आदित्यच्या हातात हात अडकवून उर्वी बिल्डिंगमध्ये शिरली. बटरफ्लाय हायच्या दारातच आतल्या संगीत आणि वर्दळीचा आवाज घुमत होता. दारातून आत शिरताच आवाजाने त्यांचे कान बधिर झाले. अना आणि विनय आधीच टेबल अडवून बसले होते. विनय त्यांच्याच ऑफिसमधील एक पत्रकार होता आणि हल्लीच अनाबरोबर एक दोन डेटस वर गेला होता. अनाच्या लेखी त्यांची फक्त कॅज्युअल रिलेशनशिप होती. त्यांचे एकमेकांबरोबरचे वागणे बघून उर्वीलाही ते पटले होते. बाकी अजून दोन तीन कपल्स त्यांचे जुने सहकारी, मित्र मैत्रिणी वगैरे होते.
मध्यरात्र होऊन गेली तरी आदित्य टक्क उघड्या डोळ्यांनी काळोखात वर धुरकट पांढऱ्या झुंबराकडे पहात बेडवर पडला होता. गेल्या दोन दिवसांत त्याने दाबून ठेवलेले नकारात्मक विचार आता एकटेपणात दुथडी भरून वर येत होते. काहीच तासांपूर्वी अनुभवलेल्या कोवळ्या, नवथर भावना आणि आणि त्याचा प्रॅक्टिकल अप्रोच यांची सांगड काही बसत नव्हती. एकीकडे त्याचे तिच्यावरचे प्रेम उतू जात होते, तेव्हाच दुसरे मन पाऊल मागे घ्यायला सांगत होते. त्यांच्या हृदयामध्ये निर्माण झालेला बंध तात्पुरता होता.
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी उर्वीच्या आईबाबांच्या फोनने सुरुवात झाली आणि कॉल्सची रीघच लागली. तो सोफ्यावरून अचानक उठू लागल्यामुळे उर्वीने फोनवर हात ठेवून त्याला इशाऱ्यानेच काय झालं? अशी खूण केली.
"कालपासून तुझी खूप दगदग झालीय. आज आराम कर. टुडेज लंच इज ऑन मी!" म्हणून त्याने तिच्या हातावर थोपटले आणि किचनमध्ये गेला.
"थोड्या वेळात मी येते मदतीला.." ती फोनवर हात ठेवून ओरडून म्हणाली.
पहाटे पाच वाजताच उठून तो आंघोळीला गेला. आरशात बघून डोके पुसता पुसता त्याला लहानपण आठवत होते. बाबा गेल्यापासून तो पहाटे उठणे आणि दिवाळीचे अभ्यंगस्नान विसरूनच गेला होता, तेच कशाला, दिवाळीच विसरून गेला होता. एरवी फटाके नसायचे पण तो आंघोळीला गेल्यावर बाबा एक सुतळी बॉंब नक्की फोडायचा. माझा आळशी मुलगा शेवटी आंघोळीला गेssला हे जगाला कळण्यासाठी! हे त्याचं नेहमीचं कारण असायचं आणि तो आंघोळ करून आल्यावर बाबा हे हमखास बोलून दाखवायचा.
पहाटे सांगलाहून निघाल्यापासून खड्डेदार रस्ता मग मग दोन फ्लाईट्स त्यात एअरपोर्टवरचा वेटिंग पिरियड यांनी आदित्य अतिशय थकून गेला होता, पण उर्वीची भेट आणि तिच्याबरोबर ही सुट्टी एकत्र घालवणे हे त्या सगळ्या त्रासापेक्षा खूप जास्त आनंदाचे होते. हॉटेलमध्ये परतून बेडवर पडल्यापडल्या त्याला शांत झोप लागली.
लिफ्टमध्ये शिरताच पर्समधून बॉटल काढून ती घटाघट पाणी प्यायली. थोडा श्वास घेतल्यावर तिच्या हृदयाचे ठोके जरा ताळ्यावर आले. कुणाल नेहमीप्रमाणेच चकाचक तयार होऊन आला होता. लेदर जॅकेट, महागडे शूज, त्याहून महागडं घड्याळ आणि डोळ्यावर रेबॅन. संध्याकाळी गॉगल्स!? असतात, कुणालसारखे लोक असतात! ती हसून त्याच्याशेजारी बसली. तो हँडसम होताच पण त्याला बघून कधीच तिचे हृदय जोरजोरात धडधडले नव्हते. आदित्य आत्ता त्याच्या खोलीत बसून तिची वाट बघतोय या विचारानेच तिचे रक्त सळसळत होते.
दिवसभर आदित्यच्या आईचे शब्द तिच्या डोक्यात घुमत होते. तिच्या स्वतःच्या आईचेही शब्द पुसले गेले नव्हते. ती आणि आदित्य दोन निराळी माणसे होती, आपापल्या वेगळ्या जगात वावरणारी. ती मोठ्या गर्दीच्या शहरातली एक चुणचुणीत, भरपूर लोकांच्यात मिसळणारी, बिनधास्त मुलगी आणि तो जगाच्या कोपऱ्यात, स्वतःच्या धुंदीत, एकटा राहणारा, डोंगरदऱ्या भटकणारा मुलगा. प्रॅक्टिकली विचार केला तर त्यांच्यात काहीच सारखेपणा नव्हता पण तिचं मन हे स्वीकारायला तयार नव्हतं. दोन्ही आयांनी तिच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजवून ठेवली होती आणि एकटी असताना ती जास्तच खणखणत होती.
"आजकल क्या चल रहा है उर्वी?" अना मागे वळून तिच्याकडे बघत म्हणाली. ऑफिसखालच्या छोट्या सेल्फ सर्व्हिस कॅफेच्या रांगेत त्या उभ्या होत्या. लंच टाइममुळे आजूबाजूला प्रचंड घामट गर्दी होती.
"यू मीन फॉग?" म्हणत उर्वी मुद्दाम खोटं हसली.
"पीजे मत मार! आय एम सिरीयस." उर्वीची प्लेट तिच्या हातात देत अना रागाने म्हणाली.
समोरचे टेबल रिकामे होताना बघून दोघी पटकन तिथे जाऊन बसल्या. "कुछ भी तो नही. तुम क्या सोच रही हो?" उर्वी म्हणाली.
"जबसे तुम शिमलासे वापस आयी हो, कुछ अलग लग रही हो. लाईक.. हॅपीअर." व्हेज काठी रोल तोंडात कोंबत अना तिचा चेहरा निरखून बघत होती.
आईला तिच्या आवाजातली धास्ती जाणवली. "बापरे, तुला हे सिक्रेट वगैरे ठेवायचं आहे की काय?" आईने विचारले.
"हो! मी त्याला भेटले हे कुणालाही अजिबात कळू द्यायचे नाही. हे खूप महत्त्वाचं आहे, प्लीssज." ती थोडी ओरडूनच म्हणाली.
"सिक्रेट ठेवायचं असेल तर ठीक आहे. पण तुझा लेख छापल्यावर-"
"लेख छापायचा नाहीये." ती वाक्य तोडत म्हणाली.
"अग पण-"
"आय नो. माझी त्याच्याशी नीट ओळख झाली आणि मी ठरवलं की त्याच्या इच्छेविरुद्ध लेख छापणार नाही. त्याला त्याचं खाजगी आयुष्य जपण्याचा हक्क आहे." त्याचा निरोप घेतानाच्या आठवणीने तिचा आवाज अगदी मऊ झाला होता.
From: urvee.k@gmail.com
Sent: November 10, 2019
To: staaditya@gmail.com
Subject: A Kettle?
आदित्य,
एवढे कष्ट घेऊन तू मला एक केटल पाठवलीस? माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणीला हा prank वाटतोय. मला माहितीये तू काहीतरी वेगळा विचार करून ती पाठवली असणार. किटलीमागची गोष्ट काय आहे?
उर्वी.
From: staaditya@gmail.com
Sent: November 10, 2019
To: urvee.k@gmail.com
Subject: Yes, a kettle.