सेम टू सेम दोऱ्याचे क्रोशा जाकिट

एक मोठं प्रोजेक्ट पूर्ण झालं. एक्स एल साईजचे दोऱ्याचे जाकिट पूर्ण झालं. दोऱ्याचे इतके मोठे प्रथमच केले. पण मजा आली. होप तुम्हालाही आवडेल.
निळे क्रिम आहे ते नेट वरचे. तसेच करून हवे असे म्हटल्यावर थोडे टेंन्शन होते. थोडी काही मापं पण बदलायची होती. सो ट्रायल एरर होती. पण जमलं. पांढरा अॅश मी केलेला.

नेटवरचे
IMG-20151207-WA0034.jpg

मी विणलेले

IMG_20160107_193522.jpg

Keywords: 

कलाकृती: 

झालरी झालरीचे लेमन पिस्ता आईसक्रिम ;)

बहिणीच्या नातीचे बोर नहाण आहे. तिच्यासाठी हा डबल आईस्क्रिमचा घाट Heehee
IMG_20160106_204923.jpg

IMG_20160106_205123.jpg

IMG_20160106_205108.jpg

Keywords: 

कलाकृती: 

फॅमिली क्रॉनिकल्स २ : श्रीगणेशा - अर्थातच सुरुवात!

या महिन्याचा सृजनाच्या वाटाचा विषय बघितला आणि म्हटलं, अरे, हा तर आपल्या स्पेशलायझेशनचा विषय... सुरुवात - म्हणजेच श्रीगणेशा.

'आमचे येथे कशाचीही 'सुरुवात' करून मिळेल, म्हणजेच कशाचाही 'श्रीगणेशा' करून मिळेल, पुढचे तुमचे तुम्ही बघा' - अशी आमची फॅमिली टॅग लाईनच ठरेल!

कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्याचा आमचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. मग ते व्यायाम करणं असो, एखाद्या विषयावर वाचन असो, डायटिंग असो, घर स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम असो. त्यातून त्या उपक्रमाला पैसे घालायचे असतील तर मग उत्साह अधिकच असतो. कुठलीही गोष्ट नुस्तीच न करण्यापेक्षा ती पैसे भरून नाही केली की कसं बरं वाटतं.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

बाली ट्रीप- प्रस्तावना

सिडनीची ट्रिप करुन वर्ष होत आले होते म्हणुन यावेळेस आम्ही बालीला जायचे ठरवले. बर्‍याच दिवसांपासुन जायचे मनात होते पण सुट्ट्या, कॉलेज आणि बालीतल्या ज्वालामुखीचा उद्रेक अशा अनेक कारणांमुळे जायला जमत नव्हते. अनायसे डिसेंबरमधे सुट्ट्या होत्याच पण टिकिट्स खुप महाग होती. त्यातल्या त्यात स्वस्त म्हणुन मग एअर एशियाचे हॉलेडे पॅकेज बुक केले.

Taxonomy upgrade extras: 

गाजराच्या वड्या

ह्या वड्या करायला अगदी सोप्या आहेत. गाजराचा कीस, साखर, दूध, खवा इत्यादींचं प्रमाण बिनचूक माहिती असेल तर शब्दशः डोळे मिटून वड्या होतात. ह्या वड्या यंदाच्या मोसमात मी पहिल्यांदा केल्या त्याच मुळी १ जानेवारीला, म्हणून म्हटलं इथे साग्रसंगीत लिहूया जेणेकरून सृजनाच्या वाटामध्ये लिहायला माझी 'सुरूवात' होईल.

वड्या करण्यासाठी साहित्यः

गाजराचा कीस - ५ वाट्या
साखर - ३ वाट्या
दूध - २ वाट्या
खवा - १ वाटी
वेलची पूड - ३ टी स्पून
बदाम/ काजू/ पिस्त्याचे काप सजावटीसाठी

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

माझ्या डिजिटल चित्रकलेची सुरुवात

माझ्या भाच्याच्या लग्नात त्याच्या संसाराच्या वाटचालीच्या सुरुवाती साठी काढलेले हे डिजिटल (फोटोशॉपमधे काढलेलं) निसर्ग चित्र. नंतर ते कॅनव्हासवर प्रिंट करून त्याची फ्रेम केली.
माझ्या डिजिटल पेंटिंगची ही सुरुवात होती :-)
Chaitanya_Pooja copy.jpg

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

सख्या रे : एक लखलखीत रात्र

(मुकुल शिवपुत्र यांची "तारुवा गिनत गिनत"ही चिज एेकताना जे वाटत गेलं ते असं...)

आणि ती ही रात्र आठवते सख्या...
तुझा निरोप आला अन सारी दुपार संध्याकाळची वाट बघण्यात गेली. तू येणार...काय करू, काय नकोहोऊन गेलं.तुझ्या येण्याला साजरं करण्यासाठी किती सोसा सोसाने सारे सजवले, सजले... सजणेच जणु साजण होऊन आले!

अन दुपारची तलखी संपून मनातली गोड हुरहूर अंगभर, अंगणभर पसरत गेली, उतरणाऱ्या उन्हातल्या सावल्यांसारखी.

लेख: 

सुरूवात

सृजनाच्या वाटाचा ह्या महिन्याचा विषय आहे सुरवात.
माझ्याकडे ह्यापेक्षा महत्वाची सुरूवात दुसरी कोणती असणार?

मैत्रीण.कॉमचे सुरवातीचे दिवस.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

इटुक पिटुक वॉल हँगिंग

आठ इंच व्यासाच्या आकाराचे हे वॉल हँगिंग. त्यावरची फुलं, पानं क्रोशाने विणून तयार केली अन मग कार्डबोर्डवरती कागद चिकटवून त्यावर ही फुलं पानं चिकटवली. बाजुनी लेस चिकटवली, वरून रॅपिंग प्लॅस्टिक लावले. मागे हूक म्हणून लेसचाच तुकडा चिकटवला. झाल् वॉल हँगिंग तयार :-)
IMG-20151231-WA0021.jpeg

Keywords: 

कलाकृती: 

मुलांसाठी पुस्तके - १२ ते १६ वयोगट

इथे १२ ते १६ या वयोगटाच्या मुलांसाठी चांगली पुस्तके सुचवा. ( इतर गटांसाठी वेगळे धागे काढते, सगळी पुस्तके एकात लिहीली तर नंतर कोणते पुस्तक योग्य आहे ते सापडत नाही )

ट्वायलाइट व व्हँपायर डायरीज मेग कॅबट नावाच्या मुलीने लिहीलेली पुस्तके. हाना मॉंटाना ची बुके हे सर्व गर्ल स्टफ आहे. इन्सरंजंट डायवर्जंट सीरीज, मॉकिं ग जे सीरीज.

शिवा ट्रायॉलॉजी आणि द सायन ऑफ इक्श्वाकू

jim corbett ची पुस्तके

मुलांसाठी पुस्तके - ५ ते ८वयोगट

इथे ५ ते ८ या वयोगटाच्या मुलांसाठी चांगली पुस्तके सुचवा. ( इतर गटांसाठी वेगळे धागे काढते, सगळी पुस्तके एकात लिहीली तर नंतर कोणते पुस्तक योग्य आहे ते सापडत नाही )


===============================================
इंग्रजी
===============================================

नॉडी
बार्नी
रीड अ‍ॅण्ड शाईन अशी एक सिरिज आहे peagusची त्यातली पुस्तके
कडलियेस्ट कदल इन द वर्ल्ड
ब्निग यान्ग अ‍ॅण्ड लिटल यिन
थॉमस अ‍ॅण्ड हिस फ्रेंड्स

डॉ. सूसची पुस्तके.

मुलांसाठी पुस्तके - ८ ते १२ वयोगट

इथे ८ ते १२ या वयोगटाच्या मुलांसाठी चांगली पुस्तके सुचवा. ( इतर गटांसाठी वेगळे धागे काढते, सगळी पुस्तके एकात लिहीली तर नंतर कोणते पुस्तक योग्य आहे ते सापडत नाही )



===============================================
सरमिसळ
===============================================

The BFG
Fantastic Mr.Fox

एव्हरग्लेडस नॅशनल पार्क

नुकतीच फ्लोरीडा राज्याची सफर करून आलो. त्या संपूर्ण ट्रीपचं वर्णन ऐकवून मी बोअर करणार नाही पण दक्षिण फ्लोरीडमध्ये पसरलेल्या 'एव्हरग्लेडस नॅशनल पार्क'ला भेट दिली. ते ऐकवून मात्र बोअर नक्की करणारे.

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

माती, चिखल आणि कलाकृती

मला आता जवळपास १२ वर्षे होत आली कुंभारकाम करायला लागून पण त्यातली एकुण ६-७ वर्षेच सलग काम केले. याकाळात बरेच वेगवेगळे प्रयोग केले. निरनिराळ्या प्रकारची माती, वेगवेगळे रंग वापारून पाहिले, वेगळ्या प्रकारचे फायरिंग टेक्निक पण वापरून पाहिले. आता नवीन काय करते असे विचारले तर निरनिराळे सेट्स करते आहे. म्हणजे एकसारखे ४ कप, एक सारखे राईस बाऊल्स, एकातले एक असे मिक्सिंग बाऊल्स, झाकणाचे केसेरोल बाऊल्स असे करते.
Pottery तीन प्रकारे मुख्यत्वे केली जाते -
१. व्हील थ्रोन
२. Slab Work
३. Coil Work

Keywords: 

लेख: 

ImageUpload: 

पॅसिफिक कोस्ट हायवे

पॅसिफिक कोस्ट हायवे उर्फ हायवे वन उर्फ रुट वन या नावांनी ओळखला जाणारा हा रस्ता माझ्या अत्यंत अत्यंत आवडत्या रस्त्यांपैकी एक आहे. कॅलिफोर्नियाच्या सर्वात पश्चिमेला पॅसिफिक समुद्राच्या बाजूने दक्षिणोत्तर जाणारा हा मर्ग म्हणजे सौंदर्याची खाण आहे. एका बाजूला निळा-हिरवा-मोरपंखी असा अतिशय सुंदर रंगांचा समुद्र अन दुसर्‍या बाजूला हिरव्यागार डोंगररांगा ! मंत्रमुग्ध करुन टाकणार्‍या या रस्यावर कितीदा गेले तरी मन भरत नाही. फोटो मध्ये नाहीच पकडता येत त्या वातावरणातले भारावलेपण !

तर इथे टाकूया आपले लाडक्या पीसीएच चे लाडके फोटो !! :)

Taxonomy upgrade extras: 

मेक्सिको (मेहिको)

नुकतीच मेक्सिको (मेहिको) ची ट्रिप करुन आलो. अतिशय सुंदर अनुभव होता. उद्या डीटेल्स लिहीन. सध्या फक्त फोटो टाकते.
रिझोल्यूशन खूप कमी केल्याने फोटोंचा इफेक्ट म्हणावा तसा येत नाहीये. पण सोपे काम झाले. Party

1710
1708
1707
1705
1706
1704
1703
1702
1709

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

फॅमिली क्रॉनिकल्स १ : लग्नाचा वाढदिवस - आमचं सेलिब्रेशन!

ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!

------------------------------------------------------------------------------------------------

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस! दरवर्षीच अजून एक वर्ष आपण एकमेकांबरोबर कसं काय घालवलं ह्या विचारानी आम्हालाच आश्चर्य वाटतं.

तर सकाळी सकाळी त्याला त्याच्या बहिणीचा का कोणाचा व्हॉटस अप आला वाटतं कारण त्याने घोषणा केली,
"१२ बरं का!"
"१२? काय १२ वाजले? एवढा वेळ झोपले मी आज?" तसा रविवार असल्याने घाई नव्हती पण १२?

लेख: 

एका सांजेच्या पारीला

एका सांजेच्या पारीला
मन कोरे निराकार
जणु मनाने धरला
निळ्या नभाचा आकार..

आला सरसर वारा
सारी मळभ नभाचे
मनअंगणी हसले
जणु ठसे मेघियाचे

गाणे ओल्या पावसाचे
थेंबाथेंबाने रचले
मन पावसाचे जणु
को-या मातीत रुजले

नभी पाऊस भरता
भरे अमृताचा घट
गाजे सावळा सोहळा
स्वर गंध अनवट

उभे रान थरारले
अन शहारली पाती
नवलाईने फुलली
अंतरीची नवी नाती
सरे सांज सुरमई
रात चंदेरी निजली
ओल्या पहाटगंधात
नवी किरणे सजली..
नवी किरणे सजली..

Keywords: 

कविता: 

सृजनाच्या वाटा - आनंद मना

(आशिकाने आम्ही आनंदे नाचू गाऊ या हा धागा काढला, तो वाटताना मला हा लेख आठवला. असं वाटलं इथल्या मैत्रिणींना आवडेल हा. म्हणून टाकतेय.)

आज कोण कुठले आप्त मला भेटायला सकाळी सकाळी आले.
उठलेच ते काहीशी वेगळ्या मूड मध्ये. आज पर्यंतच्या अनेक त्रासदायक आठवणी उगाचच आठवू लागल्या.

आयुष्यात न आकारलेले आकार, डोळ्यासमोर फेर धरू लागले.उगाचच एक अस्वस्थता तार छेडू लागली. जे जे हाती आले नव्हते, कधी निसटले होते, कधी सोडावे लागले होते, कधी मनापासूनही सोडले होते; ते सगळे भोवती फेर धरून वाकुल्या दाखवत होते.

ग्लेनबर्न टी-इस्टेट, दार्जिलिंग : एक आगळावेगळा अनुभव

जरा कल्पना करा...

एका दीडशे वर्ष जुन्या पण अजूनही ती शान तशीच राखलेल्या ब्रिटिशकालीन बंगल्याच्या व्हरांड्यात बसून तुम्ही साग्रसंगीत चहा पित आहात. खानसाम्यानं तुमच्यासमोर आणून ठेवलीय टीकोजीनं झाकलेली किटली, नाजूक नक्षीदार कपबशा, पेस्ट्रीज आणि गरम स्नॅक्स...

किंवा

व्हरांड्यासमोरच्या काळजीपूर्वक राखलेल्या बागेत सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून तुम्ही गरमागरम आलूपराठे खात आहात...

किंवा

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

आम्ही आनंदे नाचू गाऊ

'आनंद' या वेळचा विषय. आपला आनंद कशात आहे ते लिहायचं. आपल्या कलाकॄती, आनंदी आठवण असं काहीही. वाचूनच मस्त वाटलं आणि माझा आनंद कशात आहे हा प्रश्न स्वतःला विचारला. उत्तरं एकाहून अधिक येणार याची खात्री होतीच म्हणून चक्क पेन-पेपर घेऊन लिस्ट करायलाच घेतली.

मला आनंदी करणार्‍या गोष्टी:- Party
१). अ
२). ब
३). क

Keywords: 

'आनंदा'ची गाणी

या महिन्याचा विषय आहे आनंद!

तर त्या निमित्तानं आपण ज्या ज्या गाण्यांत 'आनंद' हा शब्द आला आहे ती गाणी, कविता इथे आठवूयात का?

मराठी, हिंदी दोन्ही चालतील. धृवपदात आनंद शब्द आला असेल तरी चालेल. ते धृवपद आणि ते गाणं/कविता दोन्ही लिहा मात्र.

Keywords: 

बुकक्लब - कोबाल्ट ब्लू

'कोबाल्ट ब्लू' मी काही वर्षांपूर्वी वाचलेलं आणि आवडलं होतं.

कथेतल्या एका मुख्य पात्राला नाव नसणं, पण त्याच्यामुळेच त्या दोन भावंडांनी आपल्या लैंगिकतेचा शोध घेणं रोचक वाटलं होतं. कॅटलिस्टसारखं मध्यवर्ती पात्र ही कल्पनाही वेगळी वाटली. (आता त्या भावंडांची नावं आठवत नाहीत पण) ती नावही शारीर अर्थ सुचवणारं. तिचं वर्णनही मस्त होतं, दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरल्यामुळे सुडौल बांधा आणि रापलेला वर्ण असं काहीसं.

निसर्ग राजा, एेक सांगतो

तेजुच्या आनंदी चेहऱ्यांवरून हा धागा सुचला. इथे फक्त निसर्गाचे फोटो शेअर करुयात.

Keywords: 

नीमराणा फोर्ट - राजस्थानची देखणी झलक

भारताला अत्यंत संपन्न ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या ठेव्याच्या खाणाखुणाही भारतभर अनेक रुपांत विखुरल्या आहेत. त्यातीलच एक रत्नं म्हणजे ऐतिहासिक वास्तू. गड, किल्ले, राजवाडे, वाडे , गढ्या अशा विविध स्वरुपात हा वैभवशाली गतकाळ आपल्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण सरकारी अनास्था आणि जनतेची उदासिनता यामुळे हे अवशेष ढासळत जातात.

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

आनंदी चेहरे

आनंद व्यक्त करायचं सर्वात सहज आणि सुरेख साधन म्हणजे हसरा चेहरा... आपल्या आजूबाजूला किती वेगवेगळ्या प्रकारची स्माईल्स, हास्य आपण रोज बघत असतो.. ती फोटोन्मधून साठवून ठेवायला हा धागा!

"मला स्माईल्स कलेक्ट करायचा छंद आहे" असा काहीसा एक डायलॉग अनुशा दांडेकर तिच्या इंग्रजी मराठीत एका फिल्ममध्ये म्हणते. ( हे आपलं उगाच, पहिलं वाक्य लिहिताना आठवलं म्हणून...)
चला , आपणही हसरे चेहरे कलेक्ट करूयात :)

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

पाने

Subscribe to मैत्रीण RSS