मैत्रीणींनो आम्ही चौघे जुलै १३ - २३ स्वित्झर्लंड, रोम आणि अथेन्स अशी ट्रीप काढणार आहोत. १३ ला रात्री सिंगापूर हुन निघून १४ ला सकाळी झुरीक ला पोहोचणार, १८ ला संध्याकाळी जिनेव्हा हुन रोम ला जाणार, २१ ला रोम हुन अथेन्स आणि २३ ला रात्री परत सिंगापूर ला प्रमाण असा ढोबळ प्लॅन आहे. आम्ही चौघांचा इ ही पहिलीच युरोप ट्रीप आहे. इथल्या अनुभवी मैत्रिणींचे सल्ले/सुचना हव्या आहेत.
जिनेव्हा मध्ये सर्न बघायचेय पण त्या व्यतिरिक्त अजुन काही कॉन्ट्रास्ट ठरलेलं नाही. इथे वाचुन उरलेली ट्रीप प्लान करायची आहे.
Hallo, wie gehts? म्हणजेच हॅलो, हाऊ आर यू? या वाक्याने इथे बहुतांशी कुणालाही भेटल्यावर सुरुवात होते. ठीक, मजेत, निवांत, बिझी अशी प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असू शकतात, पण आमची शेजारची आजी भेटल्यावर जेव्हा तिच्याशी बोलणं होतं, तेव्हा आजीचं हमखास उत्तर येतं, मी समाधानी आहे. क्वचित कधीतरी 'माझा पाय दुखतो आहे, थकवा आहे' असंही म्हणते, पण नव्याणव टक्के तिचं उत्तर हे समाधानी आहे हेच असतं. काल भेटली तेव्हा "आता ८८व्या वर्षी अजून काय हवं, जे आहे त्या सगळ्यात मी समाधानी आहे" हे तिचं उत्तर आलं.
मी नीलला सिथेंसायझरवर त्याचे नर्सरी र्हाईम्स वाजवून दाखवत असते. आज काही केल्या इफ युआर हॅपी & यु नो इटची तिसरी ओळ वाजवता येईना.. मग वैतागून मी सारेगमपच वाजवत बसले. वाजवता मूड लागला आणि लहान असताना क्षीरसागर आज्जींकडे शिकलेली पेटी आठवू लागली .. आणि त्या मसल मेमरीतून मी खालील प्रकार वाजवला. हा राग भूप आहे का? आणि बरोबर आहे का? तसं असेल तर याच्या पुढचा राग कोणता शिकू मी?
मी हे वाजवले.. बहुतेक बरोबर टाईप केले असावे.. वरचा सा रे ग कसा लिहायचा नाही माहित. दुसर्या व तिसर्या ओळीत वरचे सा रे आहेत.
आयुष्यातून पावभाजी जायचीच वेळ आली होती या शुगरमुळे. पण थोडक्यात वाचली :).
साहित्य
दूधीभोपळा - २ मोठे
फ़्लॉवर - १/२ गड्डी
गाजर - १ मोठे
बटाटा - २ मध्यम
बीट - १ लहान तुकडा
मटार - १/२ वाटी (हे वेगळे शिजवून बाजूला ठेवणे)
ढब्बू मिरची -३
टोमॅटो -३
कांदे - ३
लसूण सोलून- १ गड्डा अति बारीक चिरणे.
आलं- हे मी अंदाजे लसणाच्या बरोबर येईल एवढं घेते किसून
पाभा मसाला, तिखट, हळद, तेल, मीठ, बटर वगैरे नेहमीचे यशस्वी साहित्य.
असा असून असून किती उन्हाळा असेल? आपल्या सारखा कडक उन्हाळा थोडीच असेल तिकडे, कारण मध्य युरोप म्हणजे मुख्य थंडी, हिवाळा, बर्फ हेच पहिले डोक्यात येतं. मध्यपुर्वेकडचे देश, आखाती देश इथल्या त्रासदायक उन्हाळ्याबद्दल आपण ऐकलेलं असतं, पण युरोपात येताना आवर्जून करायच्या खरेदीत नेहमीच हिवाळी कपडे, थर्मल्स हे आघाडीवर असतात. थोडे दिवस उन्हाळा असला तरी 'आपल्याला' एवढा काही वाटणार नाही, सवय असते तशी असं वाटू शकतं. भारतात चोवीस तास डोक्यावर फिरणारे पंखे इतके सवयीचे असतात, की त्यांना आपण गृहीत धरलेलं असतं. शिवाय कुलर, एसी सगळंच असतं आणि इथे त्यातलं काहीच नसतं.
आमच्या गावातली प्राथमिक शाळा या शैक्षणिक वर्षी अधिकृतपणे बंद झाल्याचं मला काही दिवसांपूर्वी कळलं. जिल्हा परिषदेची, मराठी माध्यमाची एका खेडेगावातली ही छोटीशी शाळा. गेली काही वर्षे ती बंद पडण्याच्या दिशेने जात असल्याचं लक्षात येत होतंच. तरीही, ती खरोखरच बंद झाल्यावर खूप वाईट वाटलं. मी शाळेत असताना साधारणपणे साठ ते पासष्ट विद्यार्थी शाळेत असायचे. पहिली ते चौथी, हे चारही वर्ग मिळून ही संख्या होती. ही संख्या त्याआधी आणि त्यानंतरही अनेक वर्षे स्थिर होती. नंतर मात्र सावकाश, पण निश्चित ओहोटी सुरू झालेली होती.
गेल्या आठवड्यात नवर्याने भरपूर चेरीज आणल्या आणि नंतर घरी आलेल्या एका मैत्रिणीने सुद्धा खूप चेरीज दिल्या. इतक्या नुसत्या खाऊ शकणार नाही, म्हणून मग आईने जॅम केला. तिने पण युट्यूब वरच्या बर्याच रेसिपीज बघून त्याप्रमाणे केला.
साहित्यः
चेरीज - ५०० ग्रॅम. (न चिरलेल्या एवढ्या, बिया काढून टाकल्या नंतरचं वजन केलं नाही )
साखर - पाऊण कप
लिंबाचा रस - २ टेबलस्पून
अधिक महिना तीन वर्षांनी एकदा येतो त्यामुळे त्याचं धार्मिक महत्त्व सुद्धा अधिक...त्या अधिकात आठवतात आपले आई बाबा...त्याना जमेल तसं कौतुकाने आपल्या जावयाचे लाड करणारे, आता नसले तरीही ज्यांचा आपल्यावर अधिक प्रभाव अशा व्यक्तीच्या अनेक गोष्टी घडत जातात आपल्या हातून आपल्याही नकळत!