तीन वाजले तरी नोराची सर्जरी सुरूच होती. पलाश दोन अडीच तासांपासून पिंजऱ्यात कोंडलेल्या प्राण्यासारखा कॉरिडॉरमधल्या खुर्चीत बसून होता. एव्हाना त्या जागेचा इंचन इंच त्याने येरझाऱ्या घालून संपवला होता. खिडकीत उभा राहूनही त्याच्या डोळ्यांना बाहेरचं काही दिसत नव्हतं. ममाला ऐकू येऊ नये म्हणून माया मधून मधून व्हॉट्सऍपवर त्याला अपडेट विचारत होता. त्याला उत्तर देऊन शेवटी तो पुन्हा त्या खुर्चीत तळहातांत चेहरा बुडवून बसला.
सर्वांना दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सवी कलेक्शन २०२१ - दागिने
सण, उत्सव ही परंपरा असते. परंपरेला धरून अनेक गोष्टी आपण करतो त्यात सणासुदीचे स्पेशल कपडेलत्ते, दागिनेही आले. तेही पारंपरिकच असतात. पण जसेच्या तसेच नुसते अनुकरण करण्यापेक्षा परंपरांकडे नवीन प्रकारे, आजच्या काळाच्या दृष्टीकोनातून बघणे आणि त्या प्रकारे परंपरांच्यात बदल करणे हे ही गरजेचे असतेच.
येत्या ४ ५ दिवसातच तोच तो आपला लाडका ऑक्टोबर सुरु होतोय आणि २०१८ पासुन मैत्रिणवर दर ऑक्टोबरला इन्क्टोबरचे वारे वाहतायत त्यालाच अनुसरुन यंदा ही ती प्रथा पाळावीच लागेल ना
पण ही प्रथा जाचक नाही हा नवनिर्मितीचा आनंद देणारी, उत्साहाने भारलेली अशी प्रथा आहे तर मैत्रिणींनो तुम्ही तयार आहात ना इन्क्टोबर चॅलेंज साठी?? आपापली आयुधे तयार ठेवा बघू.. म्हणजे आपले स्केच बुक, पेन्स, ईन्क्स, ब्र्श ई... ३१ ऑक्टोबर पर्यंत धम्माल करु.
तर सोलापुरात आणि फक्त सोलापुरातच, पाव चटणी नावाचा एक चाट प्रकार मिळतो. आणि तीच चटणी वापरून चटणीपुरी आणि कचोरी पण मिळते. लहानपणीच्या असंख्य आठवणी आहेत या दोन्हींबरोबर! असला अफलातून प्रकार आहे नं हा, आणि सोलापूर बाहेर कुठेच दिसला नैय्ये (मला तरी)! शाळेत असताना, भैय्याची गाडी, अपने एरिया मे लय वर्ल्ड फेमस होती. बहुतेक त्यानेच सुरु केली असवी ही. मग पार्क कट्ट्यावर च्या गाड्यांवर, सातरस्त्याच्या बाबुराव भेळ कडे आणि इतर अनेक ठिकाणी मिळू लागली.
कसली भारी चटणी असते, आणि नक्की काय काय घालत असावेत ते जाम कळायचं नाही. पण गेल्या भारत वारीत लहान बहिणीच्या साबांकडून रेसिपी मिळाली!
सर्जरीपासून चार दिवसांनी नाकातले पॅकिंग काढल्यावर ते ऑलमोस्ट कपाळापर्यंत आत होते हे कळून, इतके दिवस कडकपणाचा आव आणणारी नोरा ढासळली. पलाशने खांदे धरून ठेऊनसुद्धा तिचे हुंदके थांबत नव्हते. पण इतक्या दिवसांचा सगळा त्रास डोळ्यांवाटे वाहून गेल्यावर तिला मोकळं वाटलं.
२०२० च्या फेब्रुवारी महिन्यात ही माझ्या कडे आली. एका मैत्रीणीची सायकल , तिला उंच होते म्हणून , माझ्या घरी पोचती झाली . धावणे , चालण्याचे अल्ट्रा एव्हेंट ,ट्रेक्स , जिम , चुकुन्माकून योगा यापलिकडे व्यायामासाठी इतर विचारच केला नव्हता . आता ही राजकन्या आलीच म्हटल्यावर तिला पहिला महिना तर कोपर्यात उभ केलं . कोपर्यातली राजकन्या अडगळ वाटून घरच्या ओसिडी मेंबरानी , क्रमाक्रमानी , अस्वस्थता, कुर्कुर, त्रागा दाखवायला सुरवात केली. पुढचा टप्पा गाठायच्या आधी मी राजक्न्येची ( हिच नाव सोफी ठेवलेल तिच्या पहिल्या सखीनी) जरा डाग्डुजी करुन आणली .
"ऊंss कोण आसा काय दवाखान्यात?" पांदीतल्या गावकराच्या गडयाने रस्त्यात बैलगाडी थांबवून हाक मारली.
कीबोर्डवर पळणारी नोराची बोटं थांबली. ती पीसीसमोरून उठून दरवाज्यात आली.
"अरे डॉक्टरीण बाई! तुम्ही केंना आयलात? बरें मां?" तिला बघून गडी लगेच खाली उतरला आणि हौद्यातून एक भुरे, गुबगुबीत वासरू उचलून आत घेउन आला. अंगणात बांधल्यावर वासरू मान टाकून मलूल पडून राहिले. "होss " म्हणत तिने वासराचे निरीक्षण केले.
"रमेशss" तिने मोठ्याने हाक मारली तरी पडवीच्या सावलीत, बाकड्यावर डुलकी लागलेला रमेश ढिम्म हलला नाही.