मानेवर रुळणारे केस, तो जवळ असल्याची जाणीव, अगदी हलका व्हाईट मस्कचा वास.
त्यात आम्ही आत्ताच डान्स करून आलो होतो. मी वर खाली पळापळी करताना मधेच बॅगेतला डिओ एकदोनदा फुस्कारून घेतला होता. मला अंकित बद्दल आकर्षण वाटत होतं म्हणून नव्हतं ते. कुणालाही डान्स नंतर भेटावं लागणार असेल तर हेच केलं अस्तं मी. आणि त्यानंही केलं असेल. नाहीतर तो व्हाईट मस्क जाणवला अस्ता का मला?
अंकित बाई़क अगदी काळजीपूर्वक चालवत होता. नो धक्के, नो स्पीड अप डाऊन्स. मुलं पोरगी मागं बसली असेल तर जी काही टॅक्टिक्स वापरतात त्यातलं काही नाही. मी अगदी कंफर्टेबली मागं बसले होते.
नमस्कार,
काय म्हणता?
सर्वप्रथम तुम्हांला मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!! गुढीपाडवा झाला आणि तुमच्यापैकी अनेकांच्या स्पेशल मेनू आणि तयारीच्या पोस्ट्सनी मैत्रीण फुलून गेली होती. आता पाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र महिन्यासाठी आपण आपला एक जुना उपक्रम नवीन रुपात पुन्हा एकदा घेऊन येत आहोत... अर्थातच चैत्रवाण!
भरली वांगी हा प्रकार मला प्रचंड आवडतो! अर्थात वांगी अजिबात आवडत नाहीत! मग मी ती बाबा, नवरा ह्या लोकांना वाटुन टाकते. पण तो मसाला / रस्सा जो असतो तो
मी आख्खं आयुष्य ह्या खाली दिलेल्यातली ९०% रेसिपी फॉलो करत आले. परंतू आत्ता गेल्या समरला नणंद आली आणि तिने केलेली भरली वांगी खाऊन मी फ्लॅटच झाले. इतकी सुपर्ब झाली होती.. ती बरीचशी माझीच रेसिपी फॉलो करायची परांतू एक स्टेप वेगळी होती. मग तिची ती टीप वापरून मी करू लागले.
दुधी वापरून झाल्यावर साल वाया जाऊ द्यायची नसल्यास ह्या पद्धतीने चटणी करुन बघता येईल.
साहित्य-
सगळं अंदाजे आहे.
मी दोन दुधींच्या साली धुवून वापरल्या.
अंदाजे दोन ते तीन टीस्पून तीळ,
दोन तीन टीस्पून सुक्या खोबर्याचा कीस
अर्धा चमचा जिरं
एक चमचा तेल
दोन तीन टीस्पून दाण्याचं कूट किंवा तेवढं कूट होण्याइतके दाणे
चवीपुरतं मीठ, साखर, लाल तिखट.
कृती-
दुधीच्या साली कात्रीने कापून मध्यम तुकडे करावेत.
तेलावर जिरं घालून फोडणी करावी. त्यात तीळ परतावेत.
त्यावर दुधीच्या साली घालून परतत राहवं. त्यावरच खोबर्याचा कीसही घालावा. त्यावरच चवीपुरतं मीठ, तिखट, साखर घालून
आमच्या एलएच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या जॉगिंग ट्रॅकवर फार सुंदररीत्या जॅकरंडा लावला आहे. मध्ये गोल फौअंटन.. त्याच्या भोवती गोल जॉगिंग ट्रॅक्स आणि त्याच्या बाहेरून गोलात सगळी जॅकरंदाची झाडं! उन्हाळात जॅकरंडा फुलायचा आणि तो सगळा एरिआ जांभळा होऊन जायचा! झाडावर फुलंच फुलं आणि खाली सडाच सडा! फार सुंदर दृश्य! दुर्दैवाने मला कधीच तिथे निवांत फोटो काढायला जायला जमले नाही. कायम काढू काढू केले आणि तिथून हललोच आम्ही!
साहित्य- कुरडयांचा चुरा, कांदा, तेल, लाल तिखट, हिंग, मीठ
कृती- कुरडयांचा चुरा भरपूर गरम पाण्यात भिजवून ठेवायचा. मग लगेच जरा सढळ हाताने तेल घेऊन उभा चिरलेला कांदा त्यात परतायचा. कांदा पण जरा जास्तच घ्यायचा. लाल तिखट, हिंग घालायचं. कांदा मौ झाला की कुरडया निथळून त्यात घालायच्या. झाकण ठेवून, अधूनमधून परतायच्या. मौ शिजेतो पाण्याचे हबके मारायचे. चवीनुसार मीठ घालायचं.
मग कोथिंबीर आणि हवं तर लिंबू. नाक सूं सूं करत खाण्याइतपत तिखट करायची. पोळी अथवा भाताबरोबर पण छान लागतं.