June 2017

शब्द

शब्द असे, शब्द तसे, शब्द कसे?

शब्द नजरेसमोर तरळूनही,
आकलन न होणारे.

शब्द मनात रुंजी घालूनही,
कागदावर न उतरणारे.

शब्द सभोवती फेर धरून,
आपल्यालाच नाचवणारे.

शब्द कधी कधी,
प्रसन्न होऊन आपल्यापर्यंत पोचणारे.

आणि शब्द कधीतरी,
भावनेचा कल्लोळ सामावून घेऊन,
आपल्यालाच नि:शब्द करणारे.

लेट्युस रॅप्स! (Lettuce wraps)

P.F. Changs हे प्रसिद्ध चायनीज चेन रेस्टॉरंट त्यांच्या लेट्युस रॅप्स करीता प्रसिद्ध आहेत. अतिशय टेस्टी व हेल्थी प्रकरण...कार्ब जवळपास नाहीतच त्यामुळे कार्ब कंट्रोल करणार्‍यांना उपयुक्त! त्यांची रेसिपी कॉपी करण्याचा हा प्रयत्न!

पटकन होत असल्याने माझ्या सारखा आळश्यांना पण उपयुक्त. बच्चे खाते है, बच्चों का बाप खाता है, बच्चोंकी माँ तो वैसे भी, काहीही खातीही रहती है!!

तर...

साहित्यः

१.चिकन खिमा - १ पाउंड/०.५ किलो. (चिकन खात नसल्यास हार्ड तोफु, सोया चंक्स असे पर्याय वापरू शकता.)

Taxonomy upgrade extras: 

अस असं घडलं ... ८. सृजन

( स्थळ : लाखो वर्षापूर्वीची, एक अश्मयुगीन गुहा)

ऊन आता फारच कडक होऊ लागलं होतं. मुलं, बायका, पुरुष आता फार वेळ बाहेर जाईनाशी झाली. आसपासचे छोटे झरेही आटले. गुहेबाहेरचे गवतही पिवळे धम्मक झालं. झाडांचे शेंडेही हिरव्याची साथ सोडू लागले. सीतेला कसलीतरी चाहूल लागली होती. मनात आत खूप काही आर्त, हूरहूर लावणारं वारं वाहू लागलं होतं. तिला रामाचा विरह आता अजिबातच सोसवेना. तो सतत बरोबर असावा असं वाटू लागलं.

लेख: 

कोकण भटकंती

मैत्रिणींनो, तुमची मदत हवी आहे.

येत्या सप्टेंबर किंवा डिसेंबरात ४-५ दिवस कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन करतेय, मे बी गोवा किंवा मग कोकणात कुठेतरी.... (मालवण फिरुन झालंय, रत्नागिरी बाकी आहे.)

तर त्यासाठीची प्रॉपर आयटेनररी देईल का मला कोणी बनवुन. त्यात कुठे रहावे?, बघण्यासारखी ठिकाणे,अंदाजे खर्च हे सगळं असेल तर वेल अँड गुड....

नेट वर वाचलयं बरंच पण सगळंच वाचुन कंफ्युझायला झालंय.....

प्लिझ हेल्प मी गर्ल्स... Praying

Keywords: 

मानसिक स्वास्थ उंचवायचंय? मग हे काही सोपे उपाय पहा!

आमच्या ऑफिसमध्ये HR तर्फे फिटनेस करता त्रैमासिक उपक्रम राबवले जातात. प्रत्येक फिटनेस चॅलेंजला काही पॉइंट्स आहेत, आणि तीन महिन्यात काही पॉइंट्स जमवले की अ‍ॅमेझॉनचं गिफ्ट कार्ड बक्षिस म्हणून मिळतं. :) कर्मचार्‍यांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता हा उपक्रम आहे. काही काही थोडे चॅलेंजिंग तर काही काही, अगदी सोपे प्रकार यात आहेत. उदाहरणार्थ ५-७-१०के स्टेप्स, दिवसभरात १०-१२ ग्लास पाणी पिणे (इथे सोडा आणि कॉफी पिणार्‍यांकरता हे फार अवघड चॅलेंज आहे), फाईड-फास्ट फूड सोडणे (घरुन डबा आणणे), अ‍ॅन्युअल डॉक्टर व्हिजिट, फ्लु शॉट घेणे वगैरे आणि अजुनही बरेच ...

Keywords: 

'विश्वास'कार श्वेता भट्टड : मुलाखत भाग १ (पर्यावरण दिनानिमीत्त)

निसर्गायण मंडळाच्या मार्च महिन्यात सभेला परगावी असल्यामुळे जाता आलं नाही व उपस्थित मंडळींकडून कळलं की एक अफलातून काम करणार्‍या महिलेशी ओळख झाली व तिच्या कामाचा परिचय झाला. कलेच्या माध्यमातून ती समाजजागृती, समाजसेवा करते एवढंच जाणून घेतलं,जास्त खोलात न जाता , उत्कंठा दाबून ठेवत. नागपूरल्या परतल्यावर प्रत्यक्ष भेट घेऊनच तिच्या कामाची सविस्तर माहिती घ्यायचं ठरवलं. कोर्‍या पाटीने भेट घ्यायला तिच्या घरी पोचले अन अवाकच झाले. एकतर आपल्या मनामध्ये एखाद्या समाजाविषयी आपले पूर्वग्रह असतात, ते मोडीत निघाल्याने अन दुसरे म्हणजे तिचं धारिष्ट्य!

लेख: 

ऐक ना ...

हाय, कसा आहेस?
मनमौजी तू, त्यामुळे हा प्रश्न तुझ्याबाबतीत इन-व्हॅलीड ठरतो म्हणा... सरळ मुद्द्यावरच येते.

तुझे परतायचे दिवस जवळ येऊ लागलेत, म्हणून म्हटलं आधीच तुला सांगून टाकावं... एकदा आलास की तू कुठचा ऐकतो आहेस मला...
तुला आठवत का रे, कधी सुरू झालं आपलं हे सगळं?... सगळं म्हणजे... हो बाबा, बोलते स्पष्टच... अफेयर!
मला तर आठवतच नाही, किती मागे गेले तरी तू आहेसच सोबत.
तुझ्याशिवाय जगले तरी आहे का कधी, असं वाटू लागलं आहे आता... असं काय आहे आपल्यात जे अजून कायम आहे? तेच शोधून काढायचा प्रयत्न करतेय... म्हणजे समूळ नष्ट करता येईल सगळं.

Keywords: 

लेख: 

पावसाच्या गोष्टी - १

जरा तपेलीभर पाऊस पडला की भक्क असा आवाज येऊन दिवे जात. प्रमोदबनमधे राहणारी काही मंडळी आपापल्या गॅलर्‍यांमधे रस्त्यावरून येणारे जाणारे लोक बघत. घरामधे मेणबत्त्या, गॅसच्या बत्त्या वगैरे. समोर डावीकडे कामवाल्यांची वस्ती. तिथली सगळी पोरंटोरं वस्तीच्या बाहेर येऊन पारेकर टेलरच्या दुकानाच्या बाहेरच्या फळीवर. पारेकरचं दुकान वस्तीत नाही. वस्तीला लागून असलेल्या दुमजली चाळीत. चाळीत ज्यांची घरे रस्त्याकडे तोंड करून तेही सर्व आपापल्या गॅलर्‍यांमधे. तिन्ही ठिकाणच्या समवयस्क जनतेमधे रस्त्याच्या आरपार गप्पा चालत. विशेषत: कॉलेजातल्या दादा ताई जनतेत. त्या गप्पाटप्पांचे प्रमोदबनमधल्या बालिकेस कोण कौतुक.

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle