तुमचे आवडते रोमँटीक, फिल गुड, chick-flick, mushy इत्यादी चित्रपटांची यादी द्या! मला असले मुव्हीज लावून दोन तास डोकं बाजूला ठेवायला फार आवडते. तुमच्या लिस्टीतून काही न पाहिलेले मिळतील..
माझे काही आवडते.
१) नॉटींग हिल
२) मेड इन मॅनहॅटन
३) शॅल वी डान्स?
४) स्लीपलेस इन सिअॅटल
५) यु हॅव्ह गॉट मेल
६) द वेडींग डेट
७) रहना है तेरे दिल मे
फाईट म्हणजे एक पर्व असत... फाईट डीक्लेयर झाली कि मुलांची वजन तपासा मग वेट गृप पहा ... बोर्डर लाईनला असली मुल तर त्यांना आधीच्या वेट गृपमध्ये आणायचा प्रयत्न करा...पण उपासमार बिलकूल नाही... अटलिस्ट वजन वाढणार नाही याकडे लक्ष ठेवा. आम्ही कायमच वजनामुळे आमच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या मुलीच्या समोर येतो.
मागील आठवड्यात उरण पाणजे येथील खाडीवर जाण्याचा योग आला. खर तर आमची जाण्याची वेळ संध्याकाळची असल्याने थोडक्यातच समाधान मानून यावे लागले कारण सूर्यनारायण मावळतीला निघाले होते. पण जो वेळ तिथे घालवला तो पक्षी दर्शनाने सार्थक झाला ह्याचे मनोमन समाधान लाभले.
हातातल्या पुस्तकातली कथा रंगत चाललेली असताना लक्षात येतं ,
अर्ध्याच्यावर पुस्तक वाचून झालंय...
अरेच्चा शेवट जवळ आला की कथेचा.
च्च!! एवढ्यात नको ना शेवट व्हायला,
अजून जरा जास्ती असतं तर आवडेल वाचायला.
केवढी रंगलीये कथा!
त्यातली पात्र पण अगदी आपल्या मनासारखी वागतायत.
पुढचं पान उलटल..
हे काय अचानक वेगळ्च वळण घेतलं कथेनी?
हे अस नको ना व्हायला.
एवढी का गुंतत चालल्ये या सगळ्यामध्ये?
एक क्षुल्लक कथाच
ती काय वाचायची आणि सोडून द्यायची
पण असलं काहीतरीच का व्हायला लागलय?
पुस्तकात बुक-मार्क घालून ठेऊनच देऊया झालं...
कथेचा शेवट नकोच व्हायला.
आत्ता मैत्रीणीवर आले तेव्हा श्यामलीचा बुकमार्क हा धागा दिसला...
मी म्हटलं अरे चला आणखी कुणी बनवले ते बघुया..पण ती हस्तकला नव्हती हे नंतर कळलं :ड सुंदर लिहिलयसं श्यामली..
तर माझ्या रिकाम्यापणाचे, कंटाळा आले कि करायच्या उद्योगातला हा प्रकार इथे देतेय.. इथ बरीच वाचक मंडळी दिसतेय त्यांना कदाचित भावेल..
तर I am a book dragon (not a book worm..but a dragon). या छंदासोबत स्वतःच्या पुस्तकाविषयीचा पझेसिव्हनेस माझ्याबरोबर इतरांना सुद्धा खाऊन टाकतो.