June 2018

माझे पेपरचे प्रयोग (१) - Lumière Art and Crafts

मी बनवत असलेल्या दागिन्यांसाठी (पेपर ज्वेलरी) मैत्रीणवर धागा काढायचा कधीपासून मनात होते. त्याला आता मुहूर्त मिळाला. :)

पहिलं थोडेसे माझे पेपरचे प्रयोग आणि पेपर कलाकृती व्यवसाय याबद्दल सांगते.

बेसिकली मी ग्राफिक डिझाईन क्षेत्रात काम करणारी त्यामुळे कागद.. पेपर आणि रंग यांच्या मी कायमच प्रेमात. विविध प्रकारचे पेपर्स, त्यांचे पोत (Texture), त्यांचे रंग, डिझाइन्स मनाला नेहमीच भुरळ घालत आलेले. त्यामुळे साधारण ५ वर्षांपूर्वी पेपर क्विलिंग या कलेची ओळख झाली तेव्हा मला तो प्रकार एकूणात फारच आवडला. रंगीबेरंगी पेपर पट्ट्या वापरून किती कायकाय डिझाइन्स बनू शकतात हे बघून मी तर थक्क झाले.

सुरुवातीला पेपर क्विलिंगने ग्रीटिंग कार्डस, एनव्हलप्स, गिफ्ट टॅग्स, टिश्यू होल्डर, पेन होल्डर, फोटो फ्रेम असे छोटे मोठ्ठे बरेच प्रयोग केले. माझ्या ग्राफिक कामात पार्टनर असणारी माझी मैत्रिणही माझ्या क्विलिंगच्या प्रयोगात सोबत होती. हे प्रयोग करत असतानाच पेपर ज्वेलरी डिझाइन्सची अफाट दुनियाही आम्हाला खुणावू लागली.. मग आम्ही पेपर क्विलिंगची काही इअरिंग्ज आणि पेन्ड्टस बनवून पाहिली. ती नातेवाईकांत, मित्र परिवारात पसंतीला आली. शिवाय अजून करून देण्याच्या मागण्याही आल्या. पेपर ज्वेलरी असल्याने ती वॊटरप्रूप करणे आवश्यक होतेच पण ती अधिक टिकाऊ आणि सुरक्षित होण्यासाठी आम्ही बरेच R & D केले. आणि त्याला बऱ्यापैकी यश आले.

आतापर्यंतचे क्विलिंगचे प्रयोग केवळ फक्त छंद म्हणून करत होतो. पण यावेळी आम्ही दोघींनी त्याला व्यवसायाचे स्वरूप द्यावे असे ठरवले. मी पूर्वी मेणबत्त्या बनवायची तेव्हा त्यासाठी Lumière नावाचे फेबु पेज बनवले होते, पुढे मेणबत्त्या बनवणे बंद केल्यामुळे ते असेच कोमात गेलेले :ड त्या पेजला पुनरुज्जीवन दिले आणि Lumière आर्ट अँड क्राफ्ट्स अंतर्गत हॅन्डमेड पेपर ज्वेलरी आणि पेपरच्या इतर कलावस्तू यांचा व्यवसाय आम्ही सुरु केला.

ज्वेलरीसाठी लागणारे मेटलचे फायडींग्ज यांना पर्यायच नव्हता पण ज्वेलरी बनवताना जास्तीत जास्त वापर हा पेपरचा राहील, हे आम्ही व्यवसाय सुरु करतानाच पक्के केले. पेपर हे इतके versatile माध्यम आहे की तिथे तुमच्या क्रिएटीव्हीटीचा कस लागतो.

पेपर बीडस, पेपर विव्हिंग, पेपर क्विलिंग, ओरिगामी अश्या वेगवेगळ्या पध्द्तीची पेपर ज्वेलरी आम्ही आतापर्यंत बनवली. ज्वेलरी व्यतिरिक्त क्विलिंग आणि पेपर पासून गिफ़्ट बॉक्सेस, wind chimes, नोट पॅड्स, पेपर बॅग्स, किचेन्स, स्टेशनरी अश्या बऱ्याच वस्तूही बनविल्या.

आम्ही केलेले काही निवडक पेपर प्रॉडक्ट्स आणि ज्वेलरी
१. गिफ़्ट एन्व्हलप्स
01 env.jpg
२. फोटो फ्रेम्स
02 frames.jpg
३. गिफ़्ट टॅग्स
03 Tags.jpg
४.पेपर बॅग्स
05 Bags.jpg
५.कीचेन्स
06 KC.jpg
६. स्टेशनरी
06 Stationery.jpg
६. ईअरिन्ग्ज
06 earrings.jpg
07b earrings.jpg

७. नेकपीसेस
08.jpg

अधिक डिझाईन्स तुम्ही ह्या माझ्या फेसबुक पेज वर पाहू शकाल.

जेव्हा आम्ही ४ वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरु केला, तेव्हा 'पेपर ज्वेलरी' संकल्पनाच खूपजणांसाठी पूर्णत: नवीन होती... शिवाय आर्टीफिशियल ज्वेलरीच्या विविध, प्रचंड डिझाइन्स आणि मागणीपुढे पेपर ज्वेलरीचा व्यवसाय कसा तग धरेल.. टिकेल ही शंका होती. त्यामुळे एकूण व्यवसायाला कसा प्रतिसाद मिळेल ही धाकधूक होतीच. पण आमच्या सुदैवाने आमच्या ह्या कलात्मक सफरीला दाद देणारे, लुमियरच्या वस्तू, ज्वेलरी आवर्जून विकत घेणारे कलाप्रेमी ग्राहक, मित्रमैत्रिणी आम्हाला मिळाल्या... आमच्या व्यवसायाचा मुख्य यूएसपी होता.. आहे तो म्हणजे ज्वेलरी हलकी (lightweight) आहे. ज्यांना ज्वेलरीची आवड आहे पण जड ज्वेलरी वापरायला त्रास होतो त्यांना हा ज्वेलरी प्रकार विशेष भावला.

दरम्यान आम्ही बर्‍याच प्रदर्शनांतूनही भाग घेतला. ४ वर्षे क्विलिंगचा ध्यास घेतल्यावर गेल्या वर्षी क्विलिंग व्यतिरिक्त पेपरज्वेलरीत अजून काय करता येईल ह्यावर विचार करुन झेंटँगल आणि ग्राफिक डिझाईन आर्टवर्कस करून आर्ट इअरींग्ज करून पाहिले. ह्या प्रयोगावर आम्हीच खूप खुश होतो. आणि अर्थात इतरांकडून ही छान प्रतिसाद मिळाला.
09 Art earrings.jpg

हक्काने मैत्रिणवर शेअर करायला, बस्केने ईतके जिव्हाळ्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिलय त्यासाठी तिचे आणि मै टीमचे खूप खूप धन्यवाद !!:)
_________________________________________________________________

माझे पेपरचे प्रयोग (२)

Keywords: 

कलाकृती: 

माझी सैन्यगाथा (भाग १२)

This is the best part about the ‘armed forces’. दर २-३ वर्षांनी नवीन जागा, नवीन ओळखी, नवीन मित्र मैत्रिणी !

पण जरी नवी नाती जुळली तरी आधीची नाती पुसट नाही होत… उलट अजूनच घट्ट होतात.. लोणचं कसं मुरत जातं…. तशीच !

भलेही तुम्ही वर्षानुवर्ष एकमेकांपासून लांब असलात तरी जेव्हा कधी भेटीचा योग येतो तेव्हा असं वाटतं जणू काही कालच भेटलो होतो, मधली सगळी वर्षं अचानक नाहीशी होतात! आणि हे फक्त ऑफिसर्स बद्दलच नाही बरं का! Ladies आणि मुलांच्या बाबतीतही हाच नियम लागू पडतो.

पण यामधेही काही नाती ही खूप स्पेशल असतात. अगदी खासम् खास …..“नवऱ्याचे कोर्समेट्स आणि त्यांचे परिवार” …

लेख: 

लुई द ओन्ली वन (१)

लुई द ओन्ली वन
(प्रस्तावना: हा लेख मी फार पूर्वी मायबोलीवर लिहिला होता. आज आमच्या लुईला जाऊन दोन महिने झाले. म्हणून त्याची आठवण म्हणून हा लेख इथे परत अपलोड करत आहे.)

Keywords: 

लेख: 

लुई द ओन्ली वन (२)

१५ एप्रिलला आमच्या घरातला एक सदस्य "लुई" याचे दु:खद निधन झाले. इथल्या बऱ्याच "मायबोली"कर मुलींना लुईची चांगलीच ओळख आहे. लुईच्या वयानुसार हळूहळू सगळ्या अ‍ॅक्टिविटीज मंदावल्या होत्या. शेवटी शेवटी त्याच्या पाठीमागून पाहिले तर त्याच्या प्रायव्हेट पार्टवर काही तरी जखमा दिसत होत्या, त्या लवकर बऱ्या होईनात.

Keywords: 

लेख: 

माझे पेपरचे प्रयोग (२) - Lumière Art and Crafts

माझे पेपरचे प्रयोग (१)
____________________________________________________________________

पेपर हाच केंद्रबिंदू ठेवून ज्वेलरी आणि इतर कला वस्तू करताना आम्हीच आमच्या क्रिएटिव्हीटीला थोडे बांधून घातलय असे वाटू लागलं. पेपरची सोबत तर सोडायची नाहीच पण त्यासोबत आणि थोडे त्या व्यतिरिक्तही इतर काही माध्यमे वापरून पाहिलीत तर.... काहीतरी फ्युजन करून पाहूया असे ठरवले.

Keywords: 

कलाकृती: 

म्युचुअल फंड- अपना सपना मनी मनी-१

"काय म्हणावं बाई या महागाईला!! कालच्यापेक्षा आज जास्त तर आजच्यापेक्षा उद्या अजुन वाढलेली!!"

"काय सान्गता.. दुध ५० रुपये लिटर?? अहो, दहा वर्षापुर्वी २० रुपयला मिळायचं लिटरभर!"

"कितीही काटकसर करा, पैसा कमीच पडतो"

....ही आणि अशी वाक्य आजुबाजुला तुम्हीही ऐकली असतीलच ना मैत्रिणींनो?
मुळात पैसा कितीही कमवा, पुरतच नाही ही खंत प्रत्येकालाच सतावत असते. खर्च वाढलेत की महागाई हेच कळत नाही. आपणही श्रीमंत व्हावं, कसलीही चिन्ता न बाळगता खर्च करण्याइतके पैसे आपल्याकडे असावे अशी सगळ्यांची इच्छा असते. त्यासाठी मग आपण बँकेत पैसे साठवतो, एफ डी करतो, पण अपेक्षित परिणाम मिळत नाही.

लेख: 

उन्हे उतरलीं

उन्हें उतरलीं
एक सावली
पुढें दिठीवर थेंब नवा
या वळणाशीं
दुःख उराशीं
सूर वितळतो जणुं भगवा.
- ग्रेस (अजून कोण!)

IMG_20180617_122830.jpg

वर्षाने शिकवल्यापासून बरेच दिवस कलर पेन्सिलने लँडस्केप करायचे होते. युट्युबवर शोधून एका चित्राचा फोटो काढून ठेवला होता. बऱ्याच दिवसांनी काल मुहूर्त मिळाला आणि करून टाकले लँडस्केप! धन्यवाद वर्षा इतक्या छान मिडियमची ओळख करून दिल्याबद्दल :)

Keywords: 

कलाकृती: 

आला आला फेरीवाला

रविवारची आळसावलेली दुपार. सहज काहीतरी वाचत पडले असतां कानावर एक आवाज आला. "ए धारवालाSSSSS कैची, छुरी धाSSSSSर". एखादा परिचित सुगंध अनेक वर्षांनी अनुभवास आला की कसं मन लगेचच दुडदुडत तितकी वर्ष मागे त्या सुगंधाच्या आठवणींपाशी झेपावतं अन तिथेच रेंगाळतं तसंच झालं काहीसं. सायकलवर विराजमान झालेला आणि सायकलच्या हँडलवरील पिशवीत काही सुर्‍या, चाकू,इतर साधनसामुग्री खोवलेला संसार सावरत साद घालणारा हा धारवाला मला कैक वर्षं मागे घेऊन गेला....आठवणींच्या रम्य प्रदेशात बागडायला.

Keywords: 

लेख: 

सेव्हन लेअर डिप

७ लेअर डिप हे खरंतर री ड्रमंडच्या "पायोनिअर वुमन" नांवाच्या कुकरी शोमध्ये मी पहिल्यांदा पाहिले. नंतर गूगलवर त्याचे अनेक वेरिएशन्स सापडले. मात्र माझ्या शाकाहारी मैत्रिणींसाठी मी त्यात थोडे बदल करून मागच्या पार्टीत हे डिप बनवले आणि सर्वांना खूप आवडले. त्याची रेसिपी खास तुमच्यासाठी.

साहित्यः-
१. रिफ्राईड बीन्स- मी ह्याचा कॅन वापरला. तुम्हांला हवे असल्यास उकडलेला राजमा मॅश करून थोड्या तेलात परतून त्यात जिरेपूड, (ऐच्छिक लसूण पावडर) आणि तिखट घालून ते सुद्धा वापरू शकता.
२. मक्याचे दाणे- कॅन्ड अथवा फ्रेश.
३. सावर क्रीम / आंबट दही.
४. ग्वाकामोल.

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle