नुकतीच पुण्याला एक धावती भेट देण्याचा योग आला. त्या भेटीत सकाळी वेताळ टेकडीवर मॉर्निंग वॉकला गेलो होतो. काय सुरेख ठिकाण आहे ते. फॉरेस्ट खात्याच्या अखत्यारीत आहे बहुतेक, पण त्यामुळे अतिशय स्वच्छ राखली गेलेय. टेकडीवर जाण्याच्या रस्त्याला एक गेट आणि त्यावर राखणदारही आहेत. पार्किंगकरता वर जागाही आहे. आणि मग आत जंगलात फिरण्यासाठी अनेक पायवाटा आहेत. तुम्हाला हवी ती निवडा आणि स्वच्छंद फिरा.
शनिवार, ५ डिसेंबर २०१५ च्या सकाळची ही क्षणचित्रं :
यंदा दिवाळीत सिंगापूरला जायचे ठरवले. कोणत्याहि ट्रव्ह्ल कंपनी बरोबर न जाता आपण आपलीच ट्रीप करायची म्ह्णून मग इंटरनेट वरुन माहिती गोळा करायला सुरवात केली. बर्याचशच्या ट्रव्ह्ल कंपनींच्या itinerary चेक करुन ट्रीप plan केली.
ठरवल्याप्रमाणे दूसर्या दिवशी हॉटेल मध्ये Breakfast करुन Singapore zoo बघायला गेलो. हा झू सिंगापूर च्या Rainforest मध्ये २८ हेक्टर ईतका पसरलेला आहे. झू मध्ये विवीध विभाग आहेत जसे की Wild Africa, Reptile garden, Australian zone, etc. Map घेऊन तुम्ही सुरवात कुठून करायची ते ठरवु शकता. ईथे पण फिरायला ट्राम आह्ते तरी पण खुप चालायला लागते. झू चे एक वैशिष्ट्य कि सर्व प्राणी त्यांच्या नैसर्गिक वातावरणात आहेत कुठेहि पिजरे, जाळ्या नाहित.
मला कुंभारकाम करायला लागून जवळपास तीन वर्षे होत आली, पण अजूनही ते सगळे कालच सुरु केले आहे अशा तर्हेने झटापट चालू असते. घरात जिकडे तिकडे विचित्र आकारांची आणि रंगांची भांडी पडलेली असतात. चार लोक पोहे खायला आले तर चौघांना वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगाच्या, आकाराच्या, ताटल्या अन् भांडी मिळतात. माझे बिचारे देवही त्यातून सुटले नाहीत. उदबत्तीचे घर, दिव्याखालची ताटली हे सगळे - अपना हाथ जगन्नाथ ह्या प्रकारात मोडणारे!
आनंदाची तशी जराशी जुनी गोष्ट नव्याने इथे टाकते आहे.
-----
मुंबईचा मुसळधार पाऊस... अर्ध्या तासापूर्वीच शिवडी स्टेशनवरच्या कधी काळी ९:३० ला बंद पडलेल्या घड्याळानी बरोबर वेळ दाखवली होती... रुळावर पाणी भरलेलं, फलाटावरच्या कोरड्या जागा लोकांनी पकडलेल्या आणि इंडिकेटरवर शून्य शून्य शून्य शून्य !
"८ टक्केच राहिल्ये बेटरी... ट्रेन माहित नाही कधी येईल... पहाट होईल बहुतेक घरी पोचायला.. हो... वडापाव... ठेव.. मी बंद करतोय हा फोन...हो हो.. डोंबलाची गुड नाईट... तिला बंद करायला सांग टीव्ही, गेल्या पावसाळ्यासारखा उडाला न तर बघ.. ठेव.. "
"हाती आलेल्या मातीचा पुरेपूर वापर करणे" हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आम्ही सहामाही परीक्षा...दिवाळी ..शाळा असल्या मोहमायेत न गुंतता बजावला याचाच पुरावा सादर करत आहोत :डोळामारा:
आनंद व्यक्त करायचं सर्वात सहज आणि सुरेख साधन म्हणजे हसरा चेहरा... आपल्या आजूबाजूला किती वेगवेगळ्या प्रकारची स्माईल्स, हास्य आपण रोज बघत असतो.. ती फोटोन्मधून साठवून ठेवायला हा धागा!
"मला स्माईल्स कलेक्ट करायचा छंद आहे" असा काहीसा एक डायलॉग अनुशा दांडेकर तिच्या इंग्रजी मराठीत एका फिल्ममध्ये म्हणते. ( हे आपलं उगाच, पहिलं वाक्य लिहिताना आठवलं म्हणून...)
चला , आपणही हसरे चेहरे कलेक्ट करूयात :)