October 2018

सावली

"काय गं थकलेली दिसत्येस आज फार? खूप हेक्टीक दिवस होता का?" घरात आल्याआल्या प्रतिमाच्या प्रश्नावर सावलीने नुसतच "ह्म्म" असा त्रोटक रिप्लाय दिला त्यावरूनच प्रतिमाने ओळखलं, "आज स्वारी गंभीर दिसते आहे."

"मग, आज जेडीची काय नवीन खबरबात?" एकीकडे कॉफी घेताना, मुद्दामच गंभीर विषय टाळत प्रतिमाने हलक्याफुलक्या विषयाने सुरुवात केली.

"जेडी? अरे बाप रे! तो तर एक अजबच माणूस आहे. आज नवीन माहिती कळली त्याच्याबद्दल. फेसबूकवर या प्राण्याची म्हणे फेक प्रोफाईल आहेत आणि मायबोलीवर तर ३ डुप्लिकेट आयडी."

"काय करतो काय इतक्या सगळ्या प्रोफाईल्सचं? कसं मॅनेज करतो?"

Keywords: 

लेख: 

कंबोडिया भटकंटी -- माहिती हवी आहे.

आम्ही नव्हेंबर मध्ये कंबोडिया ट्रीपचा विचर करत आहोत.इथे कुणी आहे का ज्यांनी ही ट्रीप केली आहे?
मला गुढगेदुखीचा त्रास नुकताच चालू झाला आहे तर तिथे खुप पायी फिरावे लागते का? मला झेपेल का?

पासवर्ड

पासवर्ड

सकाळपासून माझी चिडचिड चिडचिड झाली होती. गेल्या महिन्यात एकतर ‘वॅलेंटाईन डे’ला साधा एक व्हॉट्स ॲप मेसेजही नव्हता पाठवला हेमंतने. म्हणे हि कसली फॅडं सगळं जग करतं म्हणून काहीही काय करायचं आपणही? बाकी सगळं तर जगरहाटी म्हणत सणवारतिथकुळधर्म सगळी लोकं करतात तस्सच करायच. काय होतं केलं तर. काय अंगाला भोकं तर नाही पडत म्हणत मला न पटणाऱ्या गोष्टीही परंपरा म्हणून करायला भाग पाडायच पण वॅलेंटाईन मात्र फॅड म्हणत विसरायचं. मग आजचा दिवस लक्षात असण्याचा काहीच संबंध नाही. तरी मी आडून आडून आठवण करुन दिली होती काल. पण उपयोग शून्य. शेवटी आज सकाळी मीच सांगून टाकलं ‘आज आपल्या साखरपुड्याला ७ वर्ष होतील’

Keywords: 

लेख: 

अंदाज

केबीनचं दार उघडलं तर समोर तीच.. परवा 'पाहिलेली' आणि 'आवडलेली' मुलगी!
आता हिच्याशी चर्चा कशी करणार? तीदेखिल आपल्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टबद्दल?

म्हणजे, तिच्या ज्ञानाबद्दल काही शंकाच नव्हती. त्याला स्वतःचीच खात्री वाटेनाशी झाली होती.

ती दिसायला स्मार्ट होती. त्याहीपेक्षा तिच्या प्रत्येक कृतीतून, हालचालीतून आत्मविश्वास झळकत होता. तिचं राहणं, वागणं, बोलणं सगळंच कसं लयबद्ध होतं. तिचा अंदाजच न्यारा होता.

ती त्याला बघून गोड आश्वासक हसली. तो गोंधळलेलाच होता.

"बँकेकडून तू येणार आहेस हे मला माहिती नव्हतं."

Keywords: 

लेख: 

सुगंधाचं मोरपीस : कृष्णा

त्या दिवशी आलासंच ना कृष्णा तळ्याकाठी फक्त माझ्यासाठी ? मी काही कुणी सर्वशृत , सुपरिचित गौळण नाही की कुणी नाही. एक साधी सर्वसामान्य गौळण मी. माझ्यासाठी आलास?

अन तुला कळलं कसं की माझ्या मनात काय आहे ते ? मी तर हळूच चांदण्यांच्या साक्षीने तळ्यातल्या कमळांना सांगितलं होतं. वाऱ्यावर अलवार डोलून त्यांनी मला ऐकल्याची पोच दिली होती.

कमळांनी हळूच वाऱ्याला सांगितलं आणि मग त्याने तुला निरोप धाडला का ? कसा ? की सगळ्या फुलांच्या अंतरंगातलं सौंदर्य म्हणजे तूच आहेस?

लेख: 

मूगडाळ हलवा

'मूगडाळ हलवा' युट्युबवर शोधल्यावर खंडीभर पाककृती मिळाल्या, त्यातली कुणाल कपूरची पाकृ मला 'अपील' झाली, ती केली तर खूपच छान हलवा झाला. त्यात मी बरेच बदल केले.

त्या बदलांसहीत ही पाककृती.

साहित्य:

मुगाची डाळ - १ वाटी
रवा - १ चमचा
बेसन - १ चमचा
तूप - १ वाटी
साखर - १ वाटी
पाणी - १ वाटी
काजू, बदाम, पिस्ते - प्रत्येकी १ मूठ
केशर, वेलची पूड

कृती:

१. मुगाची डाळ स्वच्छ धुवून भरपूर पाण्यात किमान तीन तास भिजवून घ्यावी. मग तासभर तरी गाळण्यावर उपसून ठेवावी.
२. उपसलेली डाळ मिक्सरमधे पाणी न घालता वाटून घ्यावी.

पाककृती प्रकार: 

कुंभारकामातले प्रयोग - लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया

दोन वर्षांपूर्वी दिवाळीनिमित्तने एक प्रयोग केला होता दिवे बनवायचा. त्यात थोड्या पणत्या टाईप वाट्या केल्या त्यात टी कँडल्स लावता येतील अशा तर्हेने पण अशा कँडल्स उघड्यावर ठेवणे इथे अगदीच शक्य नाही कारण दिवाळीत बरेचदा इथे वारे वगैरे असते. मग त्यातुन सुचलेली कल्पना म्हणजे हा दिवा -
Diva-1

तोच दिवा दिवाळीदिवशी मी बाहेर ठेवलेला तो असा दिसत होता -
Diva-2

Keywords: 

कलाकृती: 

सोप्पे चिली गार्लिक प्रॉन्स

सोप्पे चिली गार्लिक प्रॉन्स

साहित्य:

  • प्रॉन्स - ५०० ग्रॅम्स.
  • आॅलिव आॅइल - १ टेबल स्पून.
  • बटर - १ १/२ टेबल स्पून.
  • लसुण पाकळ्या - ८/१०.
  • काेथींबिर - ३/४ कप.
  • फ्लॅट लीफ पार्सली - १/४ कप.
  • ताज्या लाल मिरच्या - ३ ते ४.
  • लिंबु - १ माठे, लहान असतील तर दाेन.
  • मीठ व crushed मीरे - चवीनुसार.
  • चिली इन्फयुज्ड आॅलिव आॅइल - एक टी स्पून.
  • कृती:

पाककृती प्रकार: 

कोळंबीची सोपी खिचडी

लेकाच्या मित्रासाठी ही लिहिली. तयारच होती म्हणून इथेही टाकतेय. बॅचलर्स खिचडी असही म्हणू शकू Heehee

साहित्य
पाव किलो कोळंबी सोललेली.
दोन वाट्या तांदूळ
1 कांदा बारीक चिरून
4 लवंगा
3 चमचे लसूण पेस्ट
एक चमचा तिखट
पाव चमचा हळद
चवी प्रमाणे मीठ
तेल
नारळाचं दूध दोन वाट्या ( कोकोनट मिल्क)
पाणी दोन वाट्या

कृती
कोळंबी मधला काळा धागा काढून स्वच्छ धुवून घे. मग त्याला हळद, तिखट, पाव चमचा मीठ, लसूणपेस्ट लावून ठेव.
तांदूळ धुवून बाजुला ठेव.
कांदा चिरून घे.

पाककृती प्रकार: 

वाटेवर चालत जाता

वाटेवर चालत जाता, शब्दांच्या रानी यावे,,
मौनाच्या अंगणी माझ्या, श्रावणशब्द झरावे..

अबोल अव्यक्ताचे, सुरेल गाणे व्हावे..
श्वासाश्वासात भिनावे, अधरांवर तुझ्या सजावे..

तुला मला न कळता, वार्‍यावर लहरत जावे..
ओल्या पाऊलखुणांवर, बकुळसडे बरसावे..

वाटेवर चालत जाता, अर्थाला शब्द मिळावे..
मौनाच्या चांदणराती, प्राजक्त मनी उमलावे

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle