January 2017

दोन बाजू

सध्या मला एक मोठाच प्रश्न सतावीत आहे मला. सर्वच बाबतीत असे नाही पण बऱ्याच बाबतीत मला कोणतीच बाजू ठामपणे घेता येत नाही. सगळ्यांचे सगळे बरोबरच वाटते आणि त्याचबरोबर चुकीचेही वाटते. आता सैफ-करीना ने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले त्यावरून एवढा गदारोळ माजला. सुरुवातीला मला पण थोडे विचित्र वाटले पण मग मी विचार केला की माझ्या मुलाचे नाव ठेवताना ना मी आई- वडिलांना विचारले ना सासूसासऱ्यांना मग सैफ-करीना ने काय म्हणून जनतेचा विचार घ्यावा (किंवा करावा)??? हेही पटले. पण तरीही तैमूर नाव ठेवायला नकोच होते हे ही पटले.

लेख: 

या चहा घ्यायला!

तर अलिकडे २ चहाच्या कपांचे सेट बनवले गिफ्ट म्हणुन. ज्यांना दिले त्यांना आवडले असे कळाले :)

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

सप्तरंगी

नियोजित वेळी विमान मुंबईहून निघाले आणि मी हुश्श केलं. खिडकी मिळाली होती. सहज म्हणून बाहेर पाहते तो अहो आश्चर्यम ! चक्क इंद्रधनुष्य !! पावसाचे दिवस नसतांना इतकं सुस्पष्ट इंद्रधनुष्य कसं काय दिसतंय याचंच अप्रुप वाटत होतं. फक्त मुंबईच्या स्कायलाईनवरच नाही तर चक्क चेन्नई येईपर्यंत त्याने साथ केली माझी. खूप छान वाटत होतं. एकमेकांत मिसळलेले तरीही स्वतःचं वेगळं अस्तित्व जपणारे सप्तरंग. बराच वेळ न्याहाळत होते मी ते.

Keywords: 

लेख: 

कलर्ड पेन्सिल ड्रॉइंग वर्कशॉप!

हाय मैत्रिणींनो,

मी वर्षा. माबोवर तुम्ही कदाचित माझी कलर्ड पेन्सिल माध्यमातील चित्र पाहिली असतील.
मागील वर्षी मला काही जणांनी हे ड्रॉइंग शिकवशील का असं विचारलंही होतं, तेव्हा लगेच जमणार नव्हतं पण तेव्हापासून याबद्दल मनात घोळत होतं. तर आता या नवीन वर्षात या दिशेने मी पाउल उचलेले असून कलर्ड पेन्सिल ड्रॉईंगची बेसिक टेक्निक्स शिकवणारे चार तासांचे वर्कशॉप मी येत्या २९ जानेवारीला दादरच्या किंग जॉर्ज शाळेमध्ये १ ते ५ या वेळात घेत आहे, हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे.

वयोगटः वय वर्षे ७ आणि पुढे कितीही! :)
फी: रु.६०० प्रत्येकी फक्त.

Keywords: 

कलाकृती: 

अनुल्लेख

तुझ्या नजरेतून पहायचय जग मला
कसं दिसतं तुला हे समोरच झाड?
हिरवकंच उत्साहाने डवरलेलं
की उगाच रस्त्यात अडगळ ठरलेलं
तुझ्या नजरेतून पहायचय मला
कसं दिसतय तुला आत्ताचं आकाश?
वेडावून ओथंबून बरसू पाहणारं
की उगाच काळोखं मळभ दाटलेलं
तुझ्या नजरेतून पहायचय मला
कसं दिसतं तुला हे घराकडे नेणारं अंतर?
थकल्या जीवाला विश्रांत मुक्कामी नेणारं
की शुष्क करडं कोडं दिशाहीन पसरलेलं
तुला दिसत ना रे हे सगळं नक्की
हे झाड ,आकाश ,तो रस्ता, मी?
खरतर तुझ्या नजरेतून पहायचय मला
स्वतः कडेच
आणि मग ठरवायचय

मी, न्या नी..... दंगल

दंगलच्या निमिताने ग्रुपवर चर्चा झाली, ‘मुलांना त्यांच्या मर्जी विरुद्ध एखाद्या गोष्टी साठी पुश कराव का ?’ त्यावर माझं म्हणन होत ,”हो, सुरवातीला कराव लागतच, त्यानंतर जर नाहीच लागली आवड तर द्याव सोडून “ यात अनन्याच उदाहरण आलं नी सगळ्या जुन्या आठवणी निघाल्या :dd:

अनन्या जन्मत:च हायपर ऍक्टिव्ह मुलगी , प्रचंड एनर्जी होती तिच्यात ,ती दमून झोपावी यासाठी काय काय नाही करायचो पण जोवर आई बाप बेशुद्ध पडले याची खात्री व्हायची नाही तोवर ती झोपायची नाही , अगदी आमच्या पापण्या उघडून पण लास्ट ट्राय मारायची Vaitag ...

Keywords: 

लेख: 

थोडे दिवस

इवलेसे हात तुझे सामावू दे माझ्या हातातच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

निरर्थक बडबडणे तुझे ऐकू येऊ दे सततच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

घरभर फिर माझ्यामागे तू अजून रांगतच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

हट्ट तुझा पुरवत राहू देत मला कायमच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

हास्य निरागस तुझे घरात राहू दे फुलतच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

अनुभवू दे मला लहानपण तुझे अजूनच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

कविता: 

नर्मदा परिक्रमेबद्दल माहिती हवी आहे.

मातोश्रींच्या डोक्यात अचानक र्मदा परिक्रमा करायचे आले आहे. तिला मनापासून फिरायला आवडते. एकटीच असल्याने कोणी चांगली कंपनी मिळाली की तिचे बेत आखणे सुरू होते. अजून छान चालते फिरते आहोत तो पर्यंत भारत फिरणे ही इच्छा! परवा एका नर्मदा परिक्रमेचे पत्रक मला पाठवून याला मी जाऊ का अशी विचारणा झाली आहे. मी ते पत्रक बघितले तर मला काही गोष्टी खटकल्या म्हणून तिला मी थोडी माहिती काढते असे सांगून थोपवले आहे. तर मला थोडी माहिती हवी आहे.

Keywords: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle