डोक्याशी वाजणारा अलार्म स्नूझ करायला मोबाईल बराच चाचपूनही तिच्या हातात सापडत नव्हता. शेवटी उठून बसत तिनेच रात्री उशीखाली सरकवलेला मोबाईल बाहेर काढून अलार्म बंद केला. शिट!!! नऊ वाजले! तिने कपाळावर हात मारला. तिला तासाभरापूर्वी घराबाहेर पडायला हवे होते आणि ती अजून अंथरुणातच होती. घर शांत होते म्हणजे सगळे आपापल्या कामांना बाहेर पडून गेले होते. तिने पटकन ब्लॅंकेट बाजूला केले आणि पळापळ करत कामाला लागली.
रविवारी सकाळी शिल्लक एकुलत्या एक गेस्टने चेकआऊट केल्यावर पलाश कामाला लागला. लग्न जरी पुढच्या मंगळवारी असले तरी तयारीला दिवस खूप कमी होते. कोल्हापूरला नेहमीच्या दुकानात कॉल करून त्याने ग्रोसरीची ऑर्डर दिली. भटजींची तारीख बुक केली. गावात पक्याला झेंडूची फुले, आंब्याच्या डहाळ्या, केळीचे खांब आणि पाने, गुलाबाचे हार वगैरे लिस्ट दिली. संध्याकाळच्या कॉकटेल पार्टीसाठी ऑर्किड्स बूक करून ठेवली. ड्रिंक्सची लिस्ट दुकानात पाठवली. फेटेवाला आणि मेहंदीसाठी गावातली एक मुलगी सांगून ठेवली. आता फक्त पार्टीसाठी वेडिंग केक शिल्लक होता.
कधी नव्हे तो वेधशाळेने दिलेला वादळी पावसाचा इशारा जांभूळवाडीत तरी आज खरा ठरला होता. सकाळपासून फिरून फिरून येणारा सोसाट्याचा वादळी वारा, शब्दशः मुसळधार पाऊस आणि या दोहोंचा मिळून ऐकू येणारा रौरव यात समोरच्या माणसाचे बोलणेही ऐकू येत नव्हते. जागच्याजागी स्प्रिंगसारखी हलून कंबरेतून वाकणारी भलीमोठी झाडे आजपर्यंत कोणी पहिली नव्हती. माडा पोफळींची झुलून झुलून वाताहात झाली होती. झाडांवर तयार फुले, फळे तुटून चिखलात पडून अजूनच राडा झाला होता. रस्त्यातून तांबडेलाल चिखलमिश्रित पाणी फुफांडून वहात होते. आजूबाजूच्या घरांवरचे पत्रे ताडताड उडून गर्जत होते. काही घरांची कौले उडून गेली होती.
#16, Sea Rock Society, Yari Road, Versova, Mumbai 400061
हातात सेलफोनवरचा पत्ता आणि डफल बॅग घेऊन तो त्या लहानश्या काळ्या लोखंडी गेटकडे तोंड करून उभा होता. टॅक्सी त्याला सोडून जाऊन पाच मिनिटे तरी झाली होती. कंपाउंड वॉलवर लपेटलेल्या गणेशवेलीवर लालचुटूक फुले बहरली होती. दारासमोरच्या झाडाला फेअरी लाईट्स गुंडाळून सजवले होते. दुसरीत असतानाचा ख्रिसमस! आठवून नकळत तो हसलाच.
'आपल्यामधली मौनाची दरी पसरतच चालली आहे आणि मी त्या गर्तेत खोल खोल जातोय.'
आदित्यने डायरीचे पहिलेच पान उघडले होते. दुपारचा चहा झाल्यावर बाबांच्या कपाटातली पुस्तके खालीवर करून बघताना मध्येच त्यांची डायरी त्याच्या हाती लागली होती. त्यांच्या वैयक्तीक गोष्टी वाचू नये असा एक विचार एकवार त्याच्या मनात चमकून गेला पण आता बाबा नाहीत तर काय हरकत आहे म्हणून त्याने डायरी बाहेर काढलीच. बाबांच्याच आरामखुर्चीत बसून त्याने डायरी उघडली.
कांगडा टीच्या चौकोनी डब्यातून आदित्यने किटलीत चहा घातला. उकळत्या पाण्यात हलकेच पसरणारा सोनसळी रंग पहात त्याने आलं ठेचून दोन तुकडे घातले आणि खूष होत किटलीवर दरवळणाऱ्या वाफेत नाक खुपसून खोलवर श्वास घेतला. किटलीवर झाकण ठेवताना समोर काचेतून त्याची नजर लांबवर पसरलेल्या हिरव्यागार देवदारांच्या दाटीतून खळाळत्या बस्पाच्या प्रवाहापर्यंत गेली. उन्हात चमकत्या पाण्याकडे पाहता पाहता त्याला तो दिवस आठवला...
"खरंच! त्याचा खरा झगडा स्वतःशीच आहे."
तिने मान्य केले होते. तिच्याइतक्याच त्रासातून तोही जात होता. तिला दिवाळीत झालेल्या त्यांच्या गप्पा आठवत होत्या. एकमेकांना सांगितलेली त्यांची स्वप्नं कितीही वेगळ्या वातावरणात राहिले तरी एकमेकांसारखीच होती. त्यांच्यात न सांगता येण्यासारखा एक बंध निर्माण झाला होता. तरीही ती कदाचित त्याच्या प्रेमात वेडी झाल्यामुळे असा विचार करायची शक्यता होती. पण जर आदित्यला मनापासून ह्या नात्याबद्दल शंका असेल आणि तिच्यापासून लांब रहायचे असेल तर ती त्याच्या वाटेत येणार नव्हती. ती विचारात पडली होती.