March 2019

वेडींग ड्रेस - 4

क्रिस्टन तिच्या घरी परतलली तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. क्रिस्टन ने मोबाईल चेक केला. "ओह शूट. वेडींग ड्रेस पिक्चर!" जेसीकाने तिला आजी आजोबांकडेच असताना ड्रेस चा फोटो पाठवला होता. पण दुपारी पडलेले अगम्य स्वप्न, आजोबांनी सांगितलेल्या माहितीने त्याच्या वियर्डनेस् मध्ये घातलेली भर या सगळ्या विचारांच्या गोंधळात ती ते ओपन करून पाहायचं पूर्ण विसरली. तिने फोटो डाउनलोड केला. ओपन केला. उंच, सुडौल बांध्याच्या, कमरेवर हात देऊन उभा असलेल्या मॉडेल ने वेडींग ऐवजी रॅम्प वर वॉक करायला निघाली आहे अशा थाटात तो ड्रेस घालून पोज दिली होती. तिला क्षणभर हसू आले. पण ड्रेस च्या ती प्रेमातच पडली.

Keywords: 

लेख: 

त्यानंतरचे दिवस - ४

"अच्छा. कैसा है तुम्हारा घर? आय मीन मी कधीच नाही गेलीय त्या भागात. कसं आहे तिथलं कल्चर?"
" मेरा घर तो.. बघ माझ्या घरात माई , बाबा आणि भय्या रहातात. मी सगळ्यात लहान. दोन मोठ्या बहिणींची लग्नं झालीयेत. त्या जवळच्याच गावांमधे आहेत. म्हणजे मी तिकडं गेलो की भय्याची बाई़क घेऊन दोघींच्या सासरी जाऊन येतो.
एकीला दोन मुलं आहेत. दुसरीला एक. " मग पुन्हा एक पॉज.
" बोलो ना. काय नावं आहेत तुझ्या भाच्यांची?" तो मला एकदम वळणावळणांच्या रस्त्यांवरून बाईक वरून जाताना दिसला. ऑलमोस्ट गाणं पण म्हणत होता तो.
आप्ल्या कल्पनाशकक्तीला आणि स्वप्नांना मुविजनि केवढा आधार दिलाय.

लेख: 

डॉमिनोज स्टाईल गार्लिक ब्रेड

गार्लिक ब्रेड
आमच्या घरी सगळ्यांना गार्लिक ब्रेड खूप आवडतो. नेहमी विकत आणतो, ह्यावेळेस घरी करायचाच विचार केला. नेटवर ४-५ रेसिपी पहिल्या आणि त्यातल्या त्यात सोप्पी रेसिपी करून बघितली . एकदम सोप्पी रेसिपी आहे. पहिल्याच प्रयत्नात छान जमला. फक्त वेळखाऊ प्रकरण असल्याने हाताशी वेळ असेल तेव्हाच करावे .

साहित्य - पाव कप दूध,
१ टि स्पून यीस्ट,
१ टि स्पून साखर,
२ चमचे लसूण पेस्ट,
१ चमचा ओरेगॅनो,
३ चमचे बटर
१ वाटी मैदा,
चीज ,मीठ, कोथिंबीर, तेल

कृती -
१. सर्वप्रथम गरम दुधात यीस्ट आणि साखर घालून छान एकत्र करून ५ मिनटे ठेवावे.

पाककृती प्रकार: 

त्यानंतरचे दिवस - ५

बेडवर आडवी झाले आणि जाणवलं की फार उशीर झाला नव्हता खरं तर. इतक्या लौकर आम्ही झोपत नाही. मी आणि शिबानी बरेचदा गप्पा मारतो बाल्कनीत बसून किंवा एकमेकींच्या रूममधे किंवा हॉलमधे आपापल्या लॅपटॉपस वर काम करत बसतो किंवा एखादी सिरिज एखादा मुवी मोबाईलवर बघत लोळतो निवांत.
पण आज माझं मला एकटं रहायचं होतं. असर उतरेपर्यंत कुणाशीही काहीही बोलताना उगंच टेम्पररी इंटेन्सिटीने डीटेल्स दिले जातील असं पण वाटत होतं. अंकितबरोबर अनुभवलेलं पण शिबानी बरोबर नुस्तं बोलून शेयर न करण्या सारखं काहीतरी होतं हे. असं कसं होतं?

लेख: 

घरोंदा

घरोंदा

© माधवी समीर जोशी, ठाणे

घर ..ह्या दोन अक्षरी शब्दांत किती आपलेपणा आहे ना. मला हिंदीतील घरोंदा हा शब्द मनाला खूपच भावतो. आपले अगदी लहानपणा पासूनच प्रत्येकांचे घराशी एक वेगळेच घट्ट नाते असते.

घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोत नुसती नाती

Keywords: 

लेख: 

ImageUpload: 

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-११ (गाला ते पुणे)

दिनांक ६ जुलै २०११ (गाला ते धारचुला)

1-DSC_4884.jpg

ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आमचा आजचा मुक्काम ‘सिरखा’ ह्या कँपला होता. पण नारंग सरांनी बरीच खटपट करून आजच धारचुलाला जायचं नक्की केलं होत. आमच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराला ही कल्पना अजिबात आवडली नव्हती. त्याच्या म्हणण्याप्रमाणे जाताना जे अंतर आम्ही आठवड्यात पार केले होते, तेच अंतर आता आम्ही चार दिवसात पार करणार होतो. खेचरांचा तेवढा वेग नसतो, अशी कुरकूर चालू होती.

Keywords: 

वेडींग ड्रेस -5

"स्टोअर रूम..." मिनीटभरानंतर व्यवस्थित जाग आल्यानंतर तिने थोडासा विचार केला आणि तडक उठली. बेडरूम मधून बाहेर आल्यानंतर उजवीकडे वळून हॉलवे मधून चालू लागली. तिच्या मनात आता भीती, कुतूहल अशा संमिश्र भावना तयार होत होत्या. उजवीकडेच फारशा वापरात नसल्या दुसऱ्या बेडरूम चा दरवाजा ओलांडून ती पुढे गेली. थोडंसंच पुढे एका लहान दरवाज्यासमोर येऊन थबकली. स्वप्नात दिसलेला दरवाजा हाच होता आणि ती मुलगीही ती स्वतःच होती!

Keywords: 

लेख: 

समाजऋण

समाजऋण
माधवी समीर जोशी, ठाणे

आपल्या प्रत्येकांला काही ऋण जीवनात चुकते करावें लागतात. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे ऋण समाजोपयोगी कामे करून,सगळे नियम पाळून, गरीब, दुर्लक्षित घटकांसाठी कामे करून काहीअंशी फेडू शकतो

Keywords: 

लेख: 

जागतिक महिला दिन : सुरुवात आपल्या घरापासून

महिला दिन: सुरुवात आपल्या घरापासून !

8 मार्च जागतिक महिला दिन जवळ आला की सुरुवात होते ती स्त्रिया किती मोठ्या पदांवर काम करतायत, कशा प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्यात याबद्दलच्या भारंभार भाषणाची! खूप साऱ्या स्पर्धा, सोशल मीडियावर शुभेच्छा... चला एक दिवस साजरा झाला की परत तेच रोजचं रहाटगाडगं सुरू होतं.

Keywords: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle