August 2019

वेडींग ड्रेस - 12 (शेवटचा भाग)

......
क्रिस्टन चा फोन खणखणला. आरशा समोरून ती तशीच तिच्या पर्सकडे गेली. जेसीका चा फोन होता.
" क्रिस्टन, गुड न्यूज. Carry's मधून मला फोन आला होता. तुझा ड्रेस आजच मिळतोय. इन फॅक्ट आताच. मी तिकडंच आहे आता. ड्रेस पीक केलाय आता बिलिंग च्या लाईन मध्ये आहे. आधी थेट घरीच येऊन सरप्राईज देण्याचं प्लॅन..
" जेसीका, ठेऊन दे तो ड्रेस. मला नकोय."
" काय? क्रिस ही जोक करण्याची वेळ नाही, चल बाय मी बिल पे करते"
" मी सिरीयस आहे. ठेऊन दे तो ड्रेस. मला नकोय. " क्रिस्टन थंड आवाजात शेवटचं बोलून फोन ठेवला.

Keywords: 

लेख: 

Macramé - मॅक्रमे - दोर्‍याच्या गाठींची कला

क्रोशे करतानाच पिंटरेस्टवर मॅक्रमे बघत होते आणि एक दिवस अचानक मॅक्रमेनं नटवलेल्या बाटल्या पाहिल्या आणि धाडकन प्रेमात पडले. धीर करून मग मी देखिल एक करून पाहिली.

e5c1694f-3f53-4b1a-9d82-49b3955f3fff.jpg

b5e76dc7-2e0c-4db7-bb29-614571d8dea7.jpg

कलाकृती: 

चांदणी चौक

लाल चौकोनी दिव्यांची अखंड मोहनमाळ
चहूबाजूंनी कर्कश्श उतू जाणारा पाऊस
काचांवर, पत्र्यांवर, सिमेंटच्या मातीवर

भर पावसाळ्यात पानोपानी वठलेले एक झाड
कुजणाऱ्या गवताचा गोडूस, रानटी गंध
चांदणं हरवून बसलेला एक स्तब्ध चौक

विझलेली नजर आणि शिवशिवणारे हात,
चौकोनाच्या आत, चौकोनाच्या वर
रग लागलेल्या गर्दीचे उभे दमट पाय

समोर काचेच्या तड्यांत फुटलेला एक सूर्य
अचानक उतारातून टोळीने घसटणाऱ्या
गुबगुबीत मेंढ्या, प्रत्येकीवर एक लाल ठिपका

Keywords: 

कविता: 

रॉक क्लायंबिंग - एक वेडा खेळ

आमच्या घरी इनडोअर आणि आउटडोअर रॉक क्लायंबिंगचे फार वेड आहे. नवरा आणि लेक बरेचदा इनडोअर रॉक क्लायम्बिंग जिमला जात असतात. उन्हाळा तर आउटडोअर रॉक क्लायंबिंगचा सीजन. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा बाहेर दगडांवर क्लायम्बिंग करायला ही मंडळी जातात. मागच्या विकेंडला रॉक क्लायम्बिंग हा आमच्याकडे एक फॅमिली इव्हेंटचं झाला. या दोघांच बघून मला ही स्फुरण आलं आणि मी जवळ जवळ दोन वर्षांनी रॉक क्लायम्बिंग केलं. या आधी मी एक दोनदाच बाहेर आणि दोन तीन वेळा जिम मध्ये क्लायम्बिंग केलं होतं . मागच्या वर्षी स्की करताना पडल्यावर माझ्या ऍक्टिव्हिटीजवर बराच निर्बंध आला होता.

Keywords: 

आईसलँड - भाग ६ - Reynisfjara & Skogafoss

भाग ५

Reynisfjara हा ब्लॅक सँड बीच सुरुवातीपासून जायचंच या यादीत होता. सकाळपासून ढ्गाळ हवामान होतं, पण हातात हा एकच दिवस होता. दुपारहून ऊन पडेल अशी शक्यताही दिसत होती. त्यामुळे मग निघालो. Vik हे एक त्यात्यला त्यात मोठं गाव आणि तिथूनच पुढे हा बीच.

.

भाग १ - जाना था जोशीमठ - औली पहुंच गए...


जाना था जोशीमठ - औली पहुंच गए....... मंजूताई

झालं असं की, या वर्षी लेक भारतात आल्यावर कुठेतरी जाऊ असं चाललं होतं, पण नक्की कुठे ते ठरत नव्हतं. जायला जमणार होतं तेवीस जून नंतरच. खूप धावपळ करायची नव्हती. चार दिवस एका ठिकाणी निवांत राहायचं होतं.

Keywords: 

बाटली डेकोरेशन आणि इतर

20190727_172116_0.jpg
20190625_141006_0.jpg

लेक पुण्यात रहायला गेला आणि मी अगदीच सैरभैर झाले, कितीही रेसिपीज केल्या तरी वाटे हा इथे नाही तर फोटो बघून वाईट वाटेल त्याला मग ते बंद झालं..
वेळ जायला काय करावं सुचेना.. मग परत एकदा गुगलवर शोधाशोध सुरू केली आणि सोप्प्या गोष्टी करायचं ठरवलं.

Keywords: 

हमिंगबर्ड सोहळा

नुकताच माझा अमेरीकेतला नव्या नवलाईचा संसार सुरु झाला होता. काही कामानिमित्त बाहेर पडलो. रस्ता एका हाउंसिंग सबडिविजनमधून जात होता. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे छोट्या फुलबागा बहरल्या होत्या. मला सगळेच नविन त्यामुळे गाडीच्या खिडकीच्या काचेला अगदी नाक लावून बाहेर बघत होते. एका घराच्या पोर्चबाहेर काचेचे लाल झाकणाचे काहीतरी टांगलेले दिसले. पुढे गेल्यावर तसेच एका आवारातील झाडाच्या फांदीला देखील टांगलेले दिसले.
"ते झाडाला लाल झाकणाचे बाटली सारखे काय टांगलय?" मी कुतुहलाने विचारले.
"हमिंगबर्ड फिडर." रस्त्यावरची नजरही न हटवता नवर्‍याने उत्तर दिले. कुतुहल शमायच्या ऐवजी वाढले.

लेख: 

माझ्या भारत देशा

तुझी आठवण येतेच रे....
तुझ्या अंगाखांद्यावर खेळत मोठी झाले. तुझ्या मातीत कित्येकदा धडपडले असेन. फुटलेल्या गुढघ्यांनी आणि रडून लाल झालेल्या डोळ्यांनीही तरी परत तुझ्याच कुशीत खेळायची धाव घेतली होती.
शाळेत गेल्यावर शिकलेली आणि पहिली पाठ झालेली गोष्ट. प्रतिज्ञा.
“भारत” माझा देश आहे.
त्यातलं ते सर्वात प्रथम येणारं तुझं नाव.
भारत.
ते अजूनही तसच येतं तोंडात.
या सुट्टीत ईंडियाला जाणार? ला उत्तर आपसूक येतं, हो भारतात जाणार आहोत.
मी आज इथे तुझ्यापासून हजारो मैल दूर.
का? मग तुझ्याजवळच राहू शकत होते कि वगैरे प्रश्न वेगळेच आहेत.
पण आजचं सत्य हे आहे कि मी तुझ्यापासून लांब आहे.

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle