मला कधी पासून जपानी खाद्यसंस्कृतीवर लेख लिहायचा आहे पण त्या विषयाचा आवाका एकतर प्रचंड आहे आणि त्यात माझ्या डोक्यात इतके काही आहे की ते सलग उतरवून होणार नाही. तेवढा वेळ पण नाही आहे सध्या. कदाचित अशा छोट्या छोट्या गोष्टींचे काही लेख लिहू शकेन.
तर सुरूवात बेंतो पासून. कारण हा पण जपानी खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे आणि डब्यातला खाऊ या धाग्यावर बर्याच जणींना हे बेंतो प्रकरण आवडले म्हणून हा लेखप्रपंच!
रमझान निमित्याने असंचं मधुरा रेसिपीज वर बुलानी पराठा बघितला त्यात बदल करून मी पराठे केले रात्री, छान झालेले. हल्ली फेसबुकवर आपोआप वेगवेगळ्या रेसिपीजचे व्हिडीओज येत असतात, मी कोणाला like केलेलं नाहीये. हेब्बर, मधुरा, तरला दलाल etc. कधीतरी बघते क्वचित त्यात बघितलेला पराठा.
मी बरेच बदल केले मात्र त्यात. माझ्याकडे जे उपलब्ध ते घालून केला. आपली कणिक ताक,ओवा
कैरी सालासकट बारीक चिरायची, कांदाही बारिक चिरायचा. शक्यतो पांढरा कांदा असेल तर बेस्ट. मग दोन्ही एकत्र करुन त्यात मिठ, तिखट (सढळ हाताने), कच्च तेल, जरा साखर टाकून हाताने कालवायचं. हवा असल्यास त्यात केप्रचा तयार लोणचं मसालाही घालायचा. तो घातला तर तिखट कमी टाकायचं. फोडणी द्यायची नाही. हे एकत्र मिश्रण दोन दिवस बाहेर आणि फ्रिजमधे जास्त टिकतं. अफाट यम्मी लागतं. पोळीच्या रोलमधे घालून तर बेस्ट. मी नाचणी किंवा ज्वारीच्या भाकरीवर चांगलं डावभर टाकते आणि संपवते.
बरेच लोक हल्ली लो कार्ब डाएट करायचा प्रयत्न करत असतात. आणि तशा प्रकारचा आहार घेण्याची सवय लावून घेणे अवघड जात असल्याने मध्ये मध्ये अडखळतात. मी गेलं एक वर्षं असा आहार घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. अशा आहाराबरोबर मी आयएफ सुद्धा करते. त्यामुळे दोन्हीचा मिळून शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो.
ॐ नमः शिवाय...
२०११ सालच्या जून-जुलै महिन्यात कैलास- मानस सरोवराची पवित्र यात्रा करण्याचा शुभयोग आला. एकाच वेळी नितांतसुंदर आणि रौद्रभीषण असणाऱ्या त्या अनुभवाचं मी माझ्या तोकड्या भाषेत केलेलं हे वर्णन..
आज १२ जून. सतरा वर्षांपूर्वी याच दिवशी आमचे बाबा आम्हांला कायमचे सोडून गेले. आज इतक्या वर्षांनंतर अचानक बाबांबद्दल लिहावंसं वाटतंय!
मी कॉलेजमधे असताना कधी कधी बाबा उगीच आमची काळजी करायचे ना तेव्हा मी त्यांना सांगायची,” कशाला एवढं टेन्शन घेता बाबा? बी पी वाढेल तुमचं.” तेव्हा ते म्हणायचे ,” जब तुम बाप बनोगी तब पता चलेगा।” त्यावर मी चेष्टेत उत्तर द्यायची,” फिर तो मुझे कभी पता नहीं चलेगा, क्यूँकी मैं तो माँ बनूँगी।”
इंटरलाकेन नंतरचा दिवस ना पाउस ना उन असा होता. त्यामुळे फार लांबवरचा प्रवास नको असा विचार करून पहिल्या स्थानाकडे निघालो. हे होते, ट्रुमेलबाख फॉल्स (Trummelbach Falls). लाउटरब्रुनेन व्हॅली ही एकूण ७२ धबधब्यांची व्हॅली म्हणून ओळखली जाते. याच भागातील आल्प्स मधील आयगर, युंगफ़्राउ आणि म्योंश या शिखरांमधून वाहत येणारे पाणी वेगवेगळ्या टप्प्यात, मोठमोठ्या खडकांवर आदळत आपला मार्ग काढत पुढे नदीच्या पात्रात बदलते, साधारण २०००० लिटर पाणी दर सेकंदाला खाली कोसळते त्याचे कोसळण्याचे १० टप्पे म्हणजे हे १० धबधबे.