August 2021

आठवणींचा ठेवा ... आरामखुर्ची

मध्यन्तरी सपा च्या आरामखुर्ची च्या फोटोने मला माझ्या लहानपणात पोचवले. समरण रंजनात वेळ खूप छान गेला. म्हणून हे सपा ला डेडिकेट करतेय. थॅंक्यु सपा

आठवणींचा ठेवा ...आराम खुर्ची

मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर मैत्रिणीच्या पिकनिकचे फोटो बघत होते. लोकेशन सुंदर होतं. खोलीची छानशी गॅलरी आणि गॅलरीतून समोर दिसणारी हिरवीगार टेकडी, त्यावरून वहाणारे छोटे छोटे झरे, ढगांमधून सूर्य हळूच डोकावत असल्याने हिरवळीवर पडलेलं कोवळं सोनेरी ऊन ... फ्रेम अप्रतिम होती होती. पण माझं लक्ष वेधून घेतलं ते गॅलरीतल्या आराम खुर्चीने, जिने मला कमीत कमी पन्नास वर्षे तरी मागे नेलं.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - २९

घरी पोहोचताच रोजच्याप्रमाणे शॉवर घेऊन ती ताजीतवानी झाली. जुना वापरून पातळ झालेला ब्लॅक टॅंक आणि पांढरी पेझली प्रिंट असणाऱ्या पिंक शॉर्ट्स घातल्या. ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळून ती किचनकडे गेली. डायनिंग टेबलवर ठेवलेल्या फोनवर हळू आवाजात 'दिल का दरीया, बह ही गया..' सुरू झालं. वरण भाताचा कुकर लावून एकीकडे तिने संध्याकाळी ताजे मिळालेले दोन फडफडीत पापलेट साफ करून वर तिरके कट दिले आणि त्यांना हळद, मीठ, मसाला मॅरीनेट करून बाजूला ठेवले. सकाळचं बिरडं गरम करत ठेवलं आणि पटापट चपात्या करून टाकल्या. उरली सुरली भांडी आवरून तिने हातावर लिंबू पिळून हात धुतले.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - ३०

पलाश रिसॉर्टच्या किचनमध्ये शेफला उद्या येणाऱ्या गेस्टच्या फूड ऍलर्जीज आणि त्या टाळून करता येणारे पदार्थ यांची त्या गेस्टने दिलेली लिस्ट समजावून सांगत होता. तेवढ्यात मेसेजच्या आवाजाने त्याने फोन बाहेर काढला. नोराचा मेसेज? म्हणून त्याने पटकन उघडून वाचायला सुरू केला. Forgot to tell you that it's my parents 35th anniversary. We have to be there tonight. Could you be free by 7 pm? I am extremely sorry..

त्याने खोल श्वास घेऊन कपाळावरून हात फिरवला आणि लगोलग तिला कॉल केला.

'इतक्या' लवकर सांगितल्याबद्दल थँक्स! तो तिरकसपणे म्हणाला.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - ३१

"इज इट ओके?" त्याने चेहरा मागे करत विचारले.

"अम्म ओकेईश.. मला वाटलं होतं, प्रॅक्टिसने केमिस्ट्री थोडी वाढेल.." ती ओठांचा चंबू करून म्हणाली.

"तुला हवं असेल तर मी शिकवू शकतो.." तो भुवया उंचावून मिश्कीलपणे म्हणाला.

तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले आणि डेस्कवरची बाटली उचलून घटाघट पाणी प्यायली.

"एकटीला झोप येत नसेल तर माझ्या खोलीत जाऊन झोप. मी येतो काम संपवून." त्याने सहज सांगितले.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - ३२

पडद्याच्या फटीतून कोवळ्या उन्हाची तिरीप पलाशच्या डोळ्यांवर चमकल्यावर तो डोळे किलकिले करून कुशीवर वळला. शेजारी पाहिले तर बेड रिकामा होता. बाथरूमचे दार बंद होते. त्याने श्वास टाकत तिच्या बाजूच्या चुरगळलेल्या बेडशीटवरून हात फिरवला. त्याचा अजूनही कालच्या घटनांवर विश्वास बसत नव्हता आणि तो अजूनही आनंदात होता यावरही. तिने जे जे मागितलं ते सगळं त्याने तिला दिलं होतं. ही वॉन्टेड टू गो ऑन अँड ऑन. राउंड थ्री नंतर पहाटे कधीतरी त्यांना झोप लागली होती. नोरा वॉज अ फायर क्रॅकर! इट वॉज फायर, अंगातून ठिणग्या उडत होत्या. हवा तापली होती. तो प्रयत्न करूनही स्वतःला तिच्यापासून दूर करू शकला नव्हता.

Keywords: 

लेख: 

गोंगुरा चिकन

गोंगुरा म्हणजे आंबाडी. भारतात असताना लहनपणी, भाकरीबरोबर बर्याच वेळा आंबाडीची भरपूर लसूण घालून केलेली चटणी खाल्लेली, किंवा भाताबरोबर, तांदळाच्या कण्या घालून केलेली पळीवाढ भाजी पण खाल्लेली, पण ईथे आल्यावर काही वर्षापूर्वी पहिल्यांदा पॅरेडाईस बिर्याणी रेस्टॉरन्ट मध्ये आंध्र स्टाईल गोंगुरा चिकन खाल्लं आणि लव अ‍ॅट फस्ट बाईट झालं. पण घरी कधी करून बघितलं नव्हतं. अशात कधीतरी युट्युब वर इकडून तिकडे उड्या मारताना, फीड मध्ये दिसलं आणि मग १०-१५ वेगवेगळे विडियोज बघून, थोडं improvise केलं आणि अफाट झालं. म्हणून इथे लिहून ठेवतिये. प्रमाण वैगरे अनदाजानेच.

पाककृती प्रकार: 

लोटस

आता उद्या शाळा सुरु होणार म्हणून मागच्या आठवड्यात कप्पा आवरताना लेकीला तिचीच जुनी चित्रं सापडली आणि त्यातल्या चुका पण सापडल्या. त्यामुळे त्या दुरुस्त करुन त्याच कॅरॅक्टरच नविन चित्र काढलं आहे. ह्या वेळी पहिल्यांदाच तिला काय वाटलं जुनी चित्र सापडल्यावर आणि हे नविन काढताना ते पण तिने व्हिडीओ मध्ये सांगितल आहे.
नक्की बघा :)
०.१२ नंतर दिसतोय व्हिडीओ काहीतरी अपलोड करताना गडबड झाली आहे.

Keywords: 

कलाकृती: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle