मूग डाळीची भजी करण्यासाठी मूग डाळ भिजत घातली होती. भजी करून सुद्धा थोडी डाळ शिल्लक होती. त्याची दुसऱ्या दिवशी कचोरी केली. एकदम मस्त झाली. सगळ्यांना आवडली.
साहित्य :
१ वाटी भिजवलेली मूग डाळ (७-८ तास भिजवून ),
१ चमचा बडीशेप ,
१ वाटी मैदा,
१ चमचा आमचूर पावडर,
फोडणीसाठी जिरे, हळद, हिंग,तिखट,
चवीनुसार मीठ ,
चिंच गुळाची चटणी,चिरलेला कांदा, कोथिंबीर , शेव
कृती:
१. सर्वात आधी मैद्यामध्ये मोहन घालून घट्ट भिजवून घ्यावा अर्धा .
२. भिजवलेली डाळ भरड वाटून घावी.
३. गरम तेलात जिरे,बडीशेप,हिंग हळद घालून फोडणी करून त्यात तिखट,डाळ,आमचूर पावडर,मीठ घालून वाफ काढून घ्यावी.