February 2019

व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल केक गिफ्ट बॉक्स

बरेच दिवस हा पॅटर्न /आयडिया डोक्यात घोळत होती. खरंतर फॅब्रिक चे करायचे होते पण हवं तसं कापड सापडेना मग म्हटलं विणूयाच पाहिजे तसं. तिकडे इतके हृचू गोळा झालेत की दिल जोरजोरात धडकतायत म्हटलं आपण ही मोहोलात सामील व्हावं. कोणाला आपल्या हृचू ला छोटंसं गिफ्ट पाठवायच असेल तर पाठवा बरं यातुन Heehee
पूर्णपणे हॅन्डमेड क्रोशे केक गिफ्ट बॉक्स... परफेक्ट गिफ्ट सोल्युशन केक लवर्स साठी. नंतर ज्वेलरी बॉक्स म्हणून ही वापरता येईल आणि रोमँटिक आठवणी कायम उजाळा देत राहतील Love
अजुन येतीलच लवकर :fadfad:

Keywords: 

कलाकृती: 

व्हॅलेंटाईन स्पेशल रोझ फ्लेवर एगलेस केक

आजची व्हॅलेंटाईन डे स्पेशल डिश घेऊन आलेय! खरं तर केक ही काही वेगळी डिश नाही पण आपण स्वतः केलेल्या डिशची मजाच काही वेगळी असते!cake.jpg
घेऊन आलेय व्हॅलेंटाईन स्पेशल रोझ फ्लेवर एगलेस केक... अर्थात होममेड !!!
cake1.jpg
साहित्य:

पाककृती प्रकार: 

माझे पेपरचे प्रयोग (३) - पेपर, वायर आणि रेझिन

माझे पेपरचे प्रयोग (१)
माझे पेपरचे प्रयोग (२)

काही मैत्रिणींनी फक्त नेकपीस करशील का विचारले होते त्यासाठी पेपर, वायर आणि रेझिन वापरुन हे पेंडट्स नेकपीस करुन पाहिले. एका मैत्रिणीने दुसरा ढग आणि पाऊसवाला आणि शेवटचा घेतला :) Blessed अजून काही डिझाईन्स आहेत तेही टाकते लवकर.

NCPC 001.jpg

NCPC 002.jpg

Keywords: 

हवाई- भाग ८ - मॅजिक सँड बीच आणी माऊली बीच

सकाळी उठल्या उठल्या प्रथम जाणवले ते म्हणजे आता तीनच दिवस राहिले. मेक द बेस्ट ऑफ द टाईम लेफ्ट असे म्हणुन नवरयाला, मुलाला पांघरुणाच्या बाहेर काढले. लोळणे हाच खरा बेस्ट टाईम खरं म्हणजे, शिवाय रोज मीच शेवटी उठायचे. पण आज माझ्या अंगात शिस्त संचारलेली. तरी बरे, हॉटेल अॅक्टिवीटीजमध्ये ५.३० चा एक सनराइझ वॉक होता आणी आम्ही तो ८ दिवसात एकदाही करु शकलो नव्हतो :P सन पार पडद्यातुन आत डोकावु लागल्यावर आम्ही उठणार. आजही तेच झालेले. आवरुन नाश्ता करायला गेलो. तेथे रोज लहान चिमण्यांसारखे पक्षी दिसायचे. टेबलावर राहिलेले अन्नकण वेचुन खायला पक्षी नंबर लावुनच बसलेले असायचे आणि काय वाट्टेल ते खायचे.

एगलेस कस्टर्ड पुडिंग

एगलेस कस्टर्ड पुडिंग:IMG-20190213-WA0003minalms.jpg
साहित्य: एक कप दूध, एक कप मिल्कमेड, एक कप दही, एक टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर, पाव कप साखर, पाणी
( एक कप: 250ml)

कृती: मिल्कमेड तयार वापरू शकता, मी घरी केलं.
१)अर्धा ली दूध, 200 ग्रॅम साखर, आणि 10 रु वाली दूध पावडरची दोन पॅकेट्स एकत्र करून एक कप होईल असं आटवा.IMG_20190212_143115minalms.jpg
२) गार करत ठेवा.

पाककृती प्रकार: 

कभी यूँ भी तो हो - १

"जो! नॉट फेअर! असा ओठ बाहेर काढून, डोळ्यातून कितीही मध सांडलास ना तरी मी अजिबात पाघळणार नाही. तू माझ्याशेजारी झोपू शकत नाहीस, ok? उतर आधी, जा बरं तुझ्या बेडवर. गो!" मनवा समोर बोट दाखवत जास्तीत जास्त कडक दिसण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - २

भाग १

मनवा, इडियट! घाबरतेस कसली, किती क्रिमिनल केसेस पाहिल्यास तू.." "अरे पण मी कॉर्पोरेट प्रॅक्टिस करते, क्रिमीनल थोडीच!" दुसरं वकिली मन लगेच म्हणालं.
"पोलिसांना कॉल करू शकते की.." म्हणत तिने मोबाईल पाहिला तर नो नेटवर्क. "व्हॉट द.. रोजचं नाटक आहे हे" म्हणत तिने करकरून दात आवळले. "काहीतरी करायलाच हवं. काय करू.. काय करू" म्हणत तिने इकडे तिकडे पाहिले. तेवढ्यात तिला कोपऱ्यातल्या डिस्प्ले वर ठेवलेली क्रितीची बॅट दिसली. क्रिती आता आतापर्यंत प्रोफेशनल क्रिकेट खेळत असे. अर्थात सध्याच्या स्थितीत तिला खेळणे शक्यच नव्हते म्हणून ब्रेक घेतला असेल.

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - ३

भाग २

दाराला कडी लावून तिथेच टेकून ती जरा उभी राहिली. छातीतली धडधड अजून पूर्ण थांबली नव्हती. मग बेडवर बसून तिने आधी पाण्याची बॉटल तोंडाला लावली. घटाघट थंड पाणी घशाखाली उतरल्यावर तिच्या हृदयाचे ठोके जरा शांत झाले.

आता तिचा मेंदू एकेक गोष्ट प्रोसेस करायला लागला.
नोटिफिकेशन १. हे मान्य करायला तिला खूप त्रास होत होता, पण या क्षणाला तिने टोटल माती खाल्ली होती. हा काही कोणी चोर, खुनी किंवा सिरीयल किलर नसून साधा अरुआंटीचा भाचा होता.

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - ४

भाग ३

त्याच्या मखमली आवाजाने तिच्या मनावर गारुड केले होते. आजूबाजूच्या पावसाच्या आवाजातसुद्धा तिला फक्त त्याचा आवाज ऐकू येत होता. 'नो वंडर, हा एवढी काँट्रॅक्टस साइन करत असतो. नुसते याला बघूनच लोक हा म्हणेल तिथे सही करत असतील..' विचार करत तिने ओठ चावला. 'पण सिक्स प्लस.. बघ विचार कर, हाही त्यातलाच असणार. ही विल टॉवर ओव्हर मी. पुन्हा सगळं तेच. तू एकदा ठरवलस ना मॅक्स ५.८, ५.९, मग बस.  कम ऑन! तू खूप स्ट्रॉंग आहेस. इग्नोर कर हे सगळे विचार..' पुन्हा वकील जागी झाली.

Keywords: 

लेख: 

आल्याचं डेझर्ट (दही)

एक अत्यंत अभिनव प्रकार. एकदम सोपा, स्वयंपाकघरात सहज सापडणार्‍या वस्तूंपासून बनवलेला आणि तरीही सर्वस्वी अनोखा. पाहुणे मंडळींना त्यांच्यादेखत डेझर्ट बनवून देऊन खुश करा.

साहित्य : आलं, दूध, साखर

प्रमाण : असं काही खास नाही. अंदाजे.

कृती : आलं किसून एका बारीक गाळणीत घालून पिळून घ्या. हा आल्याचा रस बाजूला ठेवा. आता दुध उकळवा. ते गार करत ठेवा. साधारण उकळत्या दुधाच्या पाऊणपट तपमान झाले की त्यात आवडीप्रमाणे साखर घालून विरघळवा.

आल्याचा रस छोट्या छोट्या काचेच्या अथवा चिनीमातीच्या वाट्या/बोल्स मध्ये घालून त्या वाट्या जरा गोल फिरवा म्हणजे आतून सगळीकडे रस लागेल.

पाककृती प्रकार: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle