रंग खेळू चला- 'ईट युअर कलर्स'-'किकाकोली'

किकाकोली अर्थात किवी, काकडी, ब्रोकोली स्मूदी

उपक्रमाच्या नियमानुसार हिरव्या रंगाची भाजी किंवा फळ असणे आवश्यक. या रेसिपीत मी किवी हे फळ ज्याचा गर हिरव्या रंगाचा आहे आणि ब्रोकोली ही हिरवी भाजी हे दोन मुख्य घटक पदार्थ वापरले आहेत.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

रंग खेळू चला - "ईट युअर कलर्स" - किवि ड्रींक

साहित्य

- २ किवि
- लिंबु
- कोरफडीचा गर २ टे स्पु
- अर्धी काकडी
- पुदिना

कृती:
किवि आणि कोरफडीचा गर काढुन घेतला आणि लिंबु सोडुन सगळे मिक्सर वर फिरवले. वरुन लिंबु पिळले..

मी किवि लिंबु आणि पुदिना हा ज्युस पाहिला आहे ... पण मला ते सगळे आंबट लागत असेल असे वाटत होते ... म्हणुन काकडी घालायचे ठरवले... मग काम करणार्या मावशींनी कोरफड घाला असे सुचवले ... कोरफडीला तशीही फार चव नसते आणि नुसती खाल्ली जात नाही म्हणुन त्यांचे ऐकले :)

१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - २ मार्क
३. फोटो दिलाय - १ मार्क

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

रंग खेळू चला - ईट युअर कलर्स- "मोहिता"

अव्हाकाडो म्हणजे "गुड फॅट", ते बॅड कोलेस्टेरॉल कमी करतं इ. इ. त्यामुळे तो अधूनमधून खावा म्हणे. मला आवडतो म्हणून मग नुसता, किंवा अव्हाकाडो-बनाना चाट, ग्वाकामोले अस, काहीबाही बनवून पोटात जातो. त्याची दूध, योगर्ट घालून स्मूदी करतात पण मला त्यात दूध आवडले नाही. म्हणून ही आपली स्पायसी लस्सी - "मोहिता".


साहित्य-
अर्धी वाटी avocado pulp. एक मध्यम आकाराचा अर्धा घेतला तरी चालेल.
१ कप लो फॅट ताक,
१ कप पाणी
jalapeno किंवा तिखट हिरव्या मिरचीचा इंचभर तुकडा
मूठभर कोथिंबीर
चवीला मीठ, साखर
१/२ चमचा चाट मसाला


कृती-

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

गारेगार पन्हं!

panha 1.jpg

हिरव्या हिरव्या रंगाची कैरी चटकदार
सांग गं मुली लागतं कसं पन्हं गारेगाऽर
हिरव्या हिरव्या...

हिरव्या हिरव्या कैरीला उकडा छान छान
गरामध्ये घाला साखर

ओ! ते माहितेय आम्हाला... पण आमचं पन्हं सुरेख केशरी पिवळसर दिसतं, पन जल्लां तुमचं पन्हं हिरवं हिरवं कसं काय दिसतंय? :thinking:

कारण त्यात घातलाय पुदिना! Party

panha 2.jpg

सृजनाच्या वाटा: 

रंग खेळू चला: ईट युअर कलर्स : जॅपनीज मस्टर्ड स्पिनॅच सूप

स्मूदी सगळेच करणार, पालक पण सगळेच वापरणार म्हणून जरा हटके जॅपनीज मस्टर्ड स्पिनॅच चे हे सूप. जॅपनीज मस्टर्ड स्पिनॅच चे मूळ नाव कोमात्सुना. मी तोक्यो मधे रहाते तो भाग हा कोमात्सुना साठी प्रसिद्ध आहे. इतका की दर वर्षी इथे कोमात्सुना फन रन होते. फिनिशर ला २ ताज्या ताज्या कोमात्सुनाच्या जुड्या मिळतात. सो हेल्दी! १०-२० किमी पळून आल्यावर अर्थात हे सूप नाही तर कोमात्सुना स्मुदी आवडेल पण अजून विंटर अणि स्प्रिंग असे तळ्यात मळ्यात असलेले वेदर असल्याने आज सूपच! नमनाला धडाभर असले तरी सूप मधे मुळीच तेल नाहीये.
साहित्यः
१ कोमात्सुना ची जुडी (पालक पण चालेल. ताजा/फ्रोजन कसलाही)
१ टेस्पू. मूगडाळ

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

रंग खेळू चला - "ईट युअर कलर्स" - " पुलिंतांपाजिमि"

"पुलिंतांपामि" नक्की इथल्या अनेकजणींना हा माझा टायपोच वाटला असणार Lol
तरीही अवलची व्होकॅबलरी माहिती असलेल्या गोंधळात नक्की पडल्या असतील ना? नक्की काय बरं लिहायचं होतं हिला :thinking:
पण काये न लोलाच्या श्टाईलच्या उपक्रमाला थोडं तरी जागलं पाहिजे न? :ड
तर झालं असं की आज लेकाला बिर्याणी खायची हुक्की आली. मग स्वाभाविकच मला सामीची आठवण आली. मग काय घातला बिर्याणीचा घाट :fadfad:
तर तांदूळ घाटत असताना मला लोलाची आठवण आली. मग म्हटलं घालून टाकू "ईट आपलं ड्रिंक, युवर कलर्स"चाही घाट Dancing
मग ओट्यावरच्या वस्तू दिसू लागल्या :waiting:

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

रंग खेळू चला - "ईट युअर कलर्स" - केल स्मूदी

केल स्मूदी!

आत्ताच केल स्मूदी केली. आणि मग ही पोस्ट बघितली. तडक जाऊन त्या स्मूदीचा फोटो काढला. मग परत जिन्नस गोळा केले फोटो काढायला. आता त्या जिन्नसांची उद्या परत करेन स्मूदी!

तर केल हा हिरवा पालापाचोळा घालून केलेलं स्मूदी हे पेय

IMG_1277[1].JPG

साहित्य :
केल (kale) -
बदाम (३-४ तास पाण्यात भिजवून)
सब्जा (३-४ तास पाण्यात भिजवून)
कुठलही फळ ( मी बरेचदा केळं घालते. आज सफरचंद होतं ते घातलं.)
ऑरेंज ज्युस अथवा नारळाचे पाणी अथवा योगर्ट अथवा प्रोटीन शेक
हवं असल्यास चवीला आलं

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

रंग खेळू चला - "ईट युअर कलर्स" - घोषणा

बटाटा: तर मुळ्या, तू वाचलंस ना?
मुळा: काय?
बटाटा: तुझे रंगीत भाऊबंद आहेत म्हणे.. लाल, गुलाबी. प्राची, नंदिनी, मोनाली सांगत होत्या.
मुळा: बsssरं, मग?
बटाटा: मग काय? बोलव की त्यास्नी, रंग खेळाया! Dancing
मुळा: अरे, पण अजून काय माहिती नाही, कशाचा पत्ता नाही आणि काय खेळतोस!
बटाटा: हाय ना, हा बघ मी आणलाय घोषणेचा कागूद, तुला वाचून दावतो. लक्ष दे नीट, काय?
मुळा: हां, बोला.
बटाटा: "रंग खाऊ चला!"

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

रंग खेळू चला - एक संवाद

मुळा: ए बटाट्या, बघ मी तुझ्यापेक्षा किती गोरा!
बटाटा: मी यम्मी!
मुळा: तू यमी? म्हणजे मी यमीपेक्षा दुप्पट गोरा! ROFL
बटाटा: फालतू जोक मारु नगंस! यम्मी म्हंजे टेश्टी. तुज्यापेक्षा मी जास्त लाडका. तुज्या वासानंच लोक पळून जात्यात. त्या बाया परवा केक बनवत होत्या, तुला घातला का कुणी त्यात? गाजराला घाला, फळं घाला म्हनल्या त्या स्नेहश्री बाई.
मुळा: तुला तरी घालतंय का कुणी केकमध्ये?

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

कातळावरची राणी

20130101073549-c08d1d83-me_0.jpg
(फोटो माझ्या भाचाने काढलेला)

चहूकडे पाणी आणि कातळावर राणी
भरून आली मनामधे निळी निळी गाणी

काठावरले वृक्ष त्याची जळात साउली
हलती डुलती पाने, तिला त्याच्या चाहुली

रावा उडे इथे तिथे, करावया पाहणी
रंगुनिया प्रेमात ती, विणे घरटे शहाणी

पिल्ले दोन सानुली, जणु घरटे अोंजळी
लुकलुकु डोळे अन, मऊमऊ लव्हाळी

दिन सारा येर झारा, भूक पिलांची कोवळी
मायबाप देती घास, चोच जणु रोवळी

घंटा निनादे, काठावरल्या उंच राउळी

Keywords: 

कविता: 

माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग १

खूप दिवसांपासून युरोप ट्रिप करायचं डोक्यात घोळत होतं. निरनिराळ्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या सफरींचे कार्यक्रम बघत होते. तो पंधरा-वीस दिवसांत अक्खा खंड पहायचा चिवडा काही पसंतीला येईना. मला चित्र,शिल्प,संस्कृती,निसर्ग सगळंच अनुभवायचं होतं. त्यातच मीना प्रभूंचं रोमराज्य वाचण्यात आलं आणि मायकेल अ‍ॅन्जेलो लिओनार्दो बरोबरच अजून काही चित्रकार शिल्पकारांची माहिती झाली. त्यातल्या कार्व्हाज्जीओच्या चित्रांनी तर वेडंच केलं. आणि इट्लीला जायचं नक्की केलं. मग ऑनलाईन हॉटेल बुकिंग करू, तिथलीच लोकल ट्रीप बूक करू, असे मनात मांडे रचायला सुरुवात केली. माझ्या सख्ख्या मैत्रीणीला प्लॅन सांगितला आणि नवर्‍याला!

रंग खेळू चला...

...रंग खेळू चला!
Bouncy Colors 2
"फागुन आयो रे" म्हटलं की कसं होळी, धुळवड आणि आपली रंगपंचमी आठवते आणि वसंत ऋतूची चाहूल लागते.
होली आणि रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव! आपण रंग उधळतो, उडवतो, लावतो.. पण कोणाच्याही अंगभूत रंगाला विसरुन कसं चालेल? यावेळी आपण या उत्सवात अंगभूत रंगांचा खेळ खेळणार आहोत.
कधी, कुठे, कसा आणि कोणाबरोबर खेळायचा?
लवकरच कळवू.


मध्यंतरी काही काळ झालेल्या ब्रेकनंतर आपण पुन्हा सृजनाच्या वाटांकडे वळणार आहोत. तर मैत्रिणींनो, नव्या जोमाने तयार रहा!
Jumping Jacks

Keywords: 

माझी भटकंती - ओहाय ( Ojai )

जुनाच लेख!

आज खूप दिवसांनी निवांत वेळ मिळाला.. म्हटलं आज काहीतरी छान , वेळ काढून, नीट लिहावे.. आता ते छान झालं की नाही माहीत नाही..! पण मन लावून लिहीतीय.. नेहेमी लिहीताना इतका विचार, इतकी तयारी मी एरवी नक्कीच करत नाही!

Keywords: 

पैशाचे घर

भाच्याचे गडग्नेर (केळवण) आहे उद्या. त्याला आम्ही सगळे मिळून पैसेच देणार आहोत, त्याच्या नवीन संसारासाठी, नवीन घरासाठी उपयोगी वस्तू घेण्यासाठी!
पण पैसे, चेक हातात देण्याएेवजी या घरात घालून देणार :)
हे समोरून. दरवाजा, दोन खिडक्या, मधोमध घंटा - तिचा उपयोग आहे हं ...
IMG_20160312_094214.jpg

हे बाजुनी. एक मोठी खिडकी, घराला छान व्हेंटिलेशन आहे हो आमच्या. अशीच पलिकडेपण आहे हं!
IMG_20160312_094248.jpg

Keywords: 

कलाकृती: 

अमेरिका पूर्वरंग : १ – पळापळा कोण पुढे पळे !!!

दिनांक ४ सप्टेंबर २००९ ..
मायबोलीचा गणेशोत्सव संपला ३ ला.. तरीही नंतरची कामं उरली होती.. ती व एकीकडे प्रवासाची तयारी करत होते… ४ ला रात्री ११ ची फ्लाईट होती .. थोड्यावेळाने माझ्या लक्षात आले की मी नुसतीच भराभरा इकडून तिकडे फिरतीय घरात.. पण काम काही उरकत नाहीये..  106
शेवटी गणेशोत्सवाच्या कामाचे नॉलेज ट्रान्स्फर केले व तो अध्याय संपवला..
आता फुल्टू बॅगा भरणे वगैरे काम करूया म्हणून लिस्ट करायला घेतली… हसू नका! मी अहोरात्र लिस्टा करत असते..

ग्लेशिअर नॅशनल पार्क ( भाग २) - वेगळे रूप!

या ग्लेशिअरच्या आम्ही दोघं इतके प्रेमात पडलो की परत पुढील वर्षी इथे यायचच हा निश्चयच केला आम्ही.

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

ग्लेशिअर नॅशनल पार्क (भाग १) - Trekkers' paradise

जुना लेख टाकत्ये इथे....

ऑगस्ट २००३ मध्ये केलेली ही ग्लेशिअर नॅशनल पार्कची ट्रीप :

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

भूमी

अजूनही आठवतात ते दिवस. नुकती थंड होत होते मी. पोटातली आग अजूनही ढवळायची, वर वर यायची. पण मग आकाशातून तू पाझरु लागला, अन तुझ्या शिडकाव्याने शांतवत गेले मी. मग किती तरी काळ असाच गेला. मी, अन हळूहळू वाढत गेलेले तुझे कोसळणे.
अन मग अचानक काही हलले उदरात. आधी वाटले, तीच ती आग. पण नाही, हे काही वेगळे होते. काही शांत करणारे, अगदी तुझ्या सारखे, मनाला शांत करणारे, मन तृप्त व्हावं असं काही. ती जाणीव, पहिली जाणीव माझ्या स्त्रीत्वाची. काही रुजत होते, वाढत होते, आत आत, उदरात.अस्तित्वाची एक नवी अनुभुती.

लेख: 

जगातलं आठवं आश्चर्य -- लंडनची ट्युब

कठोर परिश्रम, चिकाटी आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर दीडशे पेक्षा अधिक वर्षांपूर्वी लंडनमध्ये सुरु झालेली जगातली पहिली भुयारी रेल्वे, जिला लोक भाषेत ट्युब म्हणतात, ते एक मानव निर्मीत आठवं आश्चर्यच वाटत मला. आणि म्हणूनच मी जेव्हा या टुयबने पहिल्यांदा प्रवास केला तेव्हा गाडी जरी जमीनीखालुन जात होती तरी मी मात्र अक्षरशः हवेत होते.

लेख: 

मराठी भाषादिन २०१६ ! - इपिगो

मराठी भाषादिन २०१६ ! - इपिगो

ipigo.png

इपिगो! इपिगो!! इपिगो!!!

:surprise:

काय कळलं का?

हीच तर गंमत आहे. ओळखा बघु हे नाव. हे ओळखलं की ते सुरू करूच.

खाजवा जरा डोकं. मभादि जवळ येतोय ना!

आता तरी समजलं का?

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६

Keywords: 

लेख: 

२८ फेब्रुवारी - विज्ञान दिनानिमित्त पुण्या-मुंबईत कार्यक्रम

२८ फेब्रुवारी हा आपण विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. ह्या दिवशी बऱ्याच वैज्ञानिक संशोधन संस्था सर्वसामान्यांसाठी मुख्यत्वे शालेय विद्यार्थ्यासाठी खुल्या असतात. तिथे बरेच दिवसभराचे उपक्रम असतात.

मुंबईतल्या अश्या काही संस्था :
१. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र : http://www.hbcse.tifr.res.in/events/national-science-day-2016 ( मी इथे २-३ वर्ष गेले होते खूप मज्जा यायची मला तिथे )
२. BARC अणुशक्तीनगर
३. नेहरू विज्ञान केंद्र आणि तारांगण : दोन्हीकडे बरेच उपक्रम असतात. फोन करून माहिती विचारता येते.

पुणे

पाँडीचेरी आणि अंदमान : भाग २ अंदमान

अंदमान, पोर्ट ब्लेअर. नितांत सुंदर समुद्र किनारा लाभलेलं अंदमान. अनेक छोटीमोठी बेटं आणि त्यामानाने कमी वस्ती असल्याने इथला समुद्र अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. पूर्वीचं का़ळ्या पाण्याच्या नावानं कुप्रसिद्ध असलेलं अंदमान आता पर्यटकांसाठी एक सुंदर ठिकाण ठरू शकतं. इथे येण्यासाठी चेन्नै वरून विमान सेवा आहे. चेन्नै वरून निघालं की दोन तासात पोर्टब्लेअर. नाहीतर चेन्नै, विशाखापट्टणम आणि कलकत्त्याहून बोटीनेही येता येतं. पण ३ ते ६ दिवस लागतात.

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

पाँडीचेरी आणि अंदमान : भाग १ पाँडीचेरी

अँडी आणि पाँडी! -

२०१४ च्या मार्च महिन्यात ८ दिवसांची पाँडीचेरी आणि अंदमानची सफर करून आले. एका फटक्यात दोन दोन केंद्रशासित प्रदेश बघून आले. अर्थात दक्षिणेकडे जाण्यासाठी हा काही फारसा सुखावह ऋतू नाही. नोव्हेंबर ते जानेवारी हा सर्वोत्तम काळ. पण उन्हाळा अगदीच सहन न करता येण्यासारखा नव्हता.

पाँडीचेरी येथिल अरविंद आश्रम ( ऑरोविल)

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

क्रोशे - कोणी कोणी, काय काय, कसं कसं, का का बनवलं?

इथे सगळ्या नवशिक्या, बनचुक्या, गुरू, शिष्यांनी आपापले क्रोशाकामाचे फोटो टाकावेत. शक्य असेल तर जेथून बघून केले त्या लिंका द्याव्यात. काही शंकाकुशंका असतील तर विचारविमर्श करावा.

Keywords: 

कलाकृती: 

अथिरापल्लीचे अद्भुत

हा मणिरत्नमचा आवडता स्पॉट आहे म्हणे! त्याच्या बर्‍याच सिनेमात आहे हा. रा-वन मध्येही होता. त्या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी अभिषेक आणि ऐश्वर्या राहिले होते त्याच रुममध्ये आम्हीही म्हणजे अभिषेक अग्रवाल, ऐश्वर्या अग्रवाल ( :इश्श: ) राहिले. भरीला आमच्याबरोबर आराध्या अग्रवालही होती. ते हे - अथिरापल्लीचं रेन फॉरेस्ट रिझॉर्ट .

अथिरापल्ली हे फारसं माहित नसलेलं केरळमधिल ठिकाण. तिथे फक्त एकच गोष्ट बघण्याजोगी - अथिरापल्लीचा धबधबा! पण काय सांगू, हे रिझॉर्ट इतक्या मोक्याच्या जागी वसवलंय की दृष्ट काढून टाकावी.

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

पाने

Subscribe to मैत्रीण RSS