मुलींनो मी 3 दुपट्टे बनवले आहेत....
3 च आहेत... दूसरे बनवणार आहे...
यांची किंमत मी सांगणार नाही...
ज्याना आवडेल त्यांनी मला संपर्क साधा..आणि शिपिंग चे पैशे मी सांगेन.. ज्याला त्या ओढण्यांचे जितके द्यायचे असतील ते द्यावेत...
मी है सर्वात आधी इथे टाकते आहे ... कोणाला दाखवले नाही
हे दुपट्टे अक्षरशः कुठल्या ही प्लेन कुर्त्यवर जातील...
परवा, म्हणजे १३ फेब्रुवारीला एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. आधीच पुस्तक म्हटलं की माझ्या आवडीचा विषय, त्यात ‘पुस्तकाचा विषय’ तर अति आवडीचा. बरोब्बर, मिलिंद सोमण!
वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं असतं ते मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं.
“ठकू, हे एवढं लांबरुंद कापड इकडून तिकडून गुंडाळायचं हा निव्वळ शिवण्याचा आळस आहे. किती गैरसोयीचं आणि अशास्त्रीय आहे हे.” शास्त्रीय मैत्रीण साडीवर वैतागत म्हणाली. ठकू विचार करत राह्यली.
भारतीय उपखंडातील गुंडाळलेल्या कपड्यांमध्ये काळानुसार आणि प्रांतानुसार भरपूर विविधता आहे. जेव्हापासूनचे पक्के संदर्भ मिळतात तेव्हापासून बघितले तर कमरेवर बांधलेले वस्त्र म्हणजे अंतरीय आणि शरीराचा वरचा भाग झाकणारे वस्त्र म्हणजे उत्तरीय आणि डोक्यावर बांधलेले वस्त्र हे प्रामुख्याने दिसते. स्त्रिया व पुरुष दोघांच्याही वेशभूषेत हे दिसून येते.
शोभाताईंनी अनुला बळेच उठवून बसवलं तशी मघापासून खुसुखुसु हसणार्या मुग्धाला त्याने तोंडावर बोट ठेवून गप्प बसायला सांगितले. पण नीलू आणि मुग्धा अधिकच हसायला लागल्या. आता मात्र अनु चिडला. पण सर्वांसमोर त्याला काही बोलता येईना. तसा त्याने मोर्चा त्याच्या सुमाक्का कडे वळवला-
"जेवायला मिळणार आहे का आज?"
त्याच्या प्रश्नाने गडबडून उठली सुमा.
"अगं बाई, हो हो" म्हणाणार्या सुमाला नीलुने पुढे होऊन खाली बसवलं.
"रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाहीये तुमच्या. मी आणि मुग्धा बघतो काय ते. तुम्ही बसा", अशी ताकीद देत ती आणि मुग्धा कामाला लागल्या.
(आयुष्यात अचानक आलेल्या वळणामुळे मैत्रीण वर यायला वेळच मिळत नाहिये. एका ग्रुपवर मैत्रिणींनी तू नक्की काय करतेस ते लिहून काढायला सांगितले. थोडक्यात लिहू म्हणत मोठाच लेख झाला. इथे प्रकाशित करतेय, म्हणजे इथल्या मैत्रिणींनाही कळेल.)
फूड स्टायलिंग प्रकाराशी ओळख भूषण (लेकाच्या मित्राचा बाबा) ने करून दिली. भूषण इनामदार हा पुण्यात बोटावर मोजण्याइतक्या फूड स्टायलिस्ट मधला एक होता. त्याची वेबसाईट http://www.bhushanfoodstyling.in/ जी आता आम्ही पुढे चालवतोय ती बघितली तर तो त्याच्या कामात किती अव्वल स्थानावर होता याची कल्पना येईल.
“हल्लीच्या मुलींना फार झाकपाक करायला हवी. माझ्या खापर खापर पणजीच्या काळात नुसते उत्तरीय वापरायचे. आम्ही जेमतेम स्तनपट्टे वापरले. आता मुलींना चोळ्या हव्यात. नखरे नुसते!” मौर्य काळाच्या अखेरच्या पर्वात तरुण असलेली एक पणजीबाई तिच्या गुप्त काळातल्या खापर खापर नाती, पणत्यांबद्दल वैतागत होती.