May 2018

नैनिताल/चैनीताल

नैनिताल्हुन परत आले आणि विचार करू लागले खरंच कशासाठी गेलो होतो ? एरवी आपण फिरायला जातो ते मजा आणि चैन करायलाच ना! मग केली मजा तर काय बिघडलं… इत्यादी इत्यादी हे खरंतर उतू जाऊ द्या वर लिहायच होतं पण लिहीता लिहीता लक्षात आलं की अगदीच सगळं काही वैताग आणणारं नव्हतं चांगल्याही गोष्टी झाल्या आणि ते इतकं मोठं झालं की शेपरेट लेखच झाला.

Keywords: 

ऑस्ट्रेलिया न्युझिलंडमधे हिंडा हो

भटकंतीची बरेच देशाचे धागे आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिसला नाही. आणि मग जवळचा न्युझिलंड पण करता येण्याजोगा असल्याने तो पण यात घुसवायला हरकत नाही. तर ऑस्ट्रेलियाच्या मुलींना इथे लिहावे अशी विनंती.
१. १०-१२ दिवसात कायकाय
पहायलाच हवे?
२.न्युझिलंडमधे ३-४ दिवसात काय पहावे?
३. कोणती टूर कंपनी मस्त आहे या दोन्ही देशाची थोडी पण महत्वाची ठिकाणे करायला?

Keywords: 

आल्प्सच्या वळणांवर - भाग १ - नियोजन, पूर्वतयारी आणि प्रयाण

इथे एवढ्यात बर्‍याच मैत्रिणींनी युरोप-स्विस भटकंतीबद्दल प्रश्न विचारलेले दिसले, मग प्रत्येक वेळी ब्लॉगची लिंक देण्यापेक्षा इथेच मैत्रिणींसोबत लेख शेअर करूयात असा विचार केला. ही लेखमालिका लिहून आता ४ वर्ष होतील, पण सगळ्या सहलींमध्ये ही सगळ्यात जास्त आठवणीत राहिलेली. म्हणून हिने श्रीगणेशा :)

Keywords: 

माझी सैन्यगाथा (भाग १)

माझी सैन्यगाथा (भाग १)

माझा जन्म पुण्यात झाला. माझं बालपण च काय पण किशोरावस्थेचा तो सप्तरंगी काळ ही मी पुण्यातच अनुभवला. थोडक्यात सांगायचं तर माझं लग्न होईपर्यंत मी पुण्याच्या बाहेर फारशी गेले नाही.

लहानपणापासून मला 'आर्म्ड् फोर्सेस्' बद्दल जबरदस्त आकर्षण होतं. दरवर्षी २६ जानेवारी ला दूरदर्शन वरून प्रसारित होणारी गणतंत्र दिवसाची परेड बघणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच असायची. दिल्लीच्या राजपथ वरुन शिस्तबध्द आणि तालबद्ध रीतीनी मार्च-पास्ट करत जाणारे ते सैनिक बघताना मला नेहमीच अभिमान वाटायचा. आणि सिनेमात दाखवतात तसं बऱ्याच वेळा त्यातल्या परेड कमांडरच्या जागी मी स्वतःला बघायचे.

लेख: 

आल्प्सच्या वळणांवर - भाग २ - लिंडरहॉफ पॅलेस आणि रेशन पास

दुसरा दिवस उजाडला. तसा पहिलाच. कारण मुख्य प्रवासाला सुरुवात होत होती. संध्याकाळपर्यंत नियोजित हॉटेलला पोचायचं एवढंच या दिवसाचं ध्येय होतं. त्यामुळे निवांत आवरून निघालो. सूर्यदेवाने सकाळीच एकदा दर्शन दिलेले दिसले आणि एक ओझे उतरले. जर्मनीतून बाहेर पडण्यापुर्वी पेट्रोल भरणे आवश्यक होते म्हणून ते काम केले. जीपीएसला हॉटेलचा पत्ता दिला आणि त्याच्या इशाऱ्याप्रमाणे रस्ता धरला.

.

Keywords: 

पुन्हा एकदा

शब्द हरले, पुन्हा एकदा
सूर विरले, पुन्हा एकदा
सख्या तुझ्या मौनापुढे
नाते हरले, पुन्हा एकदा

शब्दाला धार, शब्दाचे वार
निष्प्रभ सारे, पुन्हा एकदा
संपले नाते, वरचढ ठरले
मौन विखारी, पुन्हा एकदा

नात्याच्या या शोकसभेची
चर्चा झाली, पुन्हा एकदा
मूक अश्रू मी ढाळून गेले
अबोल वणवा, पुन्हा एकदा

कविता: 

लाँग ड्राईव्ह


सोन्याचा गोळा वितळतो काचेवरून
  पसरत हळूहळू डॅशबोर्डवर..
    आपण वळलेले असतो कायमचे दिशा हरवून

सुस्त वळणावरचा गुलमोहर मागे सोडून
  जाळलेल्या शेतांची काळी राख..
    उडत असते त्या गडद मखमली फुलांमागून

उन्हाचे कण उमटतात तुझ्या नाकापासून
  तांबूस सोनेरी केसांपर्यंत..
    माझ्या डोळ्यांचा मध जातो गालावर ओघळून 

कविता: 

माझी सैन्यगाथा (भाग २)

*माझी सैन्यगाथा (भाग २)*
आम्ही दिब्रूगढ पर्यंत विमानानी गेलो पण तिथून पुढे मात्र आम्हाला by road च जायला लागणार होतं. दिब्रूगढ एअरपोर्ट वर आमच्यासाठी आर्मी ची जीप आली होती. त्या वेळी पहिल्यांदा त्या जीप मध्ये बसताना मला जो आनंद, जे समाधान वाटत होतं,  ते शब्दातीत आहे!

लेख: 

आयुष्याचे गाणे

खाऊन एक संतरा
गायला त्यानं अंतरा
मोजताना तालाच्या मात्रा
जाणवला त्याला खतरा

मग,

एकतालाच्या दीडपटीत
भेळ चापली चटपटीत
तान घेऊन येता समेवर
गाडी पकडली लटपटीत

धागीनती नक धीं, धागीनती नक धीं
तिरकीट धा, तिरकीट धा, धीं धीं

दरवाज्याचे कुलुप उघडता
बेसुरल्या ज्या बोल-ताना
फ्रीजचे पाणी पीता पीता
मनी गुंजला गोड अडाणा

सा रे म प, नि म प, सां
सां ध नि प, म प ग म, रे सा

बडा ख्याल मग रंगत जाई
सोबत व्हिस्की आणि चकना
अलंकार एकेक उतरले
होरी, धृपद, धमार, तराणा

नादिरदिरदा नी तदानी तोम, तनन तोम
नादिरदिरदा नी तदानी तोम, तनन तोम

तानपुर्‍याच्या जुळता तारा

कविता: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle