हा दिवस सगळ्यात लांबच्या प्रवासाचा होता. सकाळी लवकरच हॉटेल मध्येच नाश्ता करून बाहेर पडलो. आम्ही गाडीत सामान ठेवत असतानाच एक आजोबा या घाटातून सायकलने वर जात होते. युरोपात सायकल तशी काही नवीन नाही. रोज ऑफिसला २०-२२ किमी सायकलने येणारे अनेक लोक आहेत. पण या इतक्या उंच चढावरून सत्तरीच्या आसपासचे आजोबा सायकलने जात होते. कमाल. हॅट्स ऑफ एवढे दोनच शब्द आले मनात. त्यांना हसून हात दाखवला आणि गाडीत बसलो.
साहित्य-
ब्रोकन व्हीट ऊर्फ गव्हाचा दलिया एक वाटी
दोन वाट्या दूध
साखर एक वाटी
व्हाईट चॉकलेटचे तुकडे एक वाटी
व्हॅनिला इसेन्स
चमचाभर तूप
(प्रयोगच केलेले असल्याने परफेक्ट प्रमाण नाही. शिवाय प्रत्येकाची गोडाची आवड वेगवेगळी असते.)
कृती-
चमचाभर तूप घालून दलिया त्यावर मस्त परतून घ्या. अडीचपट पाणी घालून शिजवून घ्या.
सततच्या प्रवासानंतर आता पुढचे सहा दिवस एकाच ठिकाणी मुक्काम होता त्यामुळे रोजची सामान आवराआवरी हा प्रकार नव्हता. हवामानाचा अंदाज बघायचा आणि त्याप्रमाणे त्या दिवसाचा बेत करायचा असे ठरले होते. पर्वतशिखरे बघण्यासाठी सूर्यप्रकाश नसेल आणि नुसतेच ढग असतील तर काहीच मजा नाही. सकाळी उठून पुन्हा बघितले तेव्हा ठरल्याप्रमाणे शिल्थोर्नला हिरवा झेंडा मिळाला.
हवामानाचे अंदाज बघत दुसऱ्या दिवशी कुठे जावे यावर विचार सुरु होता. डोक्यात होते युंगफ्राउ (Jungfrau) या शिखरावर जायचे. इथवर जाण्यासाठी डोंगरातून रेल्वे मार्ग तयार केलेला आहे जो आयगर (Eiger), म्योंश (Moensch) अशा शिखरांखालुन युंगफ्राउ पर्यंत जातो. इथून दिसणारा निसर्ग, इथे असलेले बॉलीवूड रेस्टॉरंट आणि वर बर्फ असल्याने त्यात खेळण्याची मजा हे वर जाऊन करावयाचे उद्योग. याच भागातले काही ट्रेक्स आधीच बघून ठेवले होते आणि तेही करायची इच्छा होती. एकाच दिवसात सगळे होणे कठीण वाटले. मग काय करावे असा विचार सुरु झाला. आधल्या दिवशी जे काही दुरून दिसत होते त्याप्रमाणे बर्फ बराच वितळला होता.
ह्या रेसिपीची मी खुप मोठी फॅन आहे. आग्रहाने खायला घालून खुप लोकांना खुष केलेय. मी प्रथम खाल्ला ते मैत्रिणीच्या घरी आणि तिच्या ब्लॉगवर रेसिपी आल्यावर मी काहीही बदल न करता नेहेमी करत आलेय. प्रमाण १ कपचे आहे पण मी ४ कपांपर्यंत केलेला आहे हा केक पण प्रत्येकवेळी पल्प वापरूनच. पण घरी काढलेला रस घालून करू शकू पण थोडी साखर जास्त लागेल.
ही रेसिपी -
१ कप रवा
१ कप मँगो पल्प
१/२ कप साखर (पल्प गोड असेल तर थोडी कमी चालेल)
१/४ कप तेल (शक्यतो वास नसलेले सफोला वगैरे)
मी शाळेत असताना कधीतरी (नक्की साल लक्षात नाही) एकदा मी संध्याकाळी घरी आले तेव्हा आई बाबा बाहेर गेले होते. दिंदीला (माझ्या मोठ्या बहिणीला) विचारलं तर ती म्हणाली,’ सोहोनी काकूंकडे गेलेत.”
ते ऐकताक्षणी मी आनंदानी उडालेच. त्याला कारण ही तसंच होतं. काही दिवसांपूर्वी सोहोनी काकूंनी (आमच्या आईची मैत्रीण) आईला फोन केला होता .. त्यांच्या ‘डॉली’ नावाच्या पॉमेरिअन कुत्रीला पिल्लं झाली होती . ‘त्यातलं एखादं पिल्लू तुम्हाला हवं आहे का?’ या त्यांच्या प्रश्नाला आम्ही खूप जोरात ‘ होsssss ‘ असं उत्तर दिलं होतं. आणि त्या दिवशी त्यातल्याच एक पिल्लाला घरी घेऊन यायला आई बाबा काकूंकडे गेले होते.
सकाळी उठून बाहेर पाहिले तर वरुणराजा कोसळत होते. घरातून बागही दिसत नव्हती एवढे दाट धुके होते. थोडा वेळ वाट बघुयात नाहीतर पडू बाहेर, असा विचार करून आवरले. यापूर्वीचा आमचा अनुभव बघता संपूर्ण सहलीत जर पाउस आलाच नसता तर खरं तर आश्चर्य वाटले असते. तर अशीच त्या दिवशी पावसाला विश्रांती घ्यायची अजिबातच इच्छा नाही असे दिसले. त्यामुळे छत्र्या, जॅकेट सोबत घेऊन शेवटी बाहेर पडलो. आमच्या मालकांच्या कृपेने आम्हाला एक कार्ड मिळाले होते ज्यात इंटरलाकेनच्या जवळचा काही प्रवास फुकट होता. :) म्हणून मग चालतच विल्डर्सविल स्थानकावर आलो जिथून इंटरलाकेन साठी ट्रेन घ्यायची होती.
साहित्यः ४ लोणच्याच्या राजापुरी कैर्या, २ चमचे मोहोरीची डाळ, कैरीच्या तासाच्या निम्मा गूळ किंवा आवडीप्रमाणे, २ चमचे तेल(फोडणीसाठी), पाव चमचा मेथ्या पावडर, पाव चमचा हळद, पाव च. हिंग
कृती: कैरीचा तास म्हणजे काय ते प्रथम पाहू. लोणच्याच्या राजापुरी कैर्या जर ४ असतील तर या कैर्या नेहेमीच्या लोणच्यासाठी कापून घ्या. या राजापुरी कैर्यांना गर खूप असतो. त्यामुळे फोडी करताना अगदी कोयीजवळून खरडून न घेता फोडी करा. या फोडींचे नेहेमीच्या पद्धतीने लोणचं करा.
इंटरलाकेनला भटकल्या नंतर पावसाने तशी पुढच्या दिवशी विश्रांती घेतली. पण हवामान ढगाळच होते. त्यामुळे त्या दिवशी फारसे काही पाहिले नाही. जे काही पाहिले तो अनुभव वेगळाच होता, एकूण दिवस मस्त गेला होता पण तो भाग अगदीच लहान होत असल्याने शेवटच्या भागात त्याबद्दल लिहुयात असा विचार करून आरं नदी आणि जवळपासचे धबधबे यांना पुन्हा एकदा उचलून पुढच्या भागात ढकलले आहे.