जर्मन आणि जर्मनी हे दोन वेगळे शब्द आहेत हेच मूळात अनेकांना माहीत नसतं. तर जर्मनी हा देश आहे आणि त्यांची जर्मन ही भाषा आहे. याच जर्मन भाषेला मूळ भाषेत दॉइच (Deutsch) हा शब्द आहे तर जर्मनीला दॉइचलांड (Deutschland) हा शब्द आहे. या लेखात जर्मनीतल्या वास्तव्यातला भाषा शिकण्याचा प्रवास, अनुभव, भाषा येत असण्याचे बरे वाइट परिणाम, बदलत गेलेला दृष्टीकोन, भाषा अंगवळणी पडण्याचा प्रवास याबद्दल.
शिकत असताना क्लास मध्ये सगळे माझ्या सारखेच शिकाऊ होते, नीट विचार करून आणि रोजच्या अभ्यासातून वाक्यरचना, व्याकरण हे सगळं जास्तीत जास्त बरोबर जमवता यायचं, तसा वेळ पण मिळायचा. पण बाहेर तेवढा वेळ ना समोरच्याचं ऐकायला मिळायचा ना बोलायला. समोरच्याचं ऐकून प्रोसेस करून त्यातल्याच एखाद्या शब्दावर गाडी अडून बसली की उत्तर अजून लांबायचं. मग यातून कधी वाक्यरचना चुकायची, कधी शब्दच आठवायचे नाहीत. किंवा व्याकरण आठवून बोलताना एक वाक्य पूर्ण व्हायलाच खूप वेळ लागायचा. या भाषेतून आपण आपला मुद्दा समोरच्याला सांगणे हा एकच उद्देश ठेवला तर सहज बेसिक बोलता यायचं.
आमचे एक मित्र कुटुंब सद्ध्या अतिशय खडतर काळातून जातंय. नवीन बाळ, आईला तातडीच्या हार्ट ट्रान्सप्लांटची गरज, कुटुंबातील ज्येष्ठांच अचानक कॅन्सर डायग्नोसिस आणि मृत्यू अशा अनेक मोठ्या अडचणीतून मार्ग काढायचे प्रयत्न सुरू आहेत. यासर्वात मदत करायला, परदेशी ईथे, मित्र परिवार तर आहे पण मेडिकल एक्स्पेन्सेस या सर्व मदतीला पुरून उरणारे आहेत. आम्ही सगळे जमेल तितकी आर्थिक मदत जमवत आहोत. त्याकरिता गोफंडमी चे फंडरेजर सुरू केले आहे, त्याची लिंक खाली देत आहे.
तुम्हालाही शक्य असल्यास मदत करा,प्लिज हेल्प स्प्रेड द वर्ड. या कुटुंबासाठी प्रार्थना करा.
खरंतर कलाकृती विभागात याचा धागा काढणं मजेदारच आहे. पण बाकी कोणत्या गटात बसेल हेही वाटेना. म्हणून इथे काढला धागा. दुसरीकडे हलवायला हवा असं वाटलं तर सुचवा.
नवीन काही दिसलं की लगेच त्याच्या मागे धावायचं, अशी माझी हौस असतेच कायम. त्याला अनुसरून हे प्रकरण बघितल्यावर लगेचच विशलिस्टमधे जाऊन बसलंच होतं. मला वाटतं तीनेक वर्षं तरी झाली याला. फायनली काल मुहूर्त लागला. पण आता जरा शहाणी (जराशीच हां) झाल्यामुळे लगेचच सगळा कच्चा माल मागवला नाही. आहे त्या सामानात करून बघू, जमलं, हौस टिकली तर पुढचं सामान मागवू असं ठरवून हे कोकोडेमा बॉल्स करून बघितले आहेत.
भारतात लेखनकलेचा उगम कधी झाला हे पुरेशा पुराव्यांअभावी शोधून काढणं कठीण आहे. यावर बरीच मतमतांतर आहेत. तरीही, अशोकन शिलालेख म्हणून ओळखल्या जाणार्या दगडावरील शिलालेख हे भारतीय लेखनाचं उदाहरण मानलं जातं. हे शिलालेख दोन लिपींमध्ये लिहिलेले आहेत: एक खरोष्टी आणि दुसरी ब्राह्मी. खरोष्टी लिपी ही प्राचीन इंडो-इराणी लिपी. ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकात सध्याच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये याचा वापर करण्यात आला. ब्राह्मी लिपीत जे शिलालेख सापडले यात काही सध्या वापरात असलेल्या देवनागरीतली अक्षरं आहेत आणि त्यावरुन देवनागरी ही ब्राह्मीतून जन्माला आली असा सर्वसाधारणपणे निष्कर्ष काढण्यात आला आहे.
'मराठी भाषेची गंमत' या धाग्यावर रायगडची पोस्ट वाचून मी फार पूर्वी देवनागरीबद्दल लिहिलेलं आठवलं. मी या विषयातली तज्ज्ञ नाहीये, सहज आवड म्हणून गोळा केलेली माहीती आहे.
--