२००१ पासून मी विविध विद्यापीठांचे नाट्यविभाग, विविध नाट्यप्रशिक्षण संस्था, मास कॉम कोर्सेस इत्यादी ठिकाणी कॉश्च्युम डिझाईन शिकवले/ शिकवते आहे.
आता पहिल्यांदाच पुढच्या आठवड्यात अश्या कुठल्या संस्थेच्या, पदवीच्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नसलेले असे माझे कॉश्च्युम डिझाईनचे वर्कशॉप होते आहे. फ्लेममध्ये मी कॉश्च्युम शिकवलेल्या बॅचेस मधील एक विद्यार्थिनी तितास दत्ता हिच्या कोलकात्याच्या ग्रुपने ही वर्कशॉप सिरीज आयोजित केली आहे.
वर्कशॉप ऑनलाईन असेल आणि माध्यम इंग्लिश/हिंदी असेल.
रॉकेट बॉईज चा ट्रेलर पहिल्यापासून सिरीज पाहायची फार उत्सुकता होती . जितका ट्रेलर छान वाटलेला तितकीच सिरीजही रंजक वाटली. भारतीय अणु ऊर्जा संशोधनाचे जनक डॉ होमी भाभा आणि भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही सिरीज या दोन वैज्ञानिकांचं आयुष्य ,त्यांच्या कार्याचे महत्वाचे टप्पे दाखवताना स्वतंत्र भारताच्या विज्ञान,तंत्रज्ञान इतिहासाचा छोटासा आढावाही घेते.
मी मध्यंतरी डोअर टू डोअर cab ने औरंगाबाद ला जात होते. गाडीत अजून एक 40-45 वर्षाची बाई व तिची मुलगी होती. गप्पा मारता कळलं की तिचा भाऊ करोनाने गेला त्याची मुलगी सात वर्षाची. आईवडीलम्हातारे मोठी बहीण अधू पण अंगात कला. झोपून चित्र काढते खूप सुंदर . बॉटलवर आपण सांगितल्याप्रमाणे काढून देते. गिफ्ट द्यायला छान आहे अश्या वस्तू तिच्याकडून घेऊन मदत तिला मदत करता येईल.
आपल्याला काय आवडतं, खूप आवडतं हे उशीराने लक्षात आलं तर वाईट वाटतंच, मलाही वाटलं पण उशीराने का होईना, लक्षात तरी आलं आणि ते झेपतंय हा अजून एक प्लस पॉइंट.
सहज मजा म्हणून एका मिटींगला गेलो, त्यात ओढले गेलो आणि अनपेक्षितपणे ट्रेकींग आवडतं हे कळलं.
स्टोक कांगरी हे शिखर लेह मध्ये आहे. ६,१५३ मिटर्स किंवा २०,१०० फूट ऊंचीवर.
आम्ही हे एक्स्पिडीशन केलं आणि त्याला थोडं अजून कठीण करावं म्हणून ठाण्याहून लेहला आणि परत असे कारने गेलो.
ह्यात कसे पडलो, काय तयारी केली आणि बाकी ह्याची ही कथा.
कलाकार : काही उगीच हसणारे, काही अति तर काही जेमतेम अभिनयही न करणारे, काही मान डुले , काही सुट्टीवर आल्यासारखे उत्साही, काही अतिशय आनंदी ( सगळे इतर ठिकाणी उत्तम अभिनय करतात पण इथे वावच नाही.)
शीर्षक वाचून जरा गोंधळात पडला असाल ना? तुम्ही म्हणाल ईंक्टोबर झालं आता हे कसले नवीन खूळ आणलं हिनं?
तर काय झालं, सध्या फेसबुक, ईन्स्टा सगळीकडेच या हॅशटॅग खाली खूप सुंदर सुंदर चित्रे नजरेला पडतायत. ती बघून मलाही तश्या पध्दतीची चित्रे काढायचा मोह व्हायला लागला. म्ह्णून म्ह्टलं बघावं हे प्रकरण आहे तरी काय नक्की?
आज विज्ञान दिन. जेव्हापासून जॉर्ज मॉंबियोचे The Invisible Ideology हे भाषण ऐकले आहे तेव्हापासून भांडवलवाद, नवउदारमतवाद, आणि उपभोक्तावाद यांचा आणि विज्ञानाचा कसा परस्पर संबंध आहे हे उलगडून बघण्याचा छंद लागला आहे. यामधून काही नव्या जाणिवा झाल्या त्यातील दोन ठळक जाणिवा या लेखात मांडणार आहे. शीर्षक “विज्ञानाची ऐशीतैशी” असे देण्याचे कारण या दोन्ही जाणिवांनी मला विज्ञानाच्या आकलनात घडणाऱ्या वा घडविल्या जाणाऱ्या चुका किती महाग पडू शकतात हे लक्षात आलं.