August 2019

भाग २ - भीमताल ते चौकोरी

पहिला स्टाॅप होता तो भीमताल!

M2bheemtaal.jpg

वनवासाच्या दरम्यान द्रौपदी तहानेने व्याकुळ झाली होती. भीमाने गदा मारून ज्या ठिकाणी पाणी काढलं तो हा तलाव म्हणजे भीमतालेश्वर! टीक मार्क करत पुढे निघालो.

दुसराही स्पाॅट होता तो ही टीक मार्कवालाच. नौकुचिया ताल म्हणजे नऊ कोन असलेला तलाव. तलावाला प्रदक्षिणा मारत पुढे निघालो.

Keywords: 

फोटोमधला तू

कालचीच गोष्ट, फोटोत तुझे डोळे पाहिले
दूरदेशीचे दोन तारे, विचारात गढलेले
मौनातूनच बोलले काहीतरी.
काश! मी तुला ते सांगू शकले असते...

असं वाटलं तू नाहीच आहेस तिथे
तुझं अस्तित्व लांब कुठेतरी जाणवतंय
कुठेतरी दूर, माझ्याबरोबर.
आणि तुझ्या चेहऱ्यावर कवडसे पाडणारं प्रेम
माझ्याकडच्या नक्षीदार आरश्यातून

तू आरश्यातून हळूच बाहेर पडतोस, शांतपणे
ढकलून देतोस स्वतःला माझ्या मिठीत
एखाद्या हरणाच्या डौलाने.
तुझ्या ओठातली आग पेटवत रहाते
एक अनोळखी दिशा

तुला पाहिलं, आणि तुझ्या फोटोत जगले
तुझ्याजवळ, खूप खूप जवळ
तरीही तू म्हणतोस
आनंदाचे दिवस अजून यायचे आहेत!

Keywords: 

राजाचं तळं अर्थात क्योनिग त्से

या वेळी अ‍ॅनिव्हरसरीला जास्त रजा मिळणार नव्हती, म्हणुन तीन-चार दिवसच जवळच कुठेतरी जायचं ठरलं.
ऑस्ट्रीयात साल्झबुर्गजवळ एक फिल्झमुझ नावाच अगदी छोटसं गाव आहे.

फिल्झमुझ हे मेनली हिवाळ्यात स्किइंगसाठी प्रसिद्ध आहे, पण ते आत्ता उन्हाळ्यातसुद्धा खुप मस्त दिसतं.
तिथुन परत म्युनिकला येताना क्यॉनिग त्सेला जायच ठरवल होतं.
जर्मनीला आल्यापासुन मी कायम क्यॉनिग त्सेच्या सुंदरतेबद्दल ऐकत होते, पण अजुन तिथे जाण्याचा योग आला नव्हता.

आता येता येता हे लेक तसं वाटेतच होतं, थोडीशी वाकडी वाट करावी लागणार होती पण क्यॉनिग त्सेसाठी काय पण.

भाग ३: चौकोरी ते मुन्सियारी

चौकोरीला आरक्षित काॅटेज उतारावर होतं. तिथून हिमायलाचा व्ह्यू मिळणार नसल्याचं तिथला अनुभव घेऊन आलेल्या भाच्याने सांगितलं होतं. बदलून एक्झिक्युटीव रूम मिळेल का ? फोनवर चौकशी केली असता अधिकारी म्हणाला की, "म्याडमजी, चान्स की बात है! उस दिन खाली होगा तो मिल जायेगा लेकिन पैसा वापस नही मिलेगा ना ही खानेमें एडजष्ट होगा." ऑफ सिजन असल्याने दुसऱ्या मजल्यावरची मोक्याची रूम मिळाल्याने आनंदच झाला पण वाईट ह्याचं वाटत होतं की अक्कलखातं वयाबरोबर वाढतच जात होतं कमी होण्याच्या ऐवजी! साधंसंच जेवून निद्राधीन झालो.


चौकोरी TRH काॅटेज

Keywords: 

माझ्या सानपंखी धिटूक पाखरास

तुझ्या इटूक देहाचे मुग्ध अथांगसे स्वर
माझ्या शब्दास धाडती अजाणसे गहिवर

तू बसता समोर तार होते ही कातर
पार होईना माझ्याने हे धिटूक अंतर

निरखता तुझा असा सानपंखी हा भरार
आक्रसल्या मना जडे मोह पंखांचा शारीर

नको नको देऊ अशी ही साद आरपार
मन लांघून देहास हरवेल नभापार

4891D533-040C-44D3-B413-40A9AE98B77D.jpeg

सुखाचा शोध

सुखाचा शोध

सुखाचा शोध घेताना
मला खुप काही सापडले
जे मी शोधत होते
ते मी प्रत्येक्षात पहिले
बाळ जेवलीस का आईचा स्वर
पैसे आहेत ना तुझ्याकडे बाबांची हाक
तुला काहीतरी सांगायचे आहे भावाची तळमळ
स्वतःला सांभाळ आजीची साद
खुप दिवसाने भेटल्यावर मैत्रिणीने मारलेली मिठी
तब्बेत बारी नसताना काळजी करणारी मुलगी
खुप थकलेली असताना नवऱ्याने फिरवलेला डोक्यवरून हाथ
खरंच अनुभवत होती मी सुख
आणि थांबवला सुखाचा शोध

कविता: 

भाग ४: चौकोरी ते मुन्सियारी

मुन्सियारी TRH वर गेलो. रुममधून थेट हिमालय दर्शन झालं पण अगदी थोड्या वेळाकरीता !

M4-himalaya1.jpg

संध्याकाळी नंदादेवी मंदिरात गेलो तिथून छान पंचचूली दिसत होतं पण तिथेही लगेच ढग आल्याने रूमवर आलो. पाऊस असेल तर भजी खाल्लीच पाहिजेत, शास्त्र असतं ना ते.....लगेच किचनला फोन! गरमागरम कुरकुरीत भजी मस्तच होती ती आयती मिळाल्याने जास्तच चविष्ट लागली. भज्यांचा आस्वाद घेत मॅच बघत बसलो.

Keywords: 

आईसलँड - भाग ७ - Hella to Höfn

भाग ६

सकाळ झाली, आई बाबा उठले, बॅग्ज भरल्या, मला तयार केलं आणि म्हणाले "चला परत नवीन ठिकाणी, या घराला बाय बाय करा, थँक्यू म्हणा आणि गाडीत बसून पुन्हा गणपती बाप्पा मोरया म्हणून पुढे चला." की आम्ही निघालो. रोज नवीन काहीतरी दिसतं म्हणतात, मला सांगत असतात आपण हे बघू, ते बघू, हे खेळू, ते खेळू, तरी अजून बर्फ दिसलाच नाहीये मला...... असं काहीसं सृजनच्या मनात या प्रवासाविषयी आता येत असेल का? अशा कल्पना करतच आम्ही चेक आउट केलं. आईसलँड मध्ये येऊन पाच दिवस होऊन गेले होते, राहण्याच्या जागा बदलत होत्या आणि आज तर प्रवास पण लांबचा होता.

बाकरवडी पराठे

आज फेसबुकवर ही रेसिपी लिहिली. इथल्या मैत्रिणींना पटकन सापडावी म्हणून इथे लिहून ठेवले.

काय लेकरांनो ! काय म्हणतं पाऊस पाणी ! फार दिसांनी भेटायला आले तर रिकाम्या हाती कशी येईन ? नेहमीच्या दशम्या धपाटे सोडून नवं काही आणावं म्हणलं :)

पाककृती प्रकार: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle