गेली २ वर्षे घरात बसून काढली. त्यामुळे तिसरी लाट ओसरायला लागल्यावर सहलीला जाण्याचे वेध लागले. मला कधीपासून काझीरंगाला जायचं होतं. १ मे ला ते बंद होतं त्यामुळे एप्रिलमधे जायचं ठरवलं. आसाम बरोबर मेघालय करण्याचं ठरवलं. अजून एक मित्र-मैत्रीण कुटुंब पण बरोबर होते.
मग सुरू झाली सहलीची तयारी. सुट्ट्या टाकून दिल्या आणि मग सुरू झालं प्लॅनिंग. कुठे किती दिवस घालवायचे, काय काय बघायचं ह्यासाठी गूगल हाताशी होतचं. इ त के ब्लॉग्ज, व्लॉग्स बघितले की न जाताही सगळ्या ठिकाणांची खडानखडा माहीती गोळा झाली. ४-५ वीकांत चर्चा करून प्लॅन ठरला. मग हॉटेल, विमान, टॅक्सी बुकिंग्ज पार पाडली.
इतके दिवस आम्ही मेघालयच्या खासी भागात फिरत होतो. क्रँग सुरी हा धबधबा जैंतिया भागात येतो. हा तसा आडबाजूला आहे धबधबा. जास्त गर्दी नव्हती. मॉलिन्लाँग पासून २-२.५ तास लागले इथे पोचायला. दावकीवरूनच रस्ता आहे.
वाटेत लागलेला एक धबधबा -
क्रँग सुरीलाही पायर्या व्यवस्थित बांधलेल्या आहेत धबधब्यापर्यंत पोचायला.
दिवस ८ - हा दिवस पूर्ण अनप्लॅन्ड होता. कामाख्याला दर्शनाला वेळ लागतो कळल्याने ते ड्रॉप केलं. उमानंद हे एका बेटावर देऊळ आहे. बोटीने जाणार होतो पण उघडी बोट, ऊन आणि गर्दी बघून रोपवेने जायचं ठरवलं. रोपवे छान बांधला आहे. तिथून बाजारात खरेदी केली, खाऊन घेतलं आणि लिपीच्या घरून सामान उचलून निघालो. शनिवार आणि ट्रॅफीक म्हणून लवकरच निघून एअर पोर्टला पोचलो. ही लेखमाला लिहीण्याच्या निमित्ताने मनाने पुन्हा एकदा मेघालयात जाऊन आले
लेखकांच्या बाजूने बोलायचे तर रोजच्या रोज एक अख्खा एपिसोड लिहून द्यावाच लागतो. अगदी लिहायला काही सुचत नसले तरी, मूड लागत नसला तरी, एखाद्या पारंपारिक घरातलया बाईला बरे नसले तरी कसा स्वयंपाक करावा लागतो, अगदी तसेच.
भारतात ट्रॅव्हल कंपनीतर्फे गृप टुर्स केलेल्या मैत्रिणींनो, आपले अनुभव लिहा बरं इकडे.
कोणती कंपनी? कोणती ट्रिप?
कंपनीचे साईट, कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे
चांगले/वाईट अनुभव
सावधानतेचा इशारा
काय करावे/ करू नये
लेडीज ओन्ली ट्रिप केली असल्यास ते अनुभव
अनिश त्याचा ठरलेला दिनक्रम अति काटेकोरपणे पाळतो. भले लोक कितीही नावं ठेऊ देत. चारच्या ठोक्याला उठणार, मशीनमध्ये कडक डबल शॉट एस्प्रेसो तयार होईपर्यंत आन्हिके उरकून इंडियन एक्सप्रेस वाचत आरामात कॉफी. नंतर अर्धा तास रिलिजिअसली वजने उचलून कार्डिओ. मसल्स बनवण्यासाठी नव्हे तर मजबुतीसाठी. एखादा सर्जन जेव्हा OT मध्ये तासनतास उभा राहून ऑपरेट करतो तेव्हा मध्य लटपटीत असून चालत नाही. कोअर एक्सरसाईज इज अ मस्ट! पंधरा मिनिटे ध्यान आणि प्राणायाम. त्यानंतर आंघोळ आणि रोजचा ठरलेला ब्रेकफास्ट, मोठा ग्लास भरून पालेभाजी किंवा फळांची स्मूदी, ब्राऊन ब्रेडवर चार एग व्हाईट्स आणि भिजवलेले दोन चार बदाम.
लायझॉलच्या फेक लॅव्हेंडर वासाने हवा भरून टाकत सफाईवाल्याचा मॉप पुढे सरकला. जिकडे तिकडे फक्त नर्सेसच्या चटचट चालणाऱ्या पावलांचा आवाज वगळता शांतता पसरली होती. कोपऱ्यातील एकुलत्या पामच्या झाडानेही दमून पाने जमिनीकडे झुकवली होती. कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंना डॉक्टरांच्या केबिन्स होता. एकेक दार पास करत सुबोध त्याला हव्या त्या काचेच्या दारासमोर थांबला आणि समोरच्या स्टील नेमप्लेटकडे बघून एक खोल श्वास घेतला.
Dr. Anish Pai
MS (Gen Surg.) M.Ch (Cardiovascular & Thoracic)
अर्धा किलो भेंडी (दोन माणसांना पाव किलोही पुरेल )
तीन कांदे
दहा बारा लसूण पाकळ्या
एक इंच आलं
एक मोठा टोमॅटो
तीन चार हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
तेल
जिरे
1 टेस्पू चिली फ्लेक्स (नसतील तर लाल तिखट चालेल)
हळद
धने पावडर
गरम मसाला पावडर
मीठ