February 2019

वैष्णोदेवी ट्रिप

माझ्या ओळखीतल्या एका कुटुंबाला वैष्णोदेवीला जायचं आहे. त्यासाठी त्यांना हेलिकॉप्टर टूर करायची आहे. कोणाला याबाबत काही माहिती आहे का? कोणी केली आहे का? प्लीज माहिती द्या.

Keywords: 

फेरोंच्या देशात (ईजिप्त) भाग ३ दुसरा दिवसः आस्वान आणि अबू सिंबेल

आज भल्या पहाटे निघायचे होते. रात्री कैरोचा फेरफटका त्यामुळे लवकर आटोपता घेऊन थोडी झोप पूर्ण करावी या हेतूने लवकर झोपलो होतो. पहाटे ३ ला खोलीतले सगळे फोन तारस्वरात ओरडायला लागल्याने, काही समजायच्या आत आम्ही तिघेही जागे होऊन आवरायला लागलो. पटकन आवरून हॉटेलच्या लॉबी मधे येऊन चेक-आउट केले. भल्या पहाटे तिथेल्या माणसाने ३ मोठे बॉक्स माझ्या हातात यूअर ब्रेकफास्ट म्हणून कोंबले. त्याला काही म्हणणार इतक्यात बाहेर गाडी आली असे सांगत कालचाच गाईड आला. मग तसेच सामान गडीत टाकून कैरो एअरपोर्टच्या दिशेने निघालो. पहाट असल्याने अजिबात वर्दळ नव्हती. नंतर असे शांत कैरो कधीच दिसले नाही.

Keywords: 

हनी रोस्टेड अलमंडस

एक मैत्रीण मला भेटायला आली, येताना हनी रोस्टेड ड्रायफ्रूटस् घेऊन आली. ते इतके आवडले सगळ्यांना की मला शोधकार्य करावेच लागले! मिनोतीने झटपट रेसीपी दिली आणि मी घरातल्या वस्तू वापरून करून पाहिली.

साहित्य: एक कप बदाम, दीड टेबलस्पून मध, दीड टेबलस्पून पाणी, एक टीस्पून तेल(मी रिफाईंड शेंगदाणे तेल वापरले), एक टेबलस्पून पिठी साखर, पाव टीस्पून मीठ

पाककृती प्रकार: 

सूट - भाग 10 (समाप्त)

तिलुने पर्स check करायला सुरुवात केली.
'काय झालं?', Stan ने काळजीच्या स्वरात विचारलं.
तिलु तशीच चालु पडणार तोच Stan आडवा आला.
'का?'
'पैसे गायब आहेत यातले'
तिलु एक एक शब्द शांत पण जरा चढ्या आवाजात म्हणाली.
तिलुने निघत असताना नेहमीप्रमाणेच ड्रावरमधून नोटा पर्स मध्ये कोंबल्या होत्या. Dennis मध्ये बिलाची रक्कम भरतांना तिला नेहमीची 100 ची नोट दिसली नव्हती. कदाचित तिच्या वेंधळेपणामुळे कुठे राहिली असेल असं आधी वाटलं. पण आता संशय घ्यायला जागा होती.
'ओह नो! विसरला का कुठे?', Stan ने विचारलं.
तिलु तडक रिसेप्शनकडे निघाली तसं तो परत घाईघाईने पुढं झाला.
'तुम्ही complaint तर नाही ना करणार?'

Keywords: 

लेख: 

फेरोंच्या देशात (ईजिप्त)

अगदी लहानपणी जेव्हा मला पुस्तकांचा भस्म्या रोग झाला होता तेव्हा हातात विजय देवधरांचे अनुवादित "स्फिंक्स" हे पुस्तक पडले होते. पुढे त्याचे ओरिजिनल रॉबिन कुक चे पण वाचले. पण त्या पुस्तकाच्या मुखपृष्टावरचा तो तुतनखामेनचा मुखवटा विसरले नाही. त्यापुस्तकाने आणि त्यातल्या इजिप्तच्या वर्णणाने मी पूर्ण भारावून गेले होते. कुठेतरी तेव्हाच हे सगळे एकदा तरी बघायचे आहे अशी बहुतेक खूणगाठ बांधली होती. कारण जेव्हा जेव्हा कुठे फिरायला जायचा विचार यायचा तेव्हा इजिप्त एकदा तरी उल्लेखले जायचेच. एकदा २००० मधे, एकदा २००६ मधे इजिप्तने हुलकावणी दिली होती. पण अखेर २०१८ मधे का होईना योग जुळून आलाच.

हवाई

मी लहान होते, म्हणजे अगदी बालवाडीत तेव्हा हवाहवाई हे गाणे सगळीकडे सारखे वाजायचे. श्रीदेवीचा नाच आणि गाण्याचे वेडेवाकडे शब्द, धमाल यायची पहायला. तेव्हाच कुणीतरी सांगितलेले की हवाई नावाची खरंच एक जागा आहे. ते मनात झालेले हवाईचे बि़जारोपण. नंतर शाळेत कधीतरी दुसर्‍या महायुद्दातील पर्ल हार्बर अ‍ॅटॅकविषयी वाचताना हवाई परत कानावर आले.काय असावे हे हवाई असा विचार तेव्हाही आला मनात. नंतर मग ऑफिसला जायला लागले तेव्हा एका रिट्रीटच्या निमित्ताने गोव्याला गेले होते तेव्हा ऑफिस सेलेब्रेशनची पुर्ण थीम हवाईयन होती. गोव्याचे मॅरिअट तसेही सुंदर आहे. म्हणजे तेव्हातरी होते.

कॅलिफॉर्निया २०१५

हा ' माझी उन्हाळ्याच्या सुट्टीतली ट्रीप' या विषयावरील निबंध नव्हे. त्यामुळे मी हे पाहिलं (आता खालील फोटोत तुम्हीही पहा), ते पाहिलं (आता खालील फोटोंत तुम्हीही पहा), मी हे खाल्लं (आता खालील फोटोत तुम्हीही पहा), अमेरीकेत जाऊन आल्यानं भारतातील अडचणी कशा ठळक दिसतात (आता तुम्ही या विषयावर भांडा), अमेरिकेत जाऊन आल्यानं अमेरिकेचे दोष कसे अधोरेखित होतात (आता तुम्ही या विषयावर भांडा) हा सगळ्या मुद्द्यांना दुय्यम ठरवण्यात आलं आहे. अर्थात या रसाळ मुद्द्यांचा पूर्ण अनुल्लेख करून त्यांची मजा घालवण्याइतकी मी अरसिक खासच नाही, त्यामुळे पुढे मागे हे मुद्दे आलेच तर होऊन जाऊ द्या!

हवाई - भाग ७ - 'Waterfalls of Kohala' सरंजामे हेलिकॉप्टर

शिर्षक गंमत म्हणुन तसे लिहिलेय हा, नाहीतर येतील 'तुपारे' फॅन्स धावत. आम्ही ९० मिनिटे का होईना सरंजामेंसारखे फिरलो Heehee

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle