"अजून जास्तीत जास्त पंधरा मिनिटं" अनिश घड्याळात बघत म्हणाला. विहानचे वडील खोलीत फेऱ्या मारत होते तर आई खुर्चीत नखं चावत बसली होती. आधीच त्यांना विहानला इथे आणायला उशीर झाला होता, हे ऑपरेशन सहा महिन्यांपूर्वीच व्हायला हवं होतं. सर्जरी कितपत यशस्वी होईल याची त्यांना शंका होती. "बिलिव्ह मी, ही'ज इन गुड हँडस." तो विहानच्या डोक्यावर थोपटत म्हणाला.
आधीच त्यांचा विश्वास नाही आणि त्यात हा होणारा उशीर त्यात भर घालतोय. तेवढ्यात खोलीचं दार उघडून नर्स आत आली. "सब रेडी है"
त्याने मान हलवून श्वास सोडला.
मी पुलंच्या पुस्तकांची पारायणं केलेली आहेत, तुम्हीही केलेली असतील. जावे त्यांच्या देशा, अपूर्वाई, पूर्वरंग, बटाट्याची चाळ , हे तर पाठ होते. नंतर एक शून्य मी , रेडिओवरील भाषणे व श्रुतिका, एका कोळियाने हेही दोनदोनदा तरी वाचलेले होते, पण साधारण दहा वर्षांपूर्वी मी त्यांच्या लेखनातून बाहेर पडले , आऊटग्रो झाले, माहिती नाही काय पण काही तरी झाले खरे !!!
कित्येक रूपांत ही वेगवेगळी फुलं आपलं मन मोहवत असतात. कधी त्यांच्या सुवासाने तर कधी नजर हरखून जाईल अश्या रंगांनी फुल आपलं अस्तित्व दाखवत असतात, आपलं भावविश्व समृद्ध करत असतात. मनाचा हळवा कोपरा जपणारी ही फुलं म्हणूनच तर कित्येक कविता, गाणी फुलांशिवाय अपूर्ण असतात.
‘इन्स्टा’ आणि एकूणच सोशल मिडीयामुळे स्ट्रीट आर्ट ह्या कलाप्रकाराला चांगले दिवस आले आहेत. प्रवासवर्णन लिहीणारे ब्लॉगर, व्हलॉगर, किंवा ख्यातनाम मंडळी (उर्फ सेलेब्रिटी) हल्ली विविध स्ट्रीटआर्टची चित्रे पोस्ट करतांना दिसतात. आणि तरीही स्ट्रीट आर्ट तसे उपेक्षितच. विचार करा - शेजारची चार-पाच वर्षाची इशिता “मी मोठ्ठी झाले की स्ट्रीट आर्टिस्ट होणार” म्हणाली तर काकूना किती गोरंमोरं व्हायला होईल.
२०२१ मधे आयुष्यातल्या पहिल्या हिमालय ट्रेक साठी पैसे भरले पण करोना कृपेने तो पुढे ढकलावा लागला. या वर्षी सगळं मार्गी लागलं आणि २८ मे ते ३ जुन पिंडारी ग्लेशिअर ट्रेक नक्की झाला. पहिल्याचं नाविन्य असल्याने उत्सहात खरेदीही भरपूर झाली. decathlon चा एक दिवसचा turnover वाढवल्यावर जरा बरं वाटलं.
ऑक्टोबर २०१९ मध्ये किरण पुरंदर्यांच्या निसर्ग निरीक्षण शिबिरासाठी चक्राताला जाऊन आल्यानंतर मी चक्राताचं एवढं वर्णन घरीदारी केलं होतं, की ते ऐकून ऐकून माझ्या घरच्यांनाही चक्राताला जावंसं वाटायला लागलं होतं. त्यामुळे २०२२ मध्ये प्रवास करता येईल अशी खात्री वाटल्यावर एप्रिलमधली चक्राताची सहल ठरवून टाकली. आधी तेव्हा किकांचं शिबिर असणार आहे का, याची चाचपणी केली, पण त्यांचा तेव्हा तरी तसा विचार नसल्याचं कळल्यावर आमचे आम्हीच जायचं ठरवलं.