भाच्याचे गडग्नेर (केळवण) आहे उद्या. त्याला आम्ही सगळे मिळून पैसेच देणार आहोत, त्याच्या नवीन संसारासाठी, नवीन घरासाठी उपयोगी वस्तू घेण्यासाठी!
पण पैसे, चेक हातात देण्याएेवजी या घरात घालून देणार :)
हे समोरून. दरवाजा, दोन खिडक्या, मधोमध घंटा - तिचा उपयोग आहे हं ...
हे बाजुनी. एक मोठी खिडकी, घराला छान व्हेंटिलेशन आहे हो आमच्या. अशीच पलिकडेपण आहे हं!
आज खूप दिवसांनी निवांत वेळ मिळाला.. म्हटलं आज काहीतरी छान , वेळ काढून, नीट लिहावे.. आता ते छान झालं की नाही माहीत नाही..! पण मन लावून लिहीतीय.. नेहेमी लिहीताना इतका विचार, इतकी तयारी मी एरवी नक्कीच करत नाही!
...रंग खेळू चला!
"फागुन आयो रे" म्हटलं की कसं होळी, धुळवड आणि आपली रंगपंचमी आठवते आणि वसंत ऋतूची चाहूल लागते.
होली आणि रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव! आपण रंग उधळतो, उडवतो, लावतो.. पण कोणाच्याही अंगभूत रंगाला विसरुन कसं चालेल? यावेळी आपण या उत्सवात अंगभूत रंगांचा खेळ खेळणार आहोत.
कधी, कुठे, कसा आणि कोणाबरोबर खेळायचा?
लवकरच कळवू.
मध्यंतरी काही काळ झालेल्या ब्रेकनंतर आपण पुन्हा सृजनाच्या वाटांकडे वळणार आहोत. तर मैत्रिणींनो, नव्या जोमाने तयार रहा!
खूप दिवसांपासून युरोप ट्रिप करायचं डोक्यात घोळत होतं. निरनिराळ्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या सफरींचे कार्यक्रम बघत होते. तो पंधरा-वीस दिवसांत अक्खा खंड पहायचा चिवडा काही पसंतीला येईना. मला चित्र,शिल्प,संस्कृती,निसर्ग सगळंच अनुभवायचं होतं. त्यातच मीना प्रभूंचं रोमराज्य वाचण्यात आलं आणि मायकेल अॅन्जेलो लिओनार्दो बरोबरच अजून काही चित्रकार शिल्पकारांची माहिती झाली. त्यातल्या कार्व्हाज्जीओच्या चित्रांनी तर वेडंच केलं. आणि इट्लीला जायचं नक्की केलं. मग ऑनलाईन हॉटेल बुकिंग करू, तिथलीच लोकल ट्रीप बूक करू, असे मनात मांडे रचायला सुरुवात केली. माझ्या सख्ख्या मैत्रीणीला प्लॅन सांगितला आणि नवर्याला!
मुळा: ए बटाट्या, बघ मी तुझ्यापेक्षा किती गोरा! बटाटा: मी यम्मी! मुळा: तू यमी? म्हणजे मी यमीपेक्षा दुप्पट गोरा! बटाटा: फालतू जोक मारु नगंस! यम्मी म्हंजे टेश्टी. तुज्यापेक्षा मी जास्त लाडका. तुज्या वासानंच लोक पळून जात्यात. त्या बाया परवा केक बनवत होत्या, तुला घातला का कुणी त्यात? गाजराला घाला, फळं घाला म्हनल्या त्या स्नेहश्री बाई. मुळा: तुला तरी घालतंय का कुणी केकमध्ये?
बटाटा: तर मुळ्या, तू वाचलंस ना? मुळा: काय? बटाटा: तुझे रंगीत भाऊबंद आहेत म्हणे.. लाल, गुलाबी. प्राची, नंदिनी, मोनाली सांगत होत्या. मुळा: बsssरं, मग? बटाटा: मग काय? बोलव की त्यास्नी, रंग खेळाया! मुळा: अरे, पण अजून काय माहिती नाही, कशाचा पत्ता नाही आणि काय खेळतोस! बटाटा: हाय ना, हा बघ मी आणलाय घोषणेचा कागूद, तुला वाचून दावतो. लक्ष दे नीट, काय? मुळा: हां, बोला. बटाटा: "रंग खाऊ चला!"
आत्ताच केल स्मूदी केली. आणि मग ही पोस्ट बघितली. तडक जाऊन त्या स्मूदीचा फोटो काढला. मग परत जिन्नस गोळा केले फोटो काढायला. आता त्या जिन्नसांची उद्या परत करेन स्मूदी!
तर केल हा हिरवा पालापाचोळा घालून केलेलं स्मूदी हे पेय
साहित्य :
केल (kale) -
बदाम (३-४ तास पाण्यात भिजवून)
सब्जा (३-४ तास पाण्यात भिजवून)
कुठलही फळ ( मी बरेचदा केळं घालते. आज सफरचंद होतं ते घातलं.)
ऑरेंज ज्युस अथवा नारळाचे पाणी अथवा योगर्ट अथवा प्रोटीन शेक
हवं असल्यास चवीला आलं
"पुलिंतांपामि" नक्की इथल्या अनेकजणींना हा माझा टायपोच वाटला असणार
तरीही अवलची व्होकॅबलरी माहिती असलेल्या गोंधळात नक्की पडल्या असतील ना? नक्की काय बरं लिहायचं होतं हिला :thinking:
पण काये न लोलाच्या श्टाईलच्या उपक्रमाला थोडं तरी जागलं पाहिजे न? :ड
तर झालं असं की आज लेकाला बिर्याणी खायची हुक्की आली. मग स्वाभाविकच मला सामीची आठवण आली. मग काय घातला बिर्याणीचा घाट :fadfad:
तर तांदूळ घाटत असताना मला लोलाची आठवण आली. मग म्हटलं घालून टाकू "ईट आपलं ड्रिंक, युवर कलर्स"चाही घाट
मग ओट्यावरच्या वस्तू दिसू लागल्या :waiting: