गणेशोत्सवाचे निमित्त साधून तारचित्रांच्या प्रदेशात प्रवेश करते आहे.
सुरूवात अर्थातच श्रीगणेशाने
दोन दिवसांपूर्वी बाप्पा फॉर्मच्या स्टडीचा फोटो टाकला होता. त्या स्टडीचे पूर्णत्वाला जाणे अजून बाकी आहे. पण गणपतीचे एकच रूप थोडीच असते. ही काही वेगळी रूपे.
१. दगडावर बसवलेले गणपतीबाप्पा.
७*५ इंच.
पितळ आणि तांब्याच्या तारा.
२. अजून एक गणपती फॉर्म.
११.५*८.५ इंच
पितळेच्या तारा.
माझ्या वायर ज्वेलरीच्याजुन्या धाग्यावरचे फोटो अनेकांना दिसत नाहीयेत म्हणून हा नवा धागा. त्या जुन्या धाग्यावरचे काही लेटेस्ट फ़ोटो सुद्धा इथे टाकेन. फोटो दिसत आहे की नाही आणि तुम्हाला कसे वाटले हा फीडबॅक नक्की द्या.
आता वेगळ्या मिडीयम मधल्या ज्वेलरी साठी अजून एक धागा उघडण्याचा कंटाळा आलाय त्यामुळे नव्याने करू लागलेली फॅब्रिक ज्वेलरी इथेच अपलोड करत जाईन
हे सगळे कानातले, पेंडन्ट खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
.
.
.
ईजिप्शियन कॉईल इअरिंग्ज.
.
.
.
गिटार टाईप पेंडन्ट, दोन्ही बाजूने वापरता येईल असं. नॅचरल सेमी प्रेषियस अगेट स्टोन
९ वर्षांपूर्वी हा लेख मायबोलीवर लिहिला होता. ३० वर्षांपूर्वी मराठवाड्यातल्या टिपिकल ब्राह्मणी घरातलं वातावरण असं या लेखात लिहिल्यासारखं असायचं. आज वाचताना नॉस्टॅल्जिक होताना वाटतं की तो भाबडेपणा तेवढा तसाच रहायला हवा होता !
आज घरोघरी गौरी आल्या असतील त्या निमित्ताने इथे शेअर करतेय :)
आमच्या मराठवाड्यात गणपतीपेक्षा जास्त महत्त्व गौरींचं. आमच्याकडे त्यांना गौराया किंवा महालक्ष्म्या म्हणतात. माझ्या लहानपणच्या आमच्या घरातल्या लक्षुम्यांच्या या आठवणी. मी आठनऊ वर्षांची असेन तेव्हाच्या.
किती वर्षे उलटली असतील? दोन? तीन? पाच? सतत इथेच बसून काळाचं भान राहिलेलंच नाहीये. आणि हवंय तरी कशाला? ना मी मागे जाऊ शकत, ना पुढं. आताशा मला कळू लागलंय. इथेच , अशीच, याच परकर पोलक्यात , गुडघ्यावर हनुवटी ठेऊन बसायचंय मला कायम. नाही म्हणायला हा डोक्यावरचा वड सोबतीला असतो. तो मात्र आहे तसाच आहे. त्याच्या लांब, अस्ताव्यस्त, खालीवर लोम्बणाऱ्या पारंब्या मात्र मला आवडत नाहीत. रात्र झाली की चंदेरी प्रकाशात खालून एवढ्या उंचावर पाहताना भेसूर दिसतात. कधी कधी वाटतं माझ्या हातांची बोटंच पसरली आहेत अशी लांबच लांब, वाकडी तिकडी, फाटे फुटलेली! छे , मूर्खच आहे मी. मी का घाबरतेय?
त्वचेच्या रंगांवरून अगदीच वेगळे ओळखे जाऊ अशा देशात मी राहतेय सध्या. आपण कितीही म्हटलं तर मनाच्या एका कोपऱ्यात आपण खरंच सामावले जाऊ का इथल्या लोकांच्यात हा प्रश्न येतोच. मुलाची शाळा इंटरनॅशनल स्कूल. त्यात जगाच्या चारी कोपऱ्यातून आलेली पिल्लं. माझ्या पिल्लासारखीच. हसरी पण नवीन जागेला बावरलेली. पण ती एकमेकांचे छान दोस्त होतात. नवऱ्याच्या ॲाफिसमध्येही तसेच पूर्ण जगभरातून आलेले लोक. पण काम करता करता त्यांचीही गट्टी होते. राहता राहिले मी. सध्या ऑफिसला जात नसल्याने माझा तो लोकांच्यात मिसळायचा मार्ग नाही. मग उरतात मला रोज भेटणारे लोक.