August 2021

जर्मनीतले वास्तव्य - भाग ४ - खाद्यसंस्कृतीची तोंडओळख

सुपरमार्केट मध्ये जाऊन नुसत्या वस्तू बघणे, खरेदी करणे हे तसं सोपं होतं, त्यातून डिजिटल युगात बिलाचे आकडे समोर दिसतात, काही खाणाखुणा लागत नाहीत. तिथे वस्तू शोधताना चित्रं असतात बरेचदा, सेक्शन प्रमाणे पदार्थ वर्गीकरण करून मांडलेले असतात त्यामुळे भाषा नवीन असली, अनेक शब्द नवीन असले तरी ते समजणं या इतर गोष्टींमुळे सोपं होतं, नवीन काही शोधायचं असेल तर घरून आधीच इंटरनेटच्या मदतीने शब्द शोधून मग ते बघता यायचं. आता इथे भारतीय पदार्थ मिळतात याचं कौतुक असलं आणि घरी नवीन प्रयोग करण्याचा उत्साह असला, तरी बाहेर खाण्याची हौस पण असतेच.

Taxonomy upgrade extras: 

जर्मनीतले वास्तव्य - भाग ५ - जर्मन रविवार

इथे येऊन एकेक अनुभवत असताना इथली कमालीची शांतता हा एक मोठा फॅक्टर असतो. भारतातले गाड्यांचे हॉर्न, सकाळी सकाळी वाजणारे रिव्हर्स हॉर्न, कुत्र्यांचे आवाज, लिफ्टचे आवाज, असे कितीतरी आवाज आपल्याला रोज सकाळपासून ते रात्रीपर्यंत इतके सवयीचे असतात, की अचानक यातलं काहीच ऐकू येत नाही हे खूप वेगळं जाणवतं. नवीन कुणीही इथे आल्यानंतर "किती शांतता आहे इथे" असा उल्लेख समोरच्यांशी बोलताना येतोच.

Keywords: 

रूपेरी वाळूत - २२

ती समोर उभ्या असलेल्या इव्हा वगैरे कझन्सच्या ग्रुपकडे जाऊन हसत काहीतरी गप्पा मारू लागली. अजूनही तिच्या हातापायांतून वीज सळसळत होती.  कोणीतरी तिच्या हातात स्पार्कलिंग वाईनचा ग्लास दिला. तिने घोट घेताघेता समोर गार्गीला कडेवर घेऊन दादाबरोबर बोलणाऱ्या पलाशकडे पाहिले. तिच्याकडे त्याची पाठ होती. पण घामेजल्या पाठीला चिकटलेल्या टीशर्टमुळे त्याचे खांदे आणि मसल्स उठून दिसत होते. पाचच मिनिटांपूर्वी तिचे हात तिथे असल्याचे आठवून तिच्या अंगावर पुन्हा शहारा आला. 'डॅम यू गर्ल, भानावर ये' तिने स्वतःला पुनःपुन्हा बजावले.ती बघत असतानाच अचानक त्याने वळून तिच्याकडे बघितले. परत तेच नो इट ऑल स्माईल! शिट!

Keywords: 

लेख: 

रोडट्रिप - २

ओहाय - ह्या व्हॅली ऑफ मून मध्ये आम्ही पोचलो तेव्हा सूर्य आग पाखडत होता. मला इथली छोटी खेडी फार आवडतात. बहुतांश खेड्यात एक मोठा मेन रस्ता असतो, ज्यावर पोस्ट ऑफिसपासून ते बारपर्यंत सगळी दुकानं असतात. चुकून एखादं चुकार दुकान जे आतल्या गल्ल्यांत लपलेलं असतं. तिथे जाताना आपल्याला लोकल राहणाऱ्यांची छोटी मोठी टुमदार घरं दिसतात. प्रत्येक घराला एक स्वतःच स्वतंत्र व्यक्तित्व असतं. साच्यातून काढलेली सबर्बन घरं बघायची सवय असलेल्यांना (म्हणजे मला) हा चांगलाच रिफ्रेशिंग ब्रेक असतो.
तर ओहाय तसंच होतं/ आहे.

रोडट्रिप - ३

दिवस दुसरा: आजचा प्लान म्हणजे ओहायमधून सॅन्टा बार्बरामार्गे साॅल्व्हॅंगला मुक्कामी पोचणे.

प्रत्येक गावात साधारण काय करायचं हे आमच्या डोक्यात असलं तरी दर आदल्या रात्री थोडा वेळ इंटरनेटवर घालवून दुसऱ्या दिवशीचा प्लॅन, कुठे काय जेवायचं, कोणत्या ठिकाणी जायचं हे फायनल करत होतो. सॅन्टा बार्बाराचं नॅचरल हिस्टरी म्युझियम गुंडाबाईसाठी इंटरेस्टिंग वाटत होतं पण ते नेमकं बंद होतं. मग असंच किड फ्रेंडली ऑप्शन्स शोधताना ऋ ला लिल' टूट्स नावाची बोट राईड दिसली. ती करायची ठरवलं.

रूपेरी वाळूत - २३

सगळीकडे अंधार दाटला होता. तिच्या अंगावर शाईसारखा पाऊस कोसळत होता. कुठेतरी वीज कडाडली आणि पावसाचे थेंब सुईसारखे टोचू लागले. तिच्या तोंडावर एक पंजा दाबला गेला आणि पाठ मागच्या ओल्या खरखरीत दगडी भिंतीला चिकटली. तोंडावरचा हात बाजूला होऊन त्याचा चेहरा तिच्यासमोर आला आणि तिने किंचाळायला तोंड उघडले. तिच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता तरीही तशीच मुक्याने किंचाळत राहिली.

Keywords: 

लेख: 

'ट' ट्रेडमार्कचा - भाग १ - बौद्धिक संपदा (Intellectual Properties)

नमस्कार !!

गेली १४ वर्षे बौद्धिक संपदा या क्षेत्रात काम केल्यानंतर आणि १००० हुन अधिक ट्रेडमार्क एकहाती रजिस्टर केल्यानंतर याबाबतीत थोडी माहिती सर्वांना द्यावी असं वाटलं म्हणून एक छोटोशी लेखमालिका सुरु करते आहे. आवडली तर नक्की कळवा. तुमच्या शंका, सूचना, प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत आहे.

ट्रेडमार्क विषयी बोलण्याआधी आपल्याला भारतात आणि भारताबाहेर ओळख असलेल्या विविध बौद्धिक संपदा (Intellectual Properties)आणि त्यांच्या अधिकारांविषयी (Rights) समजून घेणे अनिवार्य आहे.

बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय?

Keywords: 

सदर्न कॅलिफोर्निया रोडट्रीप

खूप कंटाळा आला होताच आणि सक्तीची सुट्टी जी मिळालीये ती एन्जॉय तरी करू म्हणून आम्हाला रोड ट्रिप करायची होती पण त्या ट्रीपवर आम्हीच बरेच कन्स्ट्रेन्ट्स घातले होते. मुख्य म्हणजे अति गर्दीची ठिकाणे, अम्युजमेंट पार्क्स वगैरे नको, उन्हात तळपायचं नाही, गोंगाटाची ठिकाणं नको, एका दिवशी दोन ते अडीच तासांपेक्षा जास्त प्रवास नको आणि गुंडाबाईसुद्धा एन्जॉय करेल अशी ठिकाणं पाहिजेत.
एवढे कन्स्ट्रेन्ट्स, हॉटेल्स आणि ठिकाणांकडूनच्या आमच्या स्पेसिफिक अपेक्षा वगैरेमुळे अर्थातच प्लॅन करताना बरीच चर्चा, मध्ये मध्ये (माझीच) चिडचिड वगैरे होऊन एकदाची ट्रिप प्लॅन झाली.

रोडट्रिप - ४

सॉल्वँग -

तर सुट्टीचा मूड सुरु झाला. रोज सकाळी साडेसहाच्या ठोक्याला जाग न येता आरामात साखरझोप घ्यायला सुरुवात झाली. सकाळी उठून, आवरून आम्ही ब्रेकफास्टसाठी निघालो. सॉल्वँग हे गाव तिथल्या बेकरीज आणि बेकरीमधल्या डॅनिश कूकीज आणि पेस्ट्रीजसाठी प्रसिद्ध आहे.

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle