट्या बारीक चिरलेली मेथी, दोन चमचे दही, धणे व मिरे एक चमचा भरड, मीठ, हिरवी मिरची व साखर चवीनुसार. हळद शास्त्रापुरती, चिमुटभर सोडा. तळणासाठी तेल.
खूप दिवस झाले हे खरडून ठेवले होते, आज टाकतीये. यामध्ये कुठलेही व्यक्त नाते नाही, स्त्री पुरुष असं नाही. तुम्हाला जी वाटेल ती व्यक्ती, ते नातं. आणि नावही मला काहीच वेगळे सुचले नाही.
स्ट्रॉबेरी लोणचे:
आता तुम्ही म्हणाल स्ट्रॉबेरी नुसती खायची सोडून हे उद्योग कशाला? पण काही वेळा आंबट निघतात मग असं चविष्ट करायचं!
साहित्य: दोन वाट्या स्ट्रॉबेरीचे तुकडे, पाव वाटी साखर, दीड टीस्पून लाल तिखट, मीठ, पाव टीस्पून मेथी, पाव टीस्पून मोहोरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, दोन टीस्पून तेल
काल whatsapp वर एक कविता वाचली.. तिला प्रतिसाद द्यायचा, म्हणून लिहायला लागले, तर मी जे लिहीलं तेच कवितेसदृश झालं. मैत्रिणी, नातेवाईकांना सहज म्हणून शेअर केलं, अनपेक्षितपणे मला त्यावर खूप छान प्रतिसाद मिळाले, म्हणून आज मैत्रीणवरच्या मैत्रिणींसोबत शेअर करत आहे.
तर, हवाईच्या सगळ्यात मोठ्या आयलंडवर म्हणजेच बिग आयलंडवर जायचे ठरले, तिकीटे बुक झाली, हॉटेलही बुक झाले. आता तिथल्या ८ दिवसांच्या प्लॅनिंगची जबाबदारी माझ्यावर होती. 'tripadvisor' या साईटवर 'things to do in Big Island Hawaii' असा सर्च टाकला आणि माहितीचे भांडारच उघडले माझ्यासमोर. पहिल्या दिवशी नुसतंच दडपुन जाऊन सर्च विंडो बंद केली आणि हॉटेलला फोन केला.
मी बघतच राहिले. तो इतका वेळ बाहेर थांबला होता! का? मी मेसेज करायला हवा होता का घरात आल्यावर? पण काय म्हणून? त्याच विचारात मला झोप लागली.
नंतरचा एक आठवडा थोडा निवांत होता. बरोबर एका आठवड्याने आमच्या ऑनसाईट टीमकडून मेल आला. रवी आणि माझ्या कामाचं त्यांनी कौतुक केलं होतं. माझ्या आयुष्यातला पहिला appreciation मेल! खूप मस्त वाटत होतं. त्या मेलला अनिरुद्धने रिप्लाय केला, ज्यात त्याने आमच्या दोघांच्या sincerity आणि हार्डवर्कचं
कौतुक केलं होतं. लगेचच त्याचा दुसरा मेल आला. आज टीम dinner होतं, to celebrate our team’s hardwork.
हवाईचे 'कोना' एअरपोर्ट अगदी छोटेसे आहे. एकावेळी एकच विमान लँड होत असल्याने फार कमी वर्दळ होती. १५व्या मिनिटाला सामान घेऊन आम्ही एअरपोर्टच्या बाहेर होतो. अंगातले जॅकेट्स, स्वेटर्स काढुन मोकळा श्वास घेतला. काय सुंदर, उबदार हवा होती. बाहेर भरपुर चाफ्याची, बोगनवेल आणि इतर फुलांची झाडे होती. मोठी नारळाची झाडे आणि पाम ट्रीज वगैरे तत्सम प्रकारही होते. आपण खरंच हवाईला पोचलोय हे स्वतःला सांगितले. एका झाडाखाली पडलेले चाफ्याचे फुल उचललेच न राहावुन.
- व्यक्तिमत्व विकास - दहावी परीक्षेनंतर मुलांचे वर्कशॉप
डिस्क्लेमर
१.मी 'मुलां'चे वर्कशॉप घेतले होते म्हणून उल्लेख "दिसतो, रहातो" असे केले आहेत. वाचताना मुलं, मुली दोन्हीसाठी योग्य ते क्रियापद वाचावे ही विनंती!
२. यात अजूनही बरेच अॅड करू शकता, तुमच्या गरजेनुरुप बदलूूूूही शकता.
३. ही केवळ रूपरेखा, आराखडा आहे.
---
पहिला दिवस
साध्य १ : स्वत: ला ओळखणे
"मी; दिसतो, राहतो, बसतो, बोलतो, उभा रहातो, चालतो, वागतो, हसतो, शेकहँड करतो, ऐकतो, विचार करतो, कृती करतो" कसा? हे आरशासमोर करून स्वत: बद्दल ठरवणे. इतरांची मतं ऐकणे.