March 2019

Chumash/north ridge trails

ह्या विकेंडला आम्ही घराशेजारच्या ट्रेल्स एक्स्प्लोअर करणे हे फार लाँग ड्यू काम हातात घेतले होते. दोन वर्षं झाली इकडे मुव्ह होऊन. पण आमचं काही होतंच नव्हते ट्रेलवर जाणे. शेवटी ह्या सीझनला इतका पाऊस पडला, सगळी व्हॅली जी एरवी ओसाड व पिवळ्या गवताची असते ती पूर्ण हिरवीगार झाली म्हटल्यावर जाणे भाग होते!

लिटरली घराच्या पलिकडच्या गल्लीत शिरून टोकाला गाडी नेऊन पार्क केली ती ह्या ट्रेलच्या तोंडाशीच. तिकडून असा नजारा दिसत होता.. हिरवाई पाहून डोळे निवले अगदी. ही Chumash trail..

1.jpg

Keywords: 

अधुरी एक कहाणी

कोणत्याही घरातले दागिने हे नुसतेच दागिने नसून त्याभोवती घरातल्यांच्या भावना ही गुंफलेल्या असतात. काही दागिने कुटुंबाचे पिढीजात म्हणून लाडके, काही आंनदाच्या क्षणांचे सोबती म्हणून आवडते. काहींच्या नुसत्या आठवणी ही मन अस्वस्थ करणाऱ्या. तर अशाच एका दागिन्याची ही मनाला भिडणारी गोष्ट.

लेख: 

कोल्हापूर आणि जवळपासची भटकंती

एप्रिलमध्ये कोल्हापूरला जायचे आहे, तर जवळपास अजून कुठे जाता येईल?
सोबत जास्त चालू न शकणारे ज्येना आहेत आणि 5 वर्षीय मुलगा.
स्थानिक भटकंतीत अंबाबई दर्शन, रंकाळा, सोलंकीकडच आइस्क्रीम, राजाभाऊंची भेळ हे नेहमीचे आयटम आहेतच.
खायला, प्यायला आणि भटकायला ठिकाणे सुचवा.
महाबळेश्वर कितपत feasible आहे?

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १

(प्रस्तुत लेखमाला काही वर्षांपूर्वी वेगळ्या मराठी संकेतस्थळांवर ट्प्प्याटप्प्याने प्रकाशित झालेली आहे. शक्य तिथे त्या संकेतस्थळांचा उल्लेख टाळून बाकी लेखात कुठलाही बदल न करता इथे आणतेय. या लेखमालेच्या काही भागांवर प्रतिसादात चर्चा झालेल्या मुद्द्यांना मी लिहिलेली उत्तरं टिपेच्या स्वरुपात जोडत जाईन. तरीही यातलं काही मैत्रीणच्या धोरणात बसत नसेल तर अ‍ॅडमिन टिम नक्की कळवा.)



----

मोनार्क

कॅनडातल्या एका छोट्या गावात रेल्वेलाईन शेजारच्या घरात खिडकीत बसून, रुळावरुन थडथडत धावणार्‍या मालगाड्यांची वाट बघत बसणं हा पाच वर्षाच्या छोट्या फ्रेडीचा आवडता छंद. मालगाड्यांची वर्दळ जेव्हा कमी होत असे तेव्हा रेल्वेलाईन पलिकडे पसरलेलं मोठ्ठ्च्या मोठ्ठं माळरान न्याहाळत बसणं हे फ्रेडीचं अजून एक काम. हिरव्यागार गवतात उगवलेली पिवळी-पांढरी रानटी फुलं,त्यावर घोंघावणार्‍या मधमाशा, रंगीबेरंगी फुलपाखरं, मधनूच भिरभिरणारे चतुर, फ्रेडी आपल्या पिटुकल्या डोळयांनी तासनतास निरखत बसे. एके दिवशी मांजरीच्या पिल्लासारख्या मऊमऊ अंगाच्या मधमाशीला पाहून अगदी न रहावल्याने फ्रेडी धावतच तिला पकडायला गेला.

Keywords: 

लेख: 

ऑलिव्ह रिडले प्रवास

मुख मेळेविण।पिल्लांचे पोषण।।ज्ञा.
किंवा
कासवांच्या पिल्लांना।दृष्टी होय पान्हा।।
जन्मतःच मेंदूत दिशादर्शक बसवलेले स्थलांतर करणारे पक्षी आहेत तसेच अनेक सजीव आहेत.
पण इथेतर चक्क पिल्लांना जन्म देण्यासाठी समुद्री कासवी सागरी प्रवास करून येते मंडणगड तालुक्याच्या 'वेळास समुद्र किनारी'.
सह्याद्रीच्या कुशीत तीन डोंगरांच्या कवेत वसलेले वेळास हे चिमुकले गाव आता प्रकाशात आलेय ते 'ऑलिव्ह रिडले ' या समुद्री कासवांच्या प्रजाती च्या प्रजनन व संवर्धन सोहळ्यासाठी.
हो एक नैसर्गिक अद्भुत घटनेचा सोहळाच.
फक्त इथे मानवी हस्तक्षेप एका सजग पर्यावरणीय पालकाचा.

क्विल्टिंग अर्थात कापडाच्या तुकड्यांची कलाकुसर

क्विल्टिंग अर्थात कापडाच्या तुकड्यांची कलाकुसर ह्यात मला खुप रस आहे. कापडाचे छोटे छोटे तुकडे जोडुन केलेली निरनिराळी डिझाईन्स पाहिली की मी थक्क होऊन जाते.

कलाकृती: 

कवितेच्या बनात...

एखाद्या मराठी कवितेची कुठलीही एक ओळ देऊ या

त्या कवितेच्या फक्त पहिल्या दोन ओळी आणि कवीचे नाव लिहा.
कविता ओळखणाऱ्या मैत्रिणीने पुढचे कोडे द्या.

वेडींग ड्रेस- 6

.....…......चार दिवस स्वतःला खोलीत कोंडून घेतल्यानंतर व्हिक्टोरिया ब्रेकफास्ट ला डायनिंग हॉल मध्ये येण्यास तयार झाली. मेजर विल्यम्सने तिच्या आणि हेन्री च्या लग्नाला असलेला विरोध काढून घेतला होता. हेन्री शहरातल्या गरीब वस्तीत आपल्या आईबरोबर राहणारा, वडील नसलेला, दुसऱ्यांच्या शेतीत राबून कष्ट करणारा मुलगा. तो एक उत्तम शिल्पकार होता. शिल्पकलेच्या विद्यालयात शिकून व्यावसायिक शिल्पकार होण्याचे त्याचे स्वप्न होते. पण शिक्षणासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी त्याने शेतकामे सुरू केली. लवकरात लवकर पुरेसे पैसे जमा करण्यासाठी तो दुप्पट कष्ट करत असे.

Keywords: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle