नमस्कार
आज मी माझा शिकाशिकवा हा ब्लॉग सर्वांसाठी खुला करते आहे. गेली सात वर्षे हा ब्लॉग सशुल्क होता. जगभरातील अनेक जणींनी याचा लाभही घेतला. अजूनही घेत आहेत.
आजच्या परिस्थितीत मला असा वाटल की आपणही काही करावं,. या द्रूष्टीने आज हा ब्लॉग मी ओपन टू ऑल करते आहे. आज पासून कोणीही या ब्लोगवरती जाऊन विणकाम शिकू शकेल. आशा आहे हा उपक्रम काहींना विरंगुळा देईल, सद्यस्थितीतील ताणतणावांना सामोरे जाताना हा छंद तुम्हाला मदतीचा ठरेल. शुभेच्छा ! https://shikashikava.blogspot.com/
कथा - स्वप्नाली मठकर
कथाकथन - अॅड. माधवी नाईक
पार्श्वसंगित आणि संकलन - स्पृहा साहू
निसर्गकथा : चिमण्या आणि डोंगर
हिवाळा सरत आला तसं चिमण्यांची दाणे शोधायची ठिकाणं दूरदूर व्हायला लागली. आसपासची सगळ्या शेतांची कापणी झाली. कुरणातले दाणेही संपत आले. म्हणजे अगदीच काही संपले नाहीत पण जास्त चिमण्या आल्या तर मात्र पावसाळा सुरु होई पर्यंत पुरले नसते. दूर दूर जाऊन खरंतर छोट्या चिमण्या दमून जायच्या. आता जवळच्या जवळ एखादी खाण्याची सोय करायला हवी हे सगळ्यांनाच वाटत होतं.
प्रिय मैत्रिणींनो,
एक आनंदाची बातमी..
जर्मनीतल्या हॅनोवर शहरात सिनियर केअर होममध्ये रेसिडेन्ट सायकॉलॉजीस्ट म्हणून मला नोकरी लागली. ती सुरू होऊन आता 3 आठवडे झाले. रोजचा दिवस वेगळा आणि अनेक आठवणींनी भरलेला असला, तरी
कालचा दिवस माझ्यासाठी स्पेशल होता.. त्यानिमित्ताने काल लिहिलेला लेख शेअर करते आहे.
एप्रिलमधे नी या ब्रॅण्डला पाच वर्षे पूर्ण झाली.
पाच वर्षपूर्तीसाठी म्हणून बरेच काय काय योजले होते. ते करोनाच्या संकटामुळे गळपटले.
सगळ्या निरूत्साही वातावरणात पाचव्या वर्षपूर्तीचे कलेक्शनही रखडले.
पण आता आपले आपणच बळ एकवटून कामाला लागण्याशिवाय पर्याय नाहीये.
पाचव्या वर्षपूर्ती कलेक्शनची तयारी जोरात चालू आहे.
लवकरच पाचवे वर्षपूर्ती कलेक्शन तुमच्या समोर येईल.
पाचव्या वाढदिवसानिमित्त माझ्या तारकामाच्या प्रवासातले टप्पे माझ्या पेजवर, फेसबुक भिंतीवर, इन्स्टावर टाकले होते.
हे काम करत राहणे हा माझ्या आनंदाचा भाग आहे. दाखवणे हा ही. ते सर्व टप्पे याच धाग्यात आहेत.
डायरीतले आज्जी आजोबा ज्या सिनियर केअर होममध्ये राहतात, त्या संस्थेविषयी अधिक माहिती दिल्याशिवाय त्यांच्या जीवनाविषयी पुरेसे चित्र उभे राहणार नाही, असे वाटतेय, म्हणून आज थोडे त्या संस्थेविषयी सांगते.
हे ओल्ड एज होम नसून सिनियर केअर होम आहे, ही पहिली आणि महत्वाची गोष्ट.
आज आज्जी-आजोबांचा संस्थेतला दिनक्रम आणि त्यांची व्यवस्था कशी आहे, हे सविस्तर सांगते.
ह्या सिनियर केअर होमचा आऊटलूक एखाद्या पॉश हॉटेलसारखा आहे. त्यातील बेडची रचना उंची कमी जास्त करता येईल अशी सोयीची केलेली आहे, जेणेकरून अपंग आणि वृद्ध व्यक्तींना कोणाच्याही मदतीशिवाय केवळ एक बटन दाबून चढता, उतरता यावे.
शिवाय बेडचा पाठीचा आणि पायाचा भाग वर खाली करता येईल, अशी सोय असलेला आहे. म्हणजे सिटिंग पोझिशन, स्लीपिंग पोझिशन, पाय उंच करता येणे, सपाट करता येणे, अशी रिमोटकंट्रोलच्या बटनांचा वापर करून हवी ती सोयीची रचना करता येते. हे रिमोटकंट्रोल बेडला स्टँडवर लावून ठेवलेले आहेत.