July 2021

रूपेरी वाळूत - १३

दार उघडून तो आत शिरला आणि मागोमाग ती आल्यावर त्याने दार लावून घेतले.

हां! रिलॅक्स होऊन तो धप्पकन बीन बॅगवर बसला. ती हळूच एकेक पाऊल टाकत त्याच्या आणि तिच्या खोलीतला कॉन्ट्रास्ट नजरेखाली घालत होती.

"हॅव अ सीट!" तो त्याच्यासमोरच्या बीन बॅगकडे हात दाखवून म्हणाला. ती शांतपणे तिथे जाऊन बसली. "सो.. अप्पांबद्दल माझा अंदाज बरोबर होता. आपण ठरवलं तसं पुढे जायचं की तुला ते कठीण वाटतंय?" त्याने आपल्या मनातली खळबळ लपवून विचारलं.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - १४

नोटीस देऊन एक आठवडा झाला तरीही हे लग्न खरंच होतंय असं दोघांनाही जाणवत नव्हतं. आपापल्या रुटीनमधून दोघांनीही एकमेकांना क्वचित वाटलं तरी आढेवेढे घेत काही कॉन्टॅक्ट केला नव्हता. बुधवारमुळे रिसॉर्टवर गर्दी कमी होती म्हणून तो जेवायला घरी गेला. आईने नेमकं चिंबोऱ्यांचं लालभडक कालवण केलं होतं. पलाश बऱ्याच दिवसांनी जेवायला आला म्हणून वहिनीने हौसेने सोलकढीही केली. गरमागरम फडफडीत भातावर कालवण ओतून जेवल्यावर ती परफेक्ट थंडगार सोलकढी पिऊन तो थेट स्वर्गात पोहोचला होता. आई आणि वहिनी नोराबद्दल वेगवेगळी माहिती, तिची आवडनिवड विचारत होत्या पण त्याला अर्थातच काही माहीत नव्हते.

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

रूपेरी वाळूत - १५

त्याने अलगद तिचे खांदे धरून तिला स्वतःपासून दूर केले. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले पण तिला नेहमीचीच बेफिकिरी दिसली.

"व्हॉट द हेल पलाश!" ती भानावर येत ओरडली.

"तूच म्हणाली होतीस परफेक्ट मॅरेज 'शो' झालं पाहिजे." तो शांतपणे म्हणाला.

"मगे?" तिने कंबरेवर हात ठेवून विचारले.

"मगे.. तुझ्या बहिणीला तसं वाटलं असेल. आपण भांडताना ती इकडे येत होती. मेबी तिने काही ऐकलं असेल तरी आपल्याला एकत्र बघून ती ते विसरेल."

Keywords: 

लेख: 

माझे पुस्तकः Indian GuideBook: Pre and postnatal care in the USA . Tales of an Indian Granny

हाय मैत्रिणींनो
कश्या आहात? खूप दिवसांनी इथे येत आके. कारणही तसंच आहे.

Indian guidebook (1).jpg

Keywords: 

लेख: 

जर्मनीतलं वास्तव्य

२०१२ साली जर्मनीत नवीन संसार चालू करायचा म्हणून आले, तेव्हा आनंदा बरोबरच एक अनिश्चितता होती. इथे आयुष्यभर राहायचं नाही असं पक्कं ठरवूनच आले होते, पण हा अनुभव घ्यायला तेवढीच उत्सुक होते. भाषा शिकणे, नोकरी, युरोपात फिरणे, मग सृजनचा जन्म असे एकेक टप्पे पार झाले. घराबाहेर अनेक वर्ष राहत असूनही, देशाबाहेर राहणं ही पूर्ण वेगळी गोष्ट होती हे बरंच नंतर जाणवलं. कल्चर शॉकच्या नियमाप्रमाणे सुरूवातीला खूप आवडलेल्या काही गोष्टी नंतर अगदीच नावडत्या झाल्या, तर काही पूर्ण उलटे अनुभव पण आले. मधल्या काळात मग काही वेळा टोकाची मतं बनत गेली आणि पुन्हा काही नवीन अनुभवांनी ती थोडी मवाळही झाली.

Keywords: 

रूपेरी वाळूत - १६

पलाश सकाळी रिसॉर्टवर निघण्यासाठी खाली आला तेव्हा अप्पा आणि शिरीषदादा शेतावर निघून गेले होते.

"पलाss श, मी घावणे करतंय, नाष्टा करून जा.." तो जिना उतरून माजघरात येताच स्वयंपाकघरातून मिक्सरच्या घुर्र आवाजावर आईचा आवाज आला.

मागच्या दारात संगी शर्वरीपाशी काहीतरी खुसखुसत होती. "जा ग संगे, कपडे धुवायचे पडलेत अजून तसेच." म्हणून तिने संगीला पिटाळले. वहिनीला तो खाली आल्याचे दिसताच तिने हळूच त्याला हाक मारली.

"पलाश, संगीने हा तुझा धुण्यातला शर्ट दिलाय. म्हटलं काही नवी फॅशन बिशन आहे की काय.." हसू दाबत शर्ट पुढे करत वहिनी म्हणाली.

Keywords: 

लेख: 

जर्मनीतलं वास्तव्य - भाग २ - पहिली ओळख

"आजवर कितीतरी वेळा विमानाचा प्रवास झाला, अनेक देशातली विमानतळं पाहिली, पण फ्रँकफर्ट एअरपोर्ट म्हणजे नुसता सावळा गोंधळ, इतका बिझी एयरपोर्ट म्हणवला जातो पण बाकी अजिबात काही धड व्यवस्था नाही" अशा अर्थाचं काहीतरी माझा एक जुना सहकर्मचारी एकदा बोलला होता. तेव्हा माझ्यासाठी फ्रँकफर्ट (आता मी फ्रांकफुर्ट म्हणते, या सहज घडणार्‍या बदलांबाबत लिहीन एखाद्या भागात नंतर) म्हणजे माझ्या मनातल्या जर्मनीच्या इमेजला तेव्हा धक्का होता. होणारा नवरा जर्मनीत या एकाच गोष्टीमुळे मला फ्रँकफर्ट बद्दल सॉफ्ट कॉर्नर होता. अर्थातच तेव्हा मला हे फ्रँकफर्ट बद्द्लचं मत तेवढं पटलं नव्हतं.

Keywords: 

वीपिंग चेरीचं झाड

वीपिंग चेरीचं झाड

शाळा कॉलेजात जसं इंग्रजी साहित्य वाचत गेले...."वीपिंग विलो"बद्दल एक विचित्र आत्मीयता, फॅसिनेशन वाटत गेलं. फुलांचे अश्रु ढाळणारे झाड! अर्थातच तेव्हा हे झाड फक्त चित्रातच पाहिलं होतं.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - १७

बंद काचा आणि सुरू असलेल्या एसीमुळे तिला अचानक थंडी वाजू लागली होती. त्यात नेमका हा उघडे हात आणि मोठ्या गळ्याचा कुर्ता! आवडता असला तरी तो आज घालायचं सुचल्यामुळे तिने  स्वतःला मनातल्या मनात चार शिव्या घातल्या.  काचेवरून ओघळणाऱ्या पाण्यामधून तिला बाहेरचे काहीच धड दिसत नव्हते.

"आपण कुठे आहोत नक्की?" तिने दंडावर फुललेल्या काटयावरून हात फिरवत विचारले.

"लेझी रॉक." तो समोरच्या काचेवर आतल्या उष्णतेने जमलेले धुके तळहाताने निपटत म्हणाला.

"हम्म, पाऊस थांबेलसा वाटत नाही.." थंडीने ती जरा शहारली.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - १८

"नोराss हांगा यौ आणि तुझो ड्रेस पळय. कमॉन मॅन, ब्राईड तू आसली, मी ना!" इव्हा हातात टूल आणि लेसचे तुकडे हातात धरून मॅच करता करता ओरडली. समोर शिवण मशीनवरून नोराचा वेडिंग ड्रेस जमिनीवर ओघळून पसरला होता. जेमतेम रांगायला लागलेला सॅम हातातून कापडाचे तुकडे, चिंध्या उडवत कोपऱ्यातल्या कार्पेटवर खेळत होता.

"येतss य" म्हणून हातातला मोबाईल बाजूला ठेवून नोरा शेवटी त्या खोलीत आली.

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle