काल बर्याच दिवसांनी लाँग ड्राईव्हला बाहेर पडलो. नाही नाही चुकलेच. कामासाठी बाहेर पडलो, काम झाल्यावर लाँग ड्राईव्हचा बेत ठरला. नाहीतर गेले काही दिवस घरातून बाहेर पडणे फक्त कामासाठीच होत होते. (आजारपणे, विचित्र हवा, थंडी इत्यादींमुळे..)
तशी मी काही फारशी इमोशनल वगैरे व्यक्ती नाही. उगाच कुणीतरी काहीही कारण इक्कुल्या कारणासाठी मला रडू वगैरे येत नाही. क्वचितच रडणार्यांचा एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे एकदा रडू आलं की काही केल्या थांबत नाही.... मग आधीचंमागचंपुढचंगेल्यातीनचार वर्षांमधलं जे काय रडणं शिल्लक असतं तो सगळा इमोशनल धबधबा एकदमच सुरू होतो. “टचकन डोळ्यांत पाणीआलं” वगैरे नाहीच. डायरेक्ट जुलै महिन्यातला पाऊसच.
२०१३ च्या एप्रिलपासून पुढचे बरेच महिने मी काहीनाकाही कारणाने फिरतीवर होते. एकदा तर साधारण पावणेदोन महिन्यांनी घरात पाऊल टाकलं. ते पण ८-१० दिवसांकरताच.
एप्रिलच्या आधीही लेक्चर्स वगैरेमुळे महिन्यातले ७-८ दिवस बाहेरगावी असणं हे होतंच.
तर या सगळ्यासंदर्भाने आलेले दोन गमतीशीर अनुभव.
१. फेसबुकावर जुजबी ओळख झालेले सदगृहस्थ (फेजुओझास). त्यांच्या कॉलेजच्या कुठल्या तरी कार्यक्रमात मी सामील होणे त्यांना अपेक्षित होते त्याप्रित्यर्थ फोन नंबराची देवाणघेवाण केली गेली होती.
फेजुओझास - पुढच्या महिन्यात अमुक तारखेला वेळ देऊ शकाल का आमच्या कॉलेजसाठी.